डॉल्बी डीजे साउंड सिस्टिम्सवरील बंदीने गणेशोत्सवाची मजा हरवली असे आपल्याला वाटते का?

Submitted by सिंथेटिक जिनियस on 15 September, 2016 - 15:22

यंदाचा गणेशोत्सव डॉल्बी ,डिजेमुक्त करण्यात पोलिस व प्रशासनाला यश आलेले दिसतेय.असे असले तरी यामुळे तरुणाईच्या जल्लोषाला लगाम बसल्याने सर्वत्र नाराजीचा सूर आहे.डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातलेली नाही,फक्त आवाजाच्या मर्यादा पाळाव्यात असे आदेश दिले आहेत.मी स्वतः जरी नास्तिक असलो तरी उत्सवांकडे माझा कल असतो,खास करुण गणेशोत्सव.याला कारणही तसेच आहे.आपल्याकडेचे उत्सव हे मानवी उन्मादाचा निचरा करण्याचे एक उत्तम साधन आहेत असे मला वाटते ,मग ते विवाह असोत,नवरात्र असो,दिवाळी असो वा आपला आवड्ता गणेशोत्सव असो.
उन्माद' हा प्रत्येक माणसात असतोच ,या उन्मादाचा निचरा करण्यासाठी जर कुणी सणांचा आधार घेत असेल तर त्यात गैर काहीच नाही असे माझे मत आहे

गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बी सिस्टीमचे प्रस्थ गेल्या काही वर्षात आलेले आहे व भरपुर लोकप्रियही झाले ,त्यामागे बरीच कारणे आहेत ,आवडती गाणी मोठ्या आवाजात ऐकणे ,त्यावर बेधुंद होऊन नाचणे वगैरे.तरुणांमध्ये हे विशेष लोकप्रिय आहे कारण त्यामुळे त्यांच्यातील उन्मादाचा निचरा होतो.पण राज्यात सर्वच ठीकाणी प्रशासन् या डॉल्बी डीजेच्या मागे पडले आहे.या संदर्भात माझे काही मुद्दे व प्रश्न आहेत ते थोडक्यात मांडतो.
१. डॉल्बी व डीजे सिस्टीम खरेच इतक्या वाइट आहेत काय? आपणास काय वाटते?
२.या बंदीमुळे यंदाचा गणेशोत्सव मिळमिळीत झाला असे अनेक तरुणांचे मत मी ऐकले ,मला तरी त्यात तथ्य जाणवले.विसर्जन मिरव्णुकीत जान नसल्याचे चित्र होते.
३. सण, त्यातल्या मिरवणुका ,यातुन जर उन्मादाचा निचरा होत असेल तर काही दिवसांसाठी डॉल्बी सारख्या प्र्कारांना परवाणगी देण्यास काय हरकत आहे?
४.उच्च न्यायालयाने डॉल्बी चा विषय पोलिसांच्या ताब्यात दिला आहे ,पोलिस या बाबतीत अतिरेक करत आहेत असे वाटते का?
५. आपल्या देशात रोज नियम तोडले जातात ,ते ही सर्रास.मग डॉल्बी चालकांनी नियम तोडल्यास एवढा गजहब का होतोय.!
६. पुढील वर्षाच्या गणेशोत्सवात डॉल्बी डीजे यांना परवाणगी द्यावी असे आपल्याला वाटते का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंय, मी तर म्हणतो सिग्नल तोडणे, रहदारीचे कुठलेही नियम ना पाळणे यालाही मान्यता देण्यात यावी. त्यातूनही तरूणाईच्या उन्मादाचा निचरा होत असतो पण आजकाल पोलीस इतके दंड करू लागलेत की बोलू नका...

याच बरोबर दारू पिऊन नाचणे, अर्वाच्य शिवीगाळ करणे, महीलांची छेड काढणे, पानाचे, गुटख्याच्या पिचकाऱ्या मारणे यातूनही मस्त उन्मादाचा निचरा होत असतो. त्यावरही जी विनाकारण टीका होत आहे ती बंद करण्यात यावी.

गणेशोत्सवाचा सगळ्यांना त्रास झाला, बहिरेपणा आला तरी बेहत्तर पण मिळमिळीतपणा येता कामा नये....

मी तर तुमचा फॅन झालो बुवा...

गणेशोत्सव संपला आता होऊन जाउद्या रणकंदन.
गेले काही दिवस कुठलाही नियम न करता मायबोलीवर बऱ्यापैकी शांतता नांदत होती. राहवलं नाही ना? छान.

आणि गणपतीमध्ये शेवटच्याच दिवशी कशाला दहाही दिवस डॉल्बी लावण्याची परवानगी द्यावी, दहीहंडी आहेच, शिवाय नवरात्रीत तोरण पद्धत आहे, या खेरीज आंबेडकर जयंती, शिवजयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, अजुन कोण महापुरुष राहीले असतील त्यांची जयंती सगळ्याला डॉल्बी लावण्याची सक्ती करावी.

अरे तरुणांमधल्या उन्मादाचा निचरा करण्याचे महान कार्य होत अाहे त्या निमित्ताने.

न्यायालयाने बंदी घातलेली नाही,फक्त आवाजाच्या मर्यादा पाळाव्यात असे आदेश दिले आहेत >> असे तुम्ही म्हणता मग प्रॉब्लेम काय आहे ? जर खुप मोठ्या आवाजात लावायचे असेल तर स्पेशल साऊंड प्रुफ जागा करून , परवाना घेऊन त्यात मोठ्या आवाजात लावावी ( उदा: क्लब्ज)
१) डॉल्बी व डीजे सिस्टीम वाईट नाहीत. त्यांचा गैरवापर वाईट आहे. डॉल्बीचा सुरवातीचा उपयोग हा चित्रपटगृहात आवाजाचा त्रिमितीय परिणाम साधण्याकरता केला गेला.
२) जर उन्मादात नाचायचे असेल तर डॉल्बी वगैरे नसले तरी नाचता येते. नुसते ढोल ताशाचा आवाजही पुरेसा होतो. त्यामुळे हा मुद्दा पटत नाही
३) मुद्दा हा एकाच्या उन्मादाच्या निचर्‍याकरता बाकीच्या १० लोकांना त्रास घडवून आणायचा का? त्याकरता काही इतर निर्धारीत ठिकाणं आहेत ना !
५) नियम मोडले जातात म्हणून अजून नियम मोडा ही वाईट सवय आहे. उलट आम्ही नियम पाळून की बाकीचे पण लाज - शरम वाटून नियम पाळायला लागतील असे धोरण हवे
६) परवानगी रद्द केलेलीच नाही त्यामुळे या प्रश्नाला काही अर्थ नाही.

मोजक्या शब्दात योग्य मुद्दा मांडला... >> आणि मायबोलीकरांच्या ऊन्मादाचा निचरा करण्याच्या सुवर्णसंधीवर विरजण घातले Proud

होळीच्या समोर बोंबा मारल्या कि तरुणाईच्या उन्मादाचा निचरा होतो असे पुरातन काळी मानले जायचे. आता इतरांनी मारलेल्या बोंबा डॉल्बी साउंड लावून ऐकून होतो. Technology तस्मे नमः.

सहमत,
अगदी विसर्जन सुद्धा सुखावह होते, पूर्ण chowpati वर कुठेही फटाके, वाद्ये, नाच इत्यादी प्रकार नव्हते,

धनि आणि आशुचँप यांच्या प्रतिसादानंतर पुन्हा वेगळं काही लिहिण्याची गरज आहे असे वाटत नाही. खरं तर धाग्याचे प्रयोजनच अनावश्यक आणि खोडसाळपणाचे वाटते आहे. तरीही धागालेखक आपल्या मतांशी ठाम व प्रामाणिक असतील तर त्यांनी आपले मुद्दे न्यायालयात मांडावे आणि हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करावा. मायबोलीवर हे मांडण्यात हशील काय? उगाच मायबोली पोस्टरबॉयचा एक धागा काढण्याचा आनंद हिरावला गेला.

या पार्श्वभूमीवर हॅमर कल्चर हा लेख जरुर वाचावा.
लोक हल्ली बलात्काराविषयी पण असच बोंब मारतात. खर तर तो लैंगिक भावनांचा निचरा आहे.
फार असहिष्णु होत चाललेत लोक. हो ना!

१. डॉल्बी व डीजे सिस्टीम खरेच इतक्या वाइट आहेत काय? आपणास काय वाटते?>>

हो. वाईट आहेत. याने आजारी, लहान मुले आणि सगळ्यांनाच त्रास होतो.
बंद सभागृहात लावायला हरकत नाही. रस्त्यावर हे प्रकार लावणे असंस्कृतपणाचे आहे.
गणेशोत्सवातच नव्हे तर लग्नाच्या किंवा इतर कोणत्याही मिरवणूकांतही हा प्रकार नको.

२.या बंदीमुळे यंदाचा गणेशोत्सव मिळमिळीत झाला असे अनेक तरुणांचे मत मी ऐकले ,मला तरी त्यात तथ्य जाणवले.विसर्जन मिरव्णुकीत जान नसल्याचे चित्र होते.>>
जान म्हणजे काय, हुदाडगिरी न करता, कमी आवाजात आणि अगदी आनंदातही अनेक प्रसंग साजरे करता येतात.
पारंपारिक नृत्ये, लेझिम , ताशा यांनीही मिरवणूकीत जान आणता येते.

३. सण, त्यातल्या मिरवणुका ,यातुन जर उन्मादाचा निचरा होत असेल तर काही दिवसांसाठी डॉल्बी सारख्या प्र्कारांना परवाणगी देण्यास काय हरकत आहे?>>
उन्मादाचा निचरा व्हायला बर्‍याच पद्धती आहेत.
सार्वजनिक जागी लोकांना त्रास देऊन निचरा करायची गरज नाही.

४.उच्च न्यायालयाने डॉल्बी चा विषय पोलिसांच्या ताब्यात दिला आहे ,पोलिस या बाबतीत अतिरेक करत आहेत असे वाटते का?
>>
नाही.
५. आपल्या देशात रोज नियम तोडले जातात ,ते ही सर्रास.मग डॉल्बी चालकांनी नियम तोडल्यास एवढा गजहब का होतोय.!
>>
चांगलंच आहे ना. सुरूवात कुठूनतरी व्हायलाच हवी.

६. पुढील वर्षाच्या गणेशोत्सवात डॉल्बी डीजे यांना परवाणगी द्यावी असे आपल्याला वाटते का?>>

अजिबात नाही.

एकंदर यावेळच्या विसर्जनाची मिरवणूक आणि एकंदरच गणेशोत्सव फार छान, शांत आणि सौम्य वाटल्याचे महाराष्ट्रातल्या बहुतेक नातेवाईक/ परिचितांनी सांगितले.
तर उच्च न्यायालयाचे, पोलिसांचे, प्रशासनाचे आणि हे करण्यात सहभाग घेणार्‍या महाराष्ट्राच्या नागरिकांचेही अभिनंदन!

आमच्याही मंडळाने डीजे नव्ह्ता आणला. मग 'अय्या डीजे नाही, कसं नाचणार, ह्या बान्जो वर आम्हाला नाचता येत नाही' इइ वैगेरे सगळं यंग आणि टीन्स कडुन ऐकायला येत होतं. ( आम्हाला बॅन्जो, ताशाच माहित लहानपणापासुन. म्हणुन काही फरक पडला नाही. :-)) पण फक्त थोडावेळच. जसा बॅन्जो आणि ढोल ताशा वाजायला लागले तसे पाय थिरकायला लागलेच सगळ्यांचे.

नियम असेल बंदी असेल तर डीजे ह्यावर्षी नव्हता तर पुढच्या वर्षी तरी का असेल. मंडळांनी नियम मोडु नये.

आणि हो फटाके पण नव्हते.

डिजे ला बंदी होती?
आमच्या इथे असं काही वाटलं नाही ब्वॉ. विश्रांतवाडी रस्त्यावर पण स्पिकर्स च्या भिंती होत्या, आणि आवाजही धडकी भरवणारा होता.

सातीच्या पोस्टला अनुमोदन.

पुराणात सांगितल्याप्रमाणे पूर्वीच्या काळी अग्निअस्त्र, वायुस्त्र/ पवनास्त्र, जलास्त्र वगैरे अस्त्रे वापरुन समोरच्या वर आग/वारा/वायू यांचा मारा केला जायचा...... पण तेव्हा ध्वनिअस्त्र होते वा नव्हते? शंखध्वनीऐवजी वेगळे काही वाचण्यात नै आले बोवा. Wink
तर हल्लीचे डॉल्बी म्हणजे आधुनिक ध्वनिअस्त्र आहे असे माझे मत. Proud

डीज्जेला बंदी असेल बुवा, परंतु स्थानिक गणेश मंडळांनी आगमन, प्राणप्रतिष्ठा, दहा दिवसांचा उत्सव व विसर्जन या सर्व ठिकाणी धडधडवणारे डीज्जे संगीत कर्कश्शपणे वाजवून घेतले. दारं, खिडक्या, भिंती दणाणून थरथरत होत्या इतपत. एका डीज्जे बशीचं प्रचिच टाकते ना!

IMG_20160916_120143.jpg

हे बघा! पार बधीर करून सोडला होता आसमंत.

डीजे, समूह अतिढोलवादन या मेंदु बधीर करणार्‍या नशा आहेत.म्हणून त्या काही लोकांना हव्याहव्याशा वाटतात.

न्यायालयाने डॉल्बि डीजेच्या परवानगीचे अधिकार पोलिस अधिक्षकांना दिले आहेत,डॉल्बी चालकांनी आवाजाची मर्यादा ओलांडणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र देऊनही परवानगी दिली गेली नाही,हा मुद्दा आहे.एरवी चिरीमीरी खाणारे या बाबतीत सक्ती का करत आहेत हा मुद्दा आहे.

एरवी चिरीमीरी खाणारे या बाबतीत सक्ती का करत आहेत हा मुद्दा आहे. >> हे चांगलं आहे की वाईट?

१. डॉल्बी व डीजे सिस्टीम खरेच इतक्या वाइट आहेत काय? आपणास काय वाटते?

रस्त्यावर लावलेल्या अतिशय वाईट आहेत. आजारी, लहान मुले सोडा, सगळ्यांचेच डोके भणाणून सोडतात. २-३ गणपतींसमोर लावलेल्या भोंग्यांचा एकत्र परिणाम होउन जो गोंधळ कानी पडतो, त्यामुळे मीच आजारी पडेन की काय असं वाटाय्ला लागतं! आणि तुमचा हा "उन्मादांचा निचरा" प्रकार दिवस-रात्र संपत नाही. शिवाय दहीहंडी, नवरात्र, कुठल्या कुठल्या जयंत्या, झालंच तर कुणाकुणाचे वाढदिवस वगैरे मिळून वर्षभर चालतो. कुणाचीतरी मजा दुसर्‍याला सजा कशासाठी?

२.या बंदीमुळे यंदाचा गणेशोत्सव मिळमिळीत झाला असे अनेक तरुणांचे मत मी ऐकले ,मला तरी त्यात तथ्य जाणवले.विसर्जन मिरव्णुकीत जान नसल्याचे चित्र होते.

सार्वजनिक गणेशोत्सवाला जे भयाण गोंधळाचे स्वरूप हल्ली मिळालं आहे, ते बघून टिळक शोक करत असतील. डी.जे. बंदीमुळे तो मिळमिळीत झाला आहे असं वाटून तरूणाई देवाच्या नावाखाली पार्टी न करता प्रॉपर पार्टी च्याच नावाने पार्टी करू लागली, तर चालेल!! निदान इतरांचा त्रास वाचेल!

३. सण, त्यातल्या मिरवणुका ,यातुन जर उन्मादाचा निचरा होत असेल तर काही दिवसांसाठी डॉल्बी सारख्या प्र्कारांना परवाणगी देण्यास काय हरकत आहे?

मोठ्या आवाजात नाचण्यासाठी देवाचे नाव आणि सार्वजनिक जागा नको. त्यासाठी गणपती मंडळे जितका खर्च करतात, तेव्हढ्या खर्चात दुसर्‍या सोयी होतील.

४.उच्च न्यायालयाने डॉल्बी चा विषय पोलिसांच्या ताब्यात दिला आहे ,पोलिस या बाबतीत अतिरेक करत आहेत असे वाटते का?

दिलेले काम चोख बजावणे हे पोलीसांचे काम आहे. ते जर नीट करत असतील, तर त्यांचे कौतुक केले पाहीजे.

५. आपल्या देशात रोज नियम तोडले जातात ,ते ही सर्रास.मग डॉल्बी चालकांनी नियम तोडल्यास एवढा गजहब का होतोय.!

आर यू सिरियस? हा प्रश्न असू शकतो?

६. पुढील वर्षाच्या गणेशोत्सवात डॉल्बी डीजे यांना परवाणगी द्यावी असे आपल्याला वाटते का?

अजिबात नाही.

{{{ आपल्या देशात रोज नियम तोडले जातात ,ते ही सर्रास.मग डॉल्बी चालकांनी नियम तोडल्यास एवढा गजहब का होतोय.! }}}

ते दैनंदिन गरजेकरिता तोडले जातात. तिथे दोन्ही पक्षांची सोय असते. उदाहरणार्थ रस्त्यावर अतिक्रमण करणारे फेरीवाले. ते स्वस्तात वस्तू (विशेषतः भाजी) विकतात. लाखो रुपयांची दुकाने विकत / भाड्याने घेऊन त्यांनी भाजी विकली तर अनेकांना ती खरेदी करणे शक्यच नाही. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसलेल्या ठिकाणी टप्पा वाहतूक करणार्‍या सहा आसनी / तीन आसनी रिक्षा किंवा जीप या सर्रास नियमभंग करीत असल्या तरीही त्या ज्या दरात आणि तत्परतेने वाहतूक पुरवतात ते प्रवाशांनाही फायद्याचे असते.

त्यामुळे तिथे पोलिस हप्ता घेऊन नियमभंग होऊ देतात (जे चूकीचेच आहे) कारण दोन्ही पक्षांपैकी एकाचीही तक्रार नसते.

डॉल्बीत कुणाचा फायदा आहे? दोन्ही पक्षांचा तर नक्कीच नाही. उलट सामान्य जनतेकडून आणि स्वयंसेवी संस्थांकडून प्रचंड प्रमाणात तक्रारी येत असताना पोलिस चिरीमिरी खाऊन कशाला परवानगी देतील?

एरवी चिरीमीरी खाणारे या बाबतीत सक्ती का करत आहेत हा मुद्दा आहे. >> उलट बाप्पाने त्यांना इतरही बाबतींमध्ये चिरीमिरी न खाण्याची बुद्धी द्यावी अशी मी प्रार्थना करतो ! Happy

सर्वसाधारणपणे आरोग्यास अपायकारक गोष्टींचे इतक्या हिरिरीने समर्थन का केल जातं?
हल्ली तर अमेरिकेमध्ये सुद्धा ढोल ताशा चं पेव फुटल आहे.
बहुतेक महाराष्ट्र मंडळांच्या कार्यक्रमात ढोल ताशा पथकं असतात.
ढोल ताशा च असला तरी जवळ उभे असू आपण तर खूप जास्त आवाज असतो जो सर्वांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम करतो. वैद्यकीय क्षेत्रातले जाणकार जास्त सविस्तर सांगू शकतात काय दुष्परिणाम होत असतील ते.
पण लक्षात घेत नाही कोणी. असो.

Pages