पाठीशी हमेशा---( गणेश चतुर्थीच्या निमिताने माझी एक रचना. )

Submitted by निशिकांत on 5 September, 2016 - 10:57

पाठीशी हमेशा---( गणेश चतुर्थीच्या निमिताने माझी एक रचना. )

माझा श्रीगणेशा | पाठीशी हमेशा |
वसे दाही दिशा | माझा देव || १ ||

ओंकाराचे रूप | ब्रह्मांड स्वरूप |
ह्रदयी आप्रूप | दर्शनाची || २ ||

गणेशाची स्वारी | आली माझ्या दारी |
आता नको वारी | पंढरीची || ३ ||

उजेड फाकला | अंधार झाकला |
हाच रे दाखला | देवा तुझा || ४ ||

बुद्धीचा सागर | दयेचे आगार |
संसारी माघार | नको आता || ५ ||

ब्रह्मानंदी टाळी | तुझ्या पायतळी |
गेली रात्र काळी | तुझ्यामुळे || ६ ||

मनातला भाव | जाणी तूच राव |
त्वरे मज पाव | लंबोदरा || ७ ||

विनंती माऊली | देई बा साऊली |
परत पाऊली | नको धाडू || ८ ||

म्हणे "निशिकांत" | होतो मी अशांत |
येता एकदंत | समाधान || ९ ||

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users