तुझ्यासाठीच जगले आजवर कळले मला (तरही)

Submitted by सुप्रिया जाधव. on 20 August, 2016 - 11:51

तुझ्याविण व्यर्थ हे सारे प्रहर कळले मला
तुझ्यासाठीच जगले आजवर कळले मला

व्यथांचा मोर होता नाचरा पदरावरी
सुखांची काचते नाजूक जर कळले मला

धरेने हट्ट केलेला नभाचे व्हायचा
तिच्या-त्याच्यातले अंतर जबर कळले मला

कटाक्षांचा विखारी व्हायचा नाही असर
रिचवण्याची सवय होते जहर कळले मला

नको तेव्हा बरसणारा अचानक पांगतो
कठिण सांभाळणे ह्याची लहर कळले मला

कुण्या गुंजारवे नाही उमललेली फुले
फुले फुलताच घुटमळतो भ्रमर कळले मला

किनारा गाठल्यानंतर त्वरेने परतती
कुणी नसतो कुणाचा जन्मभर कळले मला

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>कटाक्षांचा हवा तितका कुठे होतो असर ?
रिचवण्याची सवय होते जहर कळले मला

तुझ्या एकेक खेळीला नव्याने खेळ तू
अरे नशिबा तुझी फिरते लहर कळले मला>>>सुरेख!

>>>कुण्या गुंजारवे नाही उमललेली फुले
फुले फुलताच घुटमळतो भ्रमर कळले मला>>>जबरदस्त!