एक खोट बोलू बाई.... दोन खोट् बोलू

Submitted by kalpana_053 on 25 August, 2016 - 20:34

"पसंत आहे मुलगी " मालिका संपली व मनाला हुरहूर लागली..... अजून काही काळ ही मालिका चालू रहायला हवी होती. "एक खोट बोलू......" सारखी लोकांना मूर्ख बनवणारी, कोणताही संदेश न देणारी, उलट खोट्याचा सातत्याने विजय दाखवणारी मालिका चालूच राहते व "पसंत आहे मुलगी" सारखी चांगला संदेश देणारी मालिका बंद होते पाहून वाईटही वाटले. वाईट वागणाऱ्यांशी देखील कोणतेही कट कारस्थान न करता, अत्यंत सकारात्मक भावनेने जेव्हा "उर्मी" नावाचे करेक्टर संपूर्ण घराला विशेषतः सासर-माहेर दोन्ही घरांना विचाराची चांगली दिशा देते..... तेव्हा अशा सारख्या मालिकेची जास्त गरज आहे असे वाटते. आजच्या काळातही पत्रिकेवर जास्त विश्वास ठेवून व गुणाकडे दुर्लक्ष देणारी अनेक कुटुंबे आहेत....., मंगळावर (ग्रह) तर माणूस प्रत्यक्ष जाऊन आला तरीही पत्रिकेतला मंगळ मात्र अनेक मुलीच्या लग्न न जमण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. काही वेळेस "पत्रिका" ही तर लग्नाच्या बाजारात मुलाकडून किंवा त्याच्या घरच्यांकडून नकार कळवण्यासाठी एक साधन म्हणून वापरली जाते. त्यावेळेस सोयीस्करपणे "पत्रिकेवर" विश्वास नसला तरी ढोगीपणाने त्याचा आधार घेतला जातो. सोयीस्कररीत्या पत्रिका यां गोष्टींचा वापर करून घेतला जातो अथवा त्याकडे स्वतःच्या स्वार्थासाठी दुर्लक्ष केले जाते...... किंवा त्यावर दैवी उपाय केले जातात. अशा वाईट विचारांचा ढोगीपणा दर्शवणारी "पसंत आहे मुलगी" ही मालिका होती.... या पत्रिकेच्या माध्यमातून समाजात चालणाऱ्या अजून खूप काही वाईट गोष्टी यां मालिकेमधून दाखवता आल्या असत्या..... विशेषतः खेड्यापाड्यात मालिका पाहिल्या जातात त्या लोकांना एक चांगला विचार देता आला असता..... अशा वेळी अक्षरश: ही चांगली, उद्बोधक मालिका घाईघाईने गुंडाळून बंद करण्यात आली याचे वाईट वाटले....... आणि त्याजागी काय आली तर "माझ्या नवऱ्याची बायको....."! बंदच करायची होती तर "नांदा सौख्याभरे....." करायला काय हरकत होती......?. ललिताचा खोटेपणा प्रेक्षकांनी किती काळ बघत रहायचा? व त्यामधून काय शिकायचे? खोटे बोलायला? झी मराठी चे हे चुकलेच असे मला तरी वाटते.
सौ. कल्पना धर्माधिकारी....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mi sahmat aahe...hi ekach malika changali hoti Z Marathi varachi...kathanakala veg hota...tech tech dalan navhate ...mi hi malika khup miss karte...

बंदच करायची होती तर "नांदा सौख्याभरे....." करायला काय हरकत होती......?. ललिताचा खोटेपणा प्रेक्षकांनी किती काळ बघत रहायचा? व त्यामधून काय शिकायचे? खोटे बोलायला? झी मराठी चे हे चुकलेच असे मला तरी वाटते.>>> अगदी अगदी !!! ह्या मालिकेतलं कुणीच आवडत नाही.. सगळा खोटेपणाचा कारभार!
पसंत आहे मुलगी छान होती पण नंदिनी ला जास्त फोकस केल्यामुळे खूप राग यायचा.. त्यापेक्षा नंदिनीचे प्रयत्न उर्मी प्रत्येक वेळी हाणून पाडते असं दाखवलं असत तर कदाचित प्रेक्षकांना अजून आवडली असती.. पण मला वाटतंय ललिता आणि स्वानंदी ला अजून झेलावे लागणार बहुतेक.. सुचित्रा बांदेकर निर्मात्या आहेत ना Uhoh

>> मंगळावर (ग्रह) तर माणूस प्रत्यक्ष जाऊन आला

अरेच्या ही बातमी मी मिस्स केलेली दिसतेय.