आपली मायबोली यंदा विशीत प्रवेश करतेय. तेव्हा, तिच्या या वाढदिवसाच्या गणेशोत्सवात मास्टरशेफ्सना ’मायबोली-स्पेशल’ पदार्थ बनवायला लावावेत, असा विचार करून आम्ही आणतोय एक सहजसोप्पी, पण डोकं चालवायला लावणारी पाककृती स्पर्धा!
या स्पर्धेचा मुख्य नियम फक्त एकच - पदार्थाचे मुख्य घटक फक्त ’म', 'य', 'ब', 'ल' यांपैकी कोणत्याही तीन अक्षरांपासून सुरू होणारे असावेत. चीटिंग नॉट अलाऊड!!! म्हणजे ’म’वरून ’मावा’ चालेल, पण ’म’वरून 'मळलेली कणीक' चालणार नाही. 'ब'वरून ’बटाटा’ चालेल, पण ’ब’वरून 'बोगातु' चालणार नाही. बाकी उपघटक हवे तेवढे आणि हवे तसे वापरू शकता.
चला तर मग, यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं चटकदार, पौष्टिक, मजेदार अशा 'मायबोली-स्पेशल' पदार्थांच्या पाककृती लिहूया.
स्पर्धेचे नियम -
१. मुख्य घटक-पदार्थांची नावं 'मराठी'च असायला हवीत. दह्याला योगर्ट म्हणालात तर फाऊल.
२. चवीला फोडणी घालू शकता. सोबत चटणी, केचप, सॅलड ड्रेसिंग, कन्डेन्स्ड मिल्क, फळांचे पल्प वगैरेचा वापर चालू शकेल. हे पदार्थ 'मुख्य घटक' ही असू शकतात. फक्त महत्वाच्या नियमात बसणारे हवेत.
३. तयार पदार्थाच्या चवीवर बंधन नाही. पदार्थ तिखट किंवा गोड कसाही चालू शकेल.
४. सामिष पदार्थ वापरता येणार नाहीत. पाककृती संपूर्ण शाकाहारी असावी.
५. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. (यासाठी मायबोली सदस्यत्त्व आवश्यक आहे.) हा ग्रूप गणेशचतुर्थीच्या दिवशी (म्हणजेच, ०५ सप्टेंबर, २०१६, भारतीय प्रमाणवेळ) खुला होईल.
६. मायबोलीकरांचा नेहमीचा उत्साह लक्षात घेता या वर्षी आम्ही एका आयडीच्या २ प्रवेशिका स्वीकारण्याचं ठरवलेलं आहे. एक आयडी जास्तीत जास्त दोन प्रवेशिका देऊ शकतो. दोन्ही प्रवेशिकांमधल्या पदार्थांच्या चवींवर बंधन नाही. विजेतेनिवड मतदान पद्धतीनं होणार असल्यानं एकाच स्पर्धकाच्या दोन्ही प्रवेशिका निवडून आल्यास कुणाचीही हरकत नसावी.
७. आपली प्रवेशिका 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपामध्ये गणेशचतुर्थीच्या दिवसापासून (म्हणजेच ०५ सप्टेंबर, २०१६, भारतीय प्रमाणवेळ) अनंतचतुर्दशीपर्यंत (म्हणजेच १५ सप्टेंबर, २०१६, अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) कधीही प्रकाशित करावी.
८. मायबोलीवर पूर्वप्रकाशित पाककृती इथे देता येणार नाही.
९. धाग्याचे शीर्षक - <मायबोली मास्टरशेफ>-<सदस्यनाम>-<पदार्थाचे नाव> असे असावे.
१०. पाककृतीबरोबर तयार पदार्थाचं प्रकाशचित्र देणं अनिवार्य आहे.
११. विजेत्यांची निवड मतदानपद्धतीनं केली जाईल. मतदान करण्यासाठी मायबोलीचं सदस्यत्व आवश्यक आहे.
___________________________________________________________________________
या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहोत!
खास लोकाग्रहास्तव, यावर्षी दोन मास्टरशेफ निवडले जाणार आहेत.
कृपया खालील लिंक वर जाऊन आपल्या आवडत्या गोड आणि तिखट पाककृतीला आपले अमूल्य मत द्या
'तिखट' मास्टरशेफ - मतदान
http://www.maayboli.com/node/60250
'गोड' मास्टरशेफ - मतदान
http://www.maayboli.com/node/60251
मतदानाचे धागे येत्या रविवार म्हणजे २५ सप्टेंबरपर्यंत खुले असतील.
विजेत्यांची घोषणा मंगळवार दि. २७ सप्टेंबर रोजी केली जाईल.
ममो, पाकृ + फोटो म्हणजे जरा
ममो, पाकृ + फोटो म्हणजे जरा तयारीतच काम करायला लागेल! माझ्याकडे पाकृ कल्पना आहेत परंतु ते पदार्थ निगुतीने बनवणे व बनताना प्रचि हे दोन्ही सध्या वेळेच्या कमतरतेमुळे कितपत जमेल याची शंका आहे!
दरवर्षीच ही पाकृ स्पर्धा
दरवर्षीच ही पाकृ स्पर्धा तशी चॅलेंजिंगच असते.
अकु , तुला वेळ मिळो आणि तुझी रेसिपी इथे येऊ दे हीच इच्छा
म, य, ब, ल घटक पदार्थांची
म, य, ब, ल घटक पदार्थांची कल्पना आवडली तरी आपला पास. प्रवेशिकांबद्दल मात्र भलती उत्सुकता आहे.
बाकी आम्ही दह्याला योगर्ट म्हटलं तर फाउल आणि तुम्ही मात्र फळांच्या गराला पल्प म्हटलं तर नियमभंग नाही म्हणता?
सिंडी, गर काय पल्प काय दोन्ही
सिंडी, गर काय पल्प काय दोन्ही म य ब ल मध्ये नाही बसत. दह्याला योगर्ट म्हणून बसवू नका प्रमुख घटकात एवढंच म्हणणं आहे
बरं बरं
बरं बरं
संयोजक, ल पासून लोणकढी तूप
संयोजक, ल पासून लोणकढी तूप चालेल काय?
सॉरी, मी फारच शंका विचारतेय.
आशिका, नाही चालणार. ते तुपच
आशिका, नाही चालणार. ते तुपच आहे.
यीस्ट पण नाही चालणार ना कारण
यीस्ट पण नाही चालणार ना कारण त्याला मराठी शब्द खमीर असा आहे .
मनीमोहोर व्हाय धिस कोलावेरी
मनीमोहोर व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी डी????

मनीमोहोर , यीस्ट-> खमीर साठी
मनीमोहोर , यीस्ट-> खमीर साठी +१
काही काही आपल्या तोंडवळणी
काही काही आपल्या तोंडवळणी पडलेय आहेत की ते मराठी की हिंदी लक्षातच येत नाही खमीर हिंदी म्हणतात मराठी ? तसाच मला मगज साठी पण प्रश्न पडला त्या बिया आहेत उशिरा ट्युब पेटली
म ब दोन्हीत बसतंय 
ममो, तुमचे म्हणणे बरोबर आहे.
ममो, तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण खमीर हा मूळ पर्शियन शब्द मराठीत आणि हिंदीतसुद्धा वापरला जातो, तसाच यीस्ट हा इंग्रजी शब्दसुद्धा मराठीत वापरला जातो. त्यामुळे 'य' साठी यीस्ट वापरता येईल.
यीस्टला बाद करु नका हो, य
यीस्टला बाद करु नका हो, य वरुन पदार्थांचा तसाही दुष्काळ आहे आणि खमीर हा शब्द जरी कधीतरी कोठेतरी वापरला जात असला तरी हार्डकोअर स्वयंपाकाची पुस्तकेही यीस्ट हाच शब्द वापरतात. तेव्हा यिस्टला राहु द्याच प्लिज.
यीस्टला बाद करु नका हो, य
यीस्टला बाद करु नका हो, य वरुन पदार्थांचा तसाही दुष्काळ आहे आणि खमीर हा शब्द जरी कधीतरी कोठेतरी वापरला जात असला तरी हार्डकोअर स्वयंपाकाची पुस्तकेही यीस्ट हाच शब्द वापरतात. तेव्हा यिस्टला राहु द्याच प्लिज.
ल - लोणकढे तूप - तुप हे
ल - लोणकढे तूप - तुप हे कायम लोणकढेच असते ना.... जर ते लोणकढे नसेल तर ते डालडा.
डालडा हाही ब्रँड आहे
डालडा हाही ब्रँड आहे मॅगीसारखा
वनस्पती तूप हा योग्य शब्द आहे.
बो पास्ता .... हे प मानायचे
बो पास्ता .... हे प मानायचे का ब ?
सगळे पास्ते बाद का ?
लोणी म्हणून अन्सॉल्टेड बटर
लोणी म्हणून अन्सॉल्टेड बटर चालू शकेल काय?
बो = कंठपुष्प ?
बो = कंठपुष्प ?
अनिलचेंबूर, बो असला तरी तो
अनिलचेंबूर, बो असला तरी तो पास्ताच आहे त्यामुळे बाद.
भानुप्रिया, हो कुठल्याही प्रकारचे बटर लोणी म्हणून चालेल.
मी मास्टर शेफ साठी एक पाकृ
मी मास्टर शेफ साठी एक पाकृ लिहीली आहे पण ती गणेशोत्सव २०१६ मध्ये कशी आणु ते समजत नाहीये संयोजक प्लीज मदत करा
मनीमोहोर, तो धागा उघडुन
मनीमोहोर, तो धागा उघडुन संपादन वर क्लिक करा.
मजकूराच्या खाली जा. तिथे वाचक वर्ग, 'मायबोली गणेशोत्सव २०१६' निवडा.
सेव्ह कारा.
मानव धन्स. झाल बरोबर
मानव धन्स. झाल बरोबर
ह्या ग्रूपमध्ये सामील
ह्या ग्रूपमध्ये सामील झाल्यावर उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' ह्यावर टिचकी मारुन पाककृती लिहिता येईल.
मायबोली स्पेशल मास्टरशेफ
मायबोली स्पेशल मास्टरशेफ स्पर्धेची घोषणा झाल्यापासून सगळे मास्टरशेफ्स खडबडून जागे झालेत. म य ब ल अक्षरांपासून सूरू होणा-या नविन घटक पदार्थांची नावे कळली. टंकिकृत चर्चा वाचून खूप करमणूक झाली. आता येऊत द्या एकसे एक पाकृ. सर्व स्पर्धकांना ऑल द बेस्ट.
म, य, ब, ल!! मस्त आहे ही
म, य, ब, ल!!
मस्त आहे ही स्पर्धा संयोजक. मजा येईल.
गणेशोत्सवाच्या लँडिंग पेजवर या किन्वा बाकीही उपक्रमांच्या प्रवेशिकांची यादी का येत नाहीये?
शब्दखुणांवर सर्च केलं तर फक्त पग्याची प्रवेशिका दिसतेय. एकच आली आहे का प्रवेशिका? नवीन लेखनातून शोधून काढणं अवघड आहे.
म पासुन मिल्क मेड किंवा मिठाई
म पासुन मिल्क मेड किंवा मिठाई मेड राकेश का? आणि गणेशोत्सव२०१६ मधे आता सदस्य बुरा येईल का त्या साठी काय करावे लागेल.
आता लँडिंग पेजवर सर्व
आता लँडिंग पेजवर सर्व प्रवेशिका आल्या आहेत.
वर राकेश एवजी चालेल वाचावे
वर राकेश एवजी चालेल वाचावे सॉरी प्रिंट मिस्टेक.
गणेशोत्सव २०१६ चे सदस्य
गणेशोत्सव २०१६ चे सदस्य बनायचे आहे .काय करावे लागेल. आणि त्यात म पासुन मिल्क मेड किंवा मिठाई मेड चालेल का?
Pages