इतिहास

Submitted by धनुर्धर on 27 August, 2016 - 14:06

वाडे पडले बुरुज डासळले
तटबंदीचाही ह्रास
का पुसून टाकला आपण
आपला हा इतिहास ?

जिथे लढले पुर्वज आपले
स्वराज्य कारणे रक्त तापले
शत्रूला ही जिथं कापले
का न आम्ही ते सारे जपले?

वीर लढले शुर पडले
तमा नसे आम्हास
का पुसून टाकला आपण
आपला हा इतिहास ?

तळपल्या होत्या जिथे तलवारी
धाक घातला दिल्ली दरबारी
नांदत होती राजनगरी
उजाड खंडर आज सारी

स्वराज्याचे वैभव सारे
का झाले भकास?
का पुसून टाकला आपण
आपला हा इतिहास ?

किल्ले आपले असे देखणे
सह्यांद्रीचे जणू दागिने
कातळ कोरीव दुर्गम ठाणे
लढून मिळवले होते शिवबाने

मोल याचे न जाणले आम्ही
हा केवढा दैवदुर्विलास
का पुसून टाकला आपण
हा आपला इतिहास ?

. . . धनुर्धर . . . . .

Group content visibility: 
Public - accessible to all site users