लिहित असतो, कळत नाही हल्ली

Submitted by रसप on 21 August, 2016 - 02:53

लिहित असतो, कळत नाही हल्ली
मी मलाही सुचत नाही हल्ली

जे कधी जमलेच नाही तेही
रोज करणे चुकत नाही हल्ली

झोप नुकती लागलेली असते
मी पहाटे उठत नाही हल्ली

आपले नाते असावी अफवा
नोंद कुठली मिळत नाही हल्ली

चंद्र होई चिंब येथे पूर्वी
एक घागर बुडत नाही हल्ली

आतड्यांना पीळ पडला आहे
आतड्यांना दुखत नाही हल्ली

पंढरीच्या कानड्या राजाला
राज्य करणे जमत नाही हल्ली

....रसप....
१६ ऑगस्ट २०१६

http://www.ranjeetparadkar.com/2016/08/blog-post.html

(बऱ्याच दिवसांनी काही लिहिले आहे. नुसतंच अधून मधून येऊन आपलं काही बाही पोस्ट करून निघून जायचं, हे चूक आहे. पण काही सुचत नसल्याचं नैराश्य काही वाचावंसंही वाटू देत नव्हतं बहुतेक. उगाच कारणं न देता मी कबूलच करतो की मी इथे गेल्या काही महिन्यांत फिरकलोच नाहीय. क्षमस्व.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झोप नुकती लागलेली असते
मी पहाटे उठत नाही हल्ली

आपले नाते असावी अफवा
नोंद कुठली मिळत नाही हल्ली

पंढरीच्या कानड्या राजाला
राज्य करणे जमत नाही हल्ली<<<

शेर आवडले रसप

चंद्र होई चिंब येथे पूर्वी
एक घागर बुडत नाही हल्ली

आतड्यांना पीळ पडला आहे
आतड्यांना दुखत नाही हल्ली

पंढरीच्या कानड्या राजाला
राज्य करणे जमत नाही हल्ली

खासच.

-दिलीप बिरुटे

छान गझल!

>>>झोप नुकती लागलेली असते
मी पहाटे उठत नाही हल्ली

आपले नाते असावी अफवा
नोंद कुठली मिळत नाही हल्ली>>>मस्त शेर!

अवांतर—
>>>काही सुचत नसल्याचं नैराश्य>>>कधी-कधी नैराश्यही बरंच काही सुचवून जातं की लिहायला! शुभेच्छा!

लिहित असतो, कळत नाही हल्ली
मी मलाही सुचत नाही हल्ली

झोप नुकती लागलेली असते
मी पहाटे उठत नाही हल्ली

आपले नाते असावी अफवा
नोंद कुठली मिळत नाही हल्ली >>>>>>>>>>
----वा वा