" प्रणय "

Submitted by अज्ञात on 13 September, 2016 - 03:39

एका कविता संग्रहाच्या प्रकाशन स्मारंभात…
सक्षम स्माननीय प्रतिष्ठाप्राप्त ज्येष्ठ कवयित्री समीक्षिकेचा
अभ्यासपूर्ण जाहीर अभिप्राय …….

" वहिनी, जरा सावधान … !!
तुमचा नवरा प्रेमात पडलाय … !! "

प्रेम ?… लफ़डं ? … प्रतारणा ? …
खल्ल्लास्स ………

असे एक ना अनेक व्यक्तिसापेक्ष अलभ्य दुर्लभ निष्कर्ष ….

"पण ……. "
स्मीक्षिका पुढे म्हणाली …

घाबरू नका …
गैरसमज करून घेऊ नका …

प्रेम हा सहज योग असतो …
आणि " प्रणय "
हा प्रेमाचा अविभाज्य घटक !

गायकाचा स्वरांसोबत
चित्रकाराचा निसर्गाबरोबर
नटाचा भूमिकेशी
सृजनांचा कलाकृतींशी
वेदनांचा संवेदनांशी
अथवा
विचारवंतांचा आत्म्याशी चाललेला संवाद
हा प्रणयच असतो…

अस्वस्थ संवेदनशील कवींचा प्रणय
एकांतात
गूढरम्य स्वप्न आणि अनंत कल्पना
यांंच्याशी अखंड चालू असतो ….

प्रणय म्हणजे
तादात्म्य, एकरूपता, एकतानता, समरसता, समर्पण, विसर्जन,
हरलेपण, हरवलेपण, समाधी, …आनंद …!! ….

प्रणयाची आभा म्हणजे
चैतन्य, ऊर्जा, प्रेरणा, जीवन…!
आसक्तीपलिकडचं आकर्षण …. !
सढळ अढळ नितळ सोज्वळ ……. !!
एक निरामय अनुनय …
परमेश्वरी नात्याशी … … !!!!

कवीला,
प्रेमात पडल्याशिवाय कविता सुचू शकत नाही.
आणि
वैश्विक प्रणयाशिवाय ती बहरू शकत नाही ….

वहिनीं, कवी महाशय आणि कविता
तिघांनाही शुभेच्छा …. !!

…………अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कविता आवडली. प्रणयाचे अनेक प्रकार माहित नसलेले वर्णन केले आहेत. वेगळ्या ढंगातली कविता.