गाठते घरटे कसे हे पाखरू ?

Submitted by सुप्रिया जाधव. on 13 September, 2016 - 00:10

संशयाची कीड़ लागे पोखरू ?
निरसनाने समुळ उच्चाटन करू

आठवांची रोगराई पसरते
विस्मृतीचे किटकनाशक वापरू

ना दिशादर्शक, घडयाळाची सुई
गाठते घरटे कसे हे पाखरू ?

ठाम हो सच्चेपणावर तू तुझ्या
जे पुढे होईल ते ते निस्तरू

कंठते जीवन तुझ्याविण मी असे
व्याघ्र तोंडी अर्धमेले वासरू !

व्यापल्या आभाळभर झाल्या चुका
चल 'प्रिया' चादर धरेची पांघरू

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठाम हो सच्चेपणावर तू तुझ्या
जे पुढे होईल ते ते निस्तरू

व्यापल्या आभाळभर झाल्या चुका
चल 'प्रिया' चादर धरेची पांघरू<<<< शेर आवडले