बदफैली - भाग १

Submitted by निशा राकेश on 10 September, 2016 - 07:12

बदफैली

"शी..बाई ..आज खूपच उशीर झाला...अशोक जर माझ्या आधी घरी आला असेल...तर काही खर नाही माझं" अपर्णा स्वतःशीच बडबडत झपझप चालत होती...

"तरी मी सोहमला म्हणाले..मला हे असं खोटं बोलून नाही जगता येत ..तू कर काहीतरी मी नाही आता अशोकशी खोटं बोलणार.. पण त्याच आपलं एकच मला थोडं सेटल होत देत..माझ्या नवीन बिजनेस मध्ये थोडा जम बसू देत.. नंतर आपण आहोतच कि आपण एकत्र आयुष्यभर...पण माझी मनस्थिती का नाही हा समजून घेत ...माझी होणारी घुसमट नाही दिसत का सोहमला..कि सर्व कळत असूनही तो शिताफीने डोळे झाक करतोय"

अपर्णाच घर अगदी चार पाउलांवर आलं होत….. .अशोक आधीच घरी येऊन बसला होता..घरात टीव्ही चालू असल्याचा आवाज ऐकू येत होता..

"आज का इतकं लेट"अशोक न आल्या आल्या अपर्णाला विचारलं

"थोडं वोर्कलोड होत म्हणून थांबले होते "अपर्णाने त्याच्या कडे न पाहताच उत्तर दिल..आणि किचन मध्ये गेली.. आणि जेवणाचं काहीतरी बनवायला घेतलं..

"खरच..तू ऑफिस मध्येच होतीस ना ?"

"का..?? " अपर्णाने काहीस चिडून विचारलं.

"मी आज स्वतः लौकर सुटलो... तुझ्यासोबत घरी यावं म्हणून मी आज तुझ्या ऑफिसाला आलो होतो..तिकडे गेल्यावर कळलं कि तू हाफ-डे निघून गेली होतीस,, खरं बोलतोय ना मी .. कुठे गेली होतीस" अशोक सर्व शांतपणे विचारत होता...

"गेले होते मशनात ..तुला काय करायचंय" अपर्णा आणखीन चिडली...

"मला काहीच देणंघेणं नसत ...जर तू माझी कुणीही नसतीस...पण दुर्दैवाने का होईना आपण नवरा बायको आहोत...तुला सागावंच लागेल...अपर्णा.." अशोकने तिच्या दोन्ही दंडाला दाबून धरून तिला हिंदळलं.

"हो.. तुझी बायको ..हेच तर दुर्दैवच आहे माझ” अपर्णा स्वतःला त्याच्या पासून सोडवून म्हणाली.
तुला ऐकायचंय ना तर ऐक मी एका माणसाला भेटायला गेले होते...सोहम त्याच नाव …झालं समाधान… आमचं प्रेम आहे एकमेकांवर..आणि आम्ही लग्नही करणार आहोत…. आज ना उद्या तुला हे समजलच असत...किंवा ह्या आधी तुला माझ्या संशय आला असेल.." अपर्णा सर्व बिनधास्तपणे अशोकला ऐकवत होती...

“आणि तुला ह्या गोष्टी सांगताना जराही लाज नाही वाटत” आता अशोकचाही आवाज चढला..

“लाज..का…. त्रास होतोय...खरं बोलतेय ना आता मी..पण हि वेळ तूच माझ्यावर आणलीस अशोक..”

"काय...माझ्यामुळे...माझा काय संबद्ध ...मी काय असं वागलो जेणे करून तुला ह्या थराला जावं लागल."

"ते तू स्वतःच्या मनाला विचार...मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाहीये,,."

"ठीकेय... असंही बोलायला बाकी काय राहिलंय ..तुला माझा इथून पुढे कसलाच त्रास नाही होणार."
अशोक काहीच न बोलता बाहेर निघून गेला...

अपर्णाला राहवलं नाही...अशोक बाहेर निघून जाताच...तिने आतून दार लावून घेतलं...आणि सोहम ला फोन केला...

"हॅलो..सोमू ...मी अपर्णा बोलतेय.."

"अप्पू...काय ग असा अवेळी फोन,,घरी सर्व ठीकेय ना?"

"काहीच ठीक नाहीये... मी अशोक ला आपल्या बद्दल सांगितलं. आज .."

"का...य ?..मग त्याची प्रतिक्रिया काय होती.."

“काहींनाही..तो म्हणाला इथूनपुढे माझा त्रास तुला नाही होणार आणि निघून गेला बाहेर”

"मला वाटत अपर्णा तू त्याला फोन कर ….बघ तरी तो कुठे गेलाय .. त्याने सर्व इतकं शांतपणे घेतलं म्हणून मी बोलतोय .."

"सोमू पण का …आता कशासाठी,,,जाऊ दे ना.. त्याला कधीना कधी हे समजायलाच हवं होत...तू आहेस ना माझ्या सोबत.. आता आपल्याला कुणाचीच भीती नाही राहिली .. हो ना… आपल्या एक होण्यापासून कुणीच नाही अडवू शकत..हॅलो..सोमू तू ऐकतोयस ना.,..हॅलो..हॅलो..."

तीने पुन्हा फोन ट्राय केला " The Number you have calling is currently switch - off "

फोन बंद ...बॅटरी डाउन झाली असेल...कि मुद्दामच कट केला असेल फोन..आपण का असा विचार करतोय,
मला माझ्या प्रेमावर...माझ्या सोमूवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे.. तो कधीच ....पण...तरीही मला असं का वाटतंय कि त्याने मुद्दाम फोन कट केला"

रात्रीचे दहा वाजून गेले... अशोक ला बाहेर पडून दोन तासांच्या वर झालेत कुठे गेला असेल हा...फोन करू का मी ह्याला...तीने फोन केला...फोन घरातच वाजत होता... अरे बाप रे.. फोन घरीच ठेऊन गेला हा.."

तीने सहज म्हणून त्याचा फोन हातात घेतला....त्याच्या वॉलपेपरवर दोघांचा लग्नाआधीचा फार जुना फोटो होता....ते जेव्हा पहिल्यांदा भेटले होते..तेव्हाच...फोटो पाहताच तिच्या डोळ्यासमोरून चार वर्षांपूर्वीचा काळ झळकू लागला....

किती सुंदर दिवस होते ते.. अशोक आणि मी घरच्यांचा विरोध पत्करून पळून जाऊन लग्न केलं....काय होत आमच्याकडे अशोकच्या एका मित्राने आम्हाला भाड्याने जागा मिळवून दिली ...त्याच्या डिपॉजिटचे पैसे आणि पुढचं तीनचार महिन्याचं भाडं देखील त्यानेच दिल...नशीब दोघाचे जॉब होते म्हणून निदान जेवत तरी होतो दोन वेळ ...पण घरखर्च , पाणी बिल...लाईटबील ...दोघांच्या तुटपुंज्या पगारात भागत न्हवत....त्यातच अशोकला एक नवीन नोकरीची संधी मिळाली...पगार दुप्पट होता..पण त्याच्या कामाचा वेळही दुप्पट वाढणार होता.. पण तरीही ह्या हलाखीच्या दिवसात त्याला हि संधी स्वीकारणं गरजेचं झालं..
दिवसाचे पंधरा -पंधरा तास अशोक नवीन कामात खपत होता... अपर्णा मात्र आठ- नऊ तास काम करायची आणि घरी यायची रोजची रुटीन काम झाली कि उरलेला बराच वेळ तिला खायला उठायचा ...
टीव्ही पाहणं, वाचन करणं, हे तर चालूच होत ...पण तिला फार एकटं एकटं वाटत राहायचं..

अशोक घरी आला कि खूप थकलेला असायचा तो जेऊन लगेच झोपायचा ...अपर्णाला खूप वाईट वाटायचं ती त्याला खूपदा म्हणाली नको करुस हि नोकरी आपण राहू सुखी छोट्याशा संसारात मला काहीच नको अशोक फक्त तू हवायस …

"असं कस म्हणतेस.. अपर्णा .. आपल्याला आपलं घर नको का घ्यायला...किती दिवस असं भाड्याने राहणार आपण..."

अपर्णा पुढे काहीच बोलू शकत न्हवती,,,कारण अशोकच म्हणणं पण खरं होत...त्यांना त्यांची हक्काची जागा हवी होती...

अशोक ने तीन वर्षांत बरीचशी रक्कम जमा केली... आता त्यांना त्यांचं स्वतःच घर घेता येणार होत...

ते दोघे दर रविवारी...जागा बघायला जात असत...

आणि त्यांना एक फ्लॅट पसंतही पडला...पण तो त्यांच्या बजेटच्या बाहेरचा होता...फ्लॅटचा मालक चांगला होता त्याने फ्लॅटची चावी देखील त्यांच्या हातात दिली ..पण उरलेले पैसे मात्र त्यांना सहा महिन्यांच्या आत फेडायचे होते...कारण त्या मालकाला कायमच दुबई सेटल व्हायचं होत...

अशोक नाही म्हणत होता...पण अपर्णाला मात्र तो फ्लॅट मनापासून आवडला...तिला नाही म्हणवत न्हवत...त्यांनी तो फ्लॅट हो - नाही करतच घेतला...

उरलेल्या पैशांचं काय...कुठून आणायचे पैसे...

दोघेही सतत ह्याच विचारात होते….त्यांचं शिफ्टिंग झालं..त्यांनी फ्लॅटमध्ये राहायला सुरुवात देखील केली.....फ्लॅटचा मालक दर पंधरा दिवसांनी आठवण करून द्यायला फोन करायचा...

अशोकने त्यांच्या सर्व मित्रांना विचारून झालं...पण कुणाकडेच इतकी मोठी रक्कम न्हवती...
अपर्णा देखील टेन्शन मध्ये होते.. तिने देखील तिच्या बॉसला विचारलं कामातल्या इतर सहकार्यांना विचारलं...पण कुणाकडूनही तिला मदत मिळाली नाही.

पैसे परत करायला आता फक्त एक महिन्याचा अवधी शिल्लक होता.. अपर्णाचं दुसरं कशातच लक्ष न्हवत.. तिला कोणत्याही परिस्थिती हा फ्लॅट सोडायचा न्हवता.. विचार करतच रस्ता क्रॉस करत असतानाच एका गाडीने तिला ठोकलं...तिची शुद्ध हरपली.. गाडी वाल्याने तिला उचलून हॉस्पिटल गाठलं .. अपर्णाला जास्त लागलं न्हवत पण घाबरल्यामुळे तिला भोवळ आली होती...थोड्या वेळात ती शुद्धीवर आली..

"हॅलो.... आता कस वाटतंय" तो गाडीवाला अनोळखी इसम तिला विचारत होता...

"मी,..मी...इथे कशी आले." अपर्णाने त्या इसमाला विचारलं...

"तुम्हाला माझ्या गाडीमुळे छोटासा अपघात झाला.. तुमची शुद्ध हरपली होती...पण आता एकदम नॉर्मल आहात आपल नाव….”

"मी अपर्णा ….. अपर्णा अशोक काळे."

"मी सोहम….. सोहम म्हात्रे.. चला तुम्हाला घरी सोडतो.."

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users