स्टोरेज मिडीयावर माहिती साठवल्यावर SAFE EXIT होणे आवश्यक आहे का ?

Submitted by उदय on 12 September, 2016 - 10:10

सन्गणकाची साफ-सफाई करताना त्यात असलेली सर्व माहिती एका पोर्टेबल स्टोरेज डिव्हाईस मधे ठेवली होती. सर्व फाईल्स / डेटा कॉपी झाला असावा हे 'गृहित' धरले आहे. USB बाहेर काढताना सरक्षितपणे बाहेर पडण्याची कळ वापरली नाही. या आधी असे हजारदा केले आहे त्यामुळे तपासण्याची तसदी घ्यावी असे वाटले नाही, कारण कधिच त्रास झाला नाही. डिव्हाईस मधे आधिचा डेटा माहिती खुप आहे.

आता कुठल्याही सन्गणकावर हे पोर्टेबल स्टोरेज डिव्हाईस उघडत नाही.
https://www.amazon.com/Passport-Essential-Portable-External-Silver/dp/B0...

सन्गणकाच्या Device या पर्यायात शिरल्यावर हे Device दिसते आहे, पण त्यावर क्लिक केले तर उघडत नाही, कॉप्युटर मन्द होतो म्हणजे कुठलीच हालचाल करत नाही. थोडक्यात डिवाईस READ होत नाही. क्वचित त्याला 'format' करायचे आहे का अशी विचाराणा होते. ३-४ वेगवेगळ्या सन्गणकावर तपासले, पण काही केल्या डिव्हाईस रिड होत नाही. light blink होतो आहे - त्यामुळे स्टोरेज डिव्हाईस चान्गले असावे असे वाटते.

डिव्हाईस उघडले जात नाही याला SAFE EXIT हा पर्याय न वापरण्याची मोठी शिक्षा मानायचे का ? आता माझ्याकडे काय पर्याय आहे? सन्गणक तज्ञान्नी मदत केल्याबद्दल आधिच धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो.

या पुर्वि, सेफली इजेक्ट न करुनहि तुमचा युएस्बी डिवायस चालला - यु जस्ट गाट लकी...

बर्याचदा, राइट आॅपरेशन इंस्टंटेनियस होत नाहि, (सीपीयुच्या लोडवर अवलंबुन), डेटा कॅश केला जातो आणि क्यु/प्रायाॅरिटीनुसार डेटा डिवायसवर लिहिला जातो. "सेफली इजेक्ट डिवायस" बंप्सअप द प्रायाॅरिटी ॲंड फोर्सेस राइट आॅपरेशन. इफ यु रिमुव द डिवायस बिफोर राइट आॅपरेशन इज कंप्लिटेड; चांसेस आॅफ योर डिवायस बिकमिंग ए पेपरवेट आर हाय...

बाजारात बर्याच डेटा रिकवरी सर्विसेस आहेत; डेटा किती महत्वाचा आहे त्यानुसार खर्चं करण्याची तयारी ठेवा...

एकदा लिनक्स, मॅक यावरही चालवून पाहा. फाईल सिस्टिम्स वेगळ्या असल्यानी एखादवेळेला काम होईल.
नाही तर वर म्हटल्याप्रमाणे करायला लागेल.

यावरचा टीना चा हा धागा पाहा...

या आधी असे हजारदा केले आहे त्यामुळे तपासण्याची तसदी घ्यावी असे वाटले नाही,
>>>>>
मला यातले फारसे कळत नाही, पण सुरुवातीला हा शिष्टाचार पाळून झाल्यावर मी सुद्धा घचकन खेचून घ्यायला लागलो. आजवर काही बिघडले नाही.

पण मला एक शंका आहे. तुमचे डिव्हाईस जे आता उघडले जात नाही त्याला हिच गोष्ट जबाबदार आहे हा अंदाज आपण कसा बांधला? म्हणजे आपण असे हजारदा बिनधास्त केलेत, तर आज अचानक हा विश्वास कसा तुटला. नाही अंधश्रद्धा अश्याच पसरतात म्हणून विचारले Happy

ऋन्मेश - हात-पाय-तोन्ड पोळल्यावर असे का झाले असावे याचा शोध घेतला... मी पण सुरवातीला काळजीपुर्वक USB, स्टोरेज डिवाईस वापरायचो पण...

राज, योकु - धन्यवाद. चुक लक्षात येते आहे. मॅक, विन्डोज (८, १० दोन्ही), linux वर उघडायचा प्रयत्न केला... काहीच हालचाल होत नाही, पण लाईट ब्लिन्क आणि डिवाईस आहे हे device manager मधे दिसते आहे. असो सल्ल्याबद्दल धन्यवाद.

उदय, डाटा महत्वाचा असल्यास, चांगल्या कॉम्प्युटर रिपेअर दुकानात घेऊन जा, डाटा रिकव्हर होईल.
Safely Remove न केल्यास data व्यवस्थीत कॉपी न होणे = फाईल अथवा फ़ोल्डर करप्ट होणे असे होऊ शकते. Hard disk पूर्ण fail होईल असे वाटत नाही.

डिव्हाइस आहे हे मॅनेजरमध्ये दिसते, तर त्याला असाइन्ड लेटर आहे का? असे लेटर दिसत असेल, तर chkdsk एकदा वापरून ड्राइव्ह रिपेअर करून कदाचित तो पुन्हा चालू करता येईल.

chkdsk [volume:] /r ही कमांड आहे.

<डिव्हाइस आहे हे मॅनेजरमध्ये दिसते, तर त्याला असाइन्ड लेटर आहे का? असे लेटर दिसत असेल, तर chkdsk एकदा वापरून ड्राइव्ह रिपेअर करून कदाचित तो पुन्हा चालू करता येईल.>
----- डिव्हाइस चे नाव (WD passport number ***) हे मॅनेजर मधे दिसते आहे, पण त्याला असाइन्ड लेटर नाही आहे.

chkdsk D:/r काही करत नाही. असो, भास्कराचार्य मदतीबद्दल धन्यवाद.

अजुन थोडे प्रयत्न करुन प्रोफेशनल गाठायचा विचार आहे.