काजळकोर

Submitted by ऋषभ गि.कुलकर्णी on 16 September, 2016 - 10:03

त्याने रेखाटल्या मशालीने स्वप्नांच्या छटा

कूळाच्या वेशी ओलांडून ;

तिनेही पेटवली सोबतीची धगती ज्योत

उंबऱ्याच्या चौकटी मोडून !

व्यवस्थेच्या बेमालूम साच्याने छाटले

त्याच्या कुवतीचे पंख ;

अन त्या प्रवाहात वाहून गेली होती

तिच्याही डोळ्यातली काजळकोर …!

- ऋषभ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय सर..