चोको ड्रायफ्रूट फज - लहान मुलांचा खाऊ

Submitted by मी अमि on 12 September, 2016 - 04:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/२ कप तूप (वितळवलेले)
१/२ कप साखर
२ चमचे कोको पावडर
व्हॅनिला इसेन्स
१ कप डाय्जेस्टीव्ह बिस्किट्सचा चुरा (मिक्सरमधून फिरवून घ्या)
प्रत्येकी ४-५ बदाम, काजु, अक्रोड (याची पावडर्)

क्रमवार पाककृती: 

एका ताटाला तुपाचा हात लाऊन ते बाजुला ठेऊन द्या. एका कढईत तुप साखर आणि कोको पावडर मिसळून गॅसवर ठेवा. साखर पुर्ण विरघळल्यावर मिश्रण थोडे थंड होऊ द्या. त्यात १-२ थेंब व्हॅनिला इसेन्स घालून मिसळा. मिश्रण आणखी थोडे थंड होऊ द्या. मग त्यात बिस्कीट्स आणि सुकामेवा पावडर घालून व्यवस्थित मिसळा. तुपाचा हात लावलेल्या ताटात मिश्रण काढून पसरा. थोड्या वेळाने वड्या पाडा.

वाढणी/प्रमाण: 
१०-१२ वड्या
अधिक टिपा: 

मुळ कृतीत तुपाऐवजी बटर होते आणि सुकामेवा पावडर वरुन लावायची असे होते.
मी बिस्किटाबरोबरच सुकामेवा मिस्करमधून काढला.

माहितीचा स्रोत: 
तरला दलाल यांची एक कॄती
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो छान झाले होते. मुलांना खुप आवडेल. माझा मुलगा खाण्याच्या बाबतीत खुप चुझी आहे. त्याला ड्राय्फ्रूट्स खायला देता यावेत म्हणून ही कृती ट्राय केली. त्याने आवडीने खाल्ले.

मुख्य म्हणजे बनवायला अगदी सोप्पे आहे.