काही बाही मागत बसते

Submitted by सुप्रिया जाधव. on 13 September, 2016 - 00:01

दिर्घ उसासे टाकत बसते
आठवणींना गाडत बसते

अंधुक-अंधुक वाट धुक्याची
अंदाजाने तुडवत बसते

तुला भेटणे नाही टाळत
स्वतःलाच झिड़कारत बसते

चतुर्थीस चंद्रास पाहिले
आळ घेतला भोगत बसते

डोळ्यातुन मोती ओघळती
आठवणींना वेचत बसते

आकांक्षांचे पंख पसरले
नैराश्याने कापत बसते

केस निखळतो पापणीतला
काही-बाही मागत बसते

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users