श्रावणात

Submitted by धनुर्धर on 31 August, 2016 - 08:59

शुभ्र धुक्यावर बसून अलगद
बरसत येती श्रावणधारा
कधी उन्हाचे उष्ण कवडसे
कधी सरीत नाहते वसुंधरा

हिरवी पिवळी झूल पांघरूण
पडून निपचित सह्यंकडे
रंग घेऊनी पाकळी वरती
गर्द फुलांचा सडा पडे

नितळ जळाचे शुभ्र धबधबे
फेकून देती खालती अंगे
रिक्त झाले मेघ सावळे
फिरून येती वार् या संगे

ऊन पाऊस खेळ खेळती
इंद्रधनुच्या द्रावणात
रुजून येती अनेक नाती
ओल्या चिंब श्रावणात

. . . . धर्नुधर . . . .

Group content visibility: 
Public - accessible to all site users