सातकापे घावन

Submitted by इन्ना on 20 August, 2016 - 05:46

काही चवी, वास , पदार्थ , बाहेरच वातावरण , सणवार ह्याच एक घट्ट नातं असत. अन प्रत्येक घराच आपापल असत! आईकडे श्रावण म्हणजे नारळी भात गोकुळाष्टमीचा भरगच्च प्रसाद, फराळ आठवत मला. पण सासरी श्रावणी सोमवार ,नारळीपोर्णिमा ,पंचमी ची सवाष्ण , अन वार्षीक सत्यनारायण असे ठळक कार्यक्रम असतात. अन काही पदार्थ केवळ ह्याच दिवशी बनतात. आल्याच रायत, मिरचीच पंचामृत, वाल घालून पडवळाची भाजी , आंबट बटाटा, पातोळ्या , खांडवीच्या वड्या, काकडीच धोंडस केळ्याची कोशिंबीर वगैरे.

मी तरी श्रावणाची वाट ह्या पदार्थांसाठी पहाते. Happy काल पंचमी आणि सत्यनारायण असा डबल धमाका होता! पातोळ्यांचा बेत केला होता. तांदुळ गुळ अन नारळ हे माझे ऑटाफे इन्ग्रेडियंट्स. कोकणात गोडाचे पदार्थ ह्याच ३ स्टार कलाकाराना घेउन होतात बर्‍याचदा.

पातोळ्या म्हणजे हळदीची पानं शोधणं आल. ऐन वेळी ऑफिसात डोंगरभर काम उपसावी लागल्यानी हळदीची पान काही मिळाली नाहीत. मग हा सातकाप्याचा घाट घालायचा ठरवल. ह्या आधी आळश्याची सातकापी घावनं ( डोश्याच्या पिठात चुन ( गुळ खोबरं) ) करण्याचा प्रचंड (?)अनुभव गाठीशी होताच. पण ओरिजिनल रेसिपी तांदुळ भिजत घालून , वाटून घावन , हा आजवर न जमलेला प्रकार. त्यात 'मी काही कधी केली नाहीयेत हां, पण माझी काकी मस्त करायची , खरपूस!कोकणातल्या घरी! ' अस म्हणून आम्च्या ज्ये नांनी उत्साहाला सूरूंग लावायचा प्रयत्न केला . पण माझे स्वैपाकघरातले प्रयोग म्हणजे , आ बैल मुझे मार प्रकारातले अन एकूणच नाही जमणार म्हटल की दाखवतेच असा ( मूर्ख) बाणा असल्यानी, हेच्च करणार अस डिक्लेअर केल. Uhoh

आदल्या रात्री लक्षात आलं की मैत्रीणीनी नेलेला बिडाचा तवा घरात परत आला नाहिये , तांदुळ भिजत घालून वाटून पुरेसा चिकटपणा येइल का ह्याची रंगित तालिम केलेली नाहीये , नेहेमीचा नॉनस्टिक तवा कोटिंग गेल्यानी बदलायला झालाय अन म्हणून सध्या वापरायचा नाही अस ठरवलय . Uhoh

प्लॅन बी म्हणून शेवया आहेत ना घरात हे पाहून ठेवलं .
अन घावनाना उकडीच्या मोदकाची पिठी वापरायची ठरवली. एक लहान फ्राय्पॅन आहे ते वापरायच ठरवल. घावनाचा आकार लहान झाला तर तसही सोपच जाणार होतं Wink

पुजेच्या दिवशी बाकिचा स्वैपाक पटकन हाता वेगळा केला . अन मग हात घातला घावनाना.

चार वाट्या ओला नारळ खवून त्यात २ वाट्या गुळ. जायफळ्/वेलची पावडर अर्धा चमचाभर , काजूचे तुकडे. हे एकत्र करून एखाद मिनिट परतून घ्यायच मंद धगीवर.(किंवा एक मि. माय्क्रोवेव्ह मधे)
हे अस दिसतं

IMG_6173.jpg

तांदळाची पिठी + दुध्+पाणी अस मिसळून पातळ पिठ तयार केल. त्याची व्हिस्कॉसिटी साधारण अशी दिसायला हवी नैतर जाळीदार घावन होत नाहीत , जाड धिरडी सदृश पदार्थ होतो अन दुमडताना मोडतो)

IMG_6176.jpg

आता बेस्ट केस मधे बिडाचा ( निट सिझनिंग केलेला) तवा गॅसवर तापत ठेवायचा. नैतर नॉनस्टिक झिंदाबाद.

IMG_6179.jpg

पहिल एखाद घावन तुटणार ह्याची खात्री बाळगून असा. एकदा न तुटता घावन जमल की मुळ पदार्थ करायला सुरवात करायची.

IMG_6180.jpg

घावन बनता बनता त्याच्या कडा तव्यापासून सुटायला लागतात. तेव्हा अर्ध्या भागावर गुळखोबरं (चुन) पसरवायच. अन त्यावर उरलेला भाग दुमडून घ्यायचा

IMG_6181.jpg

आता उरलेल्या तव्यावर परत पातळ मिश्रण ओतून घ्यायच, हे बनत आल की त्यावर चून पसरून आधीच सेमिसर्कल दुमडायच.हे झाले ३ पदर. हेच सात पदर होइतो करायच !! आपापला वकुव , तव्याचा आकार पहाता ४-७ मधे खेळायला हरकत नै!

IMG_6182.jpgIMG_6183.jpgIMG_6185.jpg

प्रत्येक परतणी च्या वेळी तुप सोडल की मस्त खरपूस होतात घावन.
अशी ही माझी सातकप्प्याची कहाणी चारकप्प्यात सफळ संपूर्ण झाली

नवसुगरणीना/नवबल्लवाना महत्वाच्या सुचना!
१) वकुबापलिकडाचे प्रयत्न करण्यात जी मजा आहे ती नेहेमीच्या खेळपट्टीवर खेळण्यात नाही ( कंसिडर दिस अ‍ॅज अ ब्लाइंड डेट Wink )
२) एकदा करायचा ठरवला पदार्थ की तो मनातल्या मनात करून पहायचा, साहित्य , सामग्री , अन उपकरण ( जी सुगरणी /बल्लव गृहित धरतात ) यांच्या गाळलेल्या जागा भरायला उपयोग होतो.
३) आपण असे घाट घातले की नाउमेद करणारे बरेच असतात त्यांच्याकडे १००% दुर्लक्ष करायच.
४) शक्यतो नविन पदार्थ करताना अज्जिबात मल्टिटास्किंग करू नये. आपण काय माशे चे कन्टेस्टंट नाही ६० मि. मधे ११० स्टेप्स ची पाककृती करून दाखवायला .
५) प्रत्येक पदार्थाचा एक गाभा (इसेन्स) असतो , तो आधी समजून घेतला की तो निट होणे ह्याकडे विशेष लक्ष द्यायच. बाकी गोष्टी जराश्या बदललया , हाताशी असलेल्या साधनांप्रमाणे सुटसुटीत केल्या तरी चालतात
६)मुळातले सातकापे घावन जवळपास ८-१० इंच असतात, बिडाच्या तव्यावर एकदा भट्टी जमली की फटाफट होतात. वाढताना कापून , लेयर्स दाखवणे ( कौशल्य अन नजाकत) अस असत पण मी केल ते भातुकली तल असाव इतक लहान पॅन होतं त्यामुळे ह्याच नाव कोकोनट अ‍ॅन्ड जॅगरी विथ नट्स अ‍ॅन्ड नट्मेग इन सॉफ्ट राइस टॅकोज अस ठेवायची इच्छा होतेय .

IMG_6186.jpg

माहितीचा स्त्रोत -लहानपणीच्या आठवणी , शैलजाचा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिपा, सातकापे घावन्या मध्ये सर्व जण दुध नाहि घालत...काहिजण घालतात.... तसेच प्रमाणाचे, तांदुळ त्याप्रमाणे पाणी व मीठ....

तांदुळ चांगले ४ ते ५ तास तरी भिजले पाहिजेत....नंतर तांदुळ स्वछ धुवून मिक्सर मध्ये पाणी घालुन अगदी बारीक वाटायचे.... मिश्रण पातेल्यात घेउन वाटी/पेल्याने ढवळून बघायचे...अती पातळ नको वा घट्ट/जाड हि नको , अश्या प्रमाणात (इन्ना ची २ नंबरची प्रचि पाहा) व्हावयास ह्वे....आता मिठ घालायचे.....आता घावने घालायला घ्यायचे... (आता वरील इन्ना यांची सर्व माहिती व प्रचि पाहा)

मिश्रण अती पातळ नको वा घट्ट/जाड झाल्यास जाळी पड्त नाही तसेच चिवट होतात....

इन्ना...क्षमस्व....दिपा यांना सांगितल्या बद्द्ल....

घरात गोडखाऊ कोणी फारसे नसल्याने तिखट प्रकार ट्राय केला.

बॅटरमध्ये थोडे दूध मीठ मिरपूड आणि एक अंडे घातले,
फिलिंग म्हणून मशरूम, सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, आलं लसूण, तिखट-मीठ मिश्रण अगदी कोरडे परतून त्यात थोडे चीज टाकून.
खायला घेताना वरून किसलेले चीज आणि पापरिका पावडर.

स्प्रिंग रोल डिप-केचप मिक्ससोबत छान लागले.Ghavan Savory.jpg

साती, तू दिलेली लिंक छान आहे आणि तिथे अनेक पाककृती छान सचित्र लिहिल्या आहेत.
वर देवकीने जी लिंक दिली आहे ती बघून सर्व काही आकलन होते. छान प्रकार आहे. निदान दोन तीन थरापर्यंत तरी नक्कीच जमेल. फक्त पहिला थर पुर्ण बोल उरलेले सहा तर अर्धे. ज्यानी कुणी हा प्रकार शोधून काढला असेल तर त्याला असे करण्याची युक्ती आली कशी असेल खरेचं !!!:)

भन्नाट .
ईन्ना ताई भारी हां
पहिल्यान्दा गोड शेवया आता सात कापे घावन - मस्तचं .
हे सगळे प्रकार लहान्पणापासून खाले आहेत . एकदम झक्कास वाटलं.

अमेय, मस्त फोटो!
बॅटरमध्ये अंडं घातल्यावर घावन हमखास उरपतणारच. तव्याला चिकटण्याची हिंमतच नाही घावनाची.

अमेय, मस्तच! मला खिमा / भूर्जी घालून करून करून पहायचेत.
काल संकष्टीसाठी परत हेच कर अशी फर्माइश झाली Happy केलेही. केपी काल बोलला अस्तास तर तयार होते .
ह्या श्रावणा त एकूण एक गोडाचे पदार्थ ह्या ३ इंग्रेडियंट्स नी केलेत.
सातकापे घावन , नारळी भात, खांडवीच्या वड्या . इतरही पदार्थ आठवत होते , एक तांदूळ नारळाची खिर करतात आईकडे. आम्ही आत्याची खिर म्हणतो. शिरवळ्या (शेवया) , पातोळ्या, गुळचुनाची कापं ( नारळाच्या गुळातल्या वड्या). किती वेगवेगळे लागतात , दिसतात.

इन्ना भारीये हा पदार्थ.... थोडे कौशल्याचे काम आहे.! पण मस्त लागत असणार!
अमेय तुझा तिखट प्रकार पण तोम्पासु दिसतोय.

शब्दाली , भारी!
सस्मित, पहिला थर आत गेलेला असतो ना शेवटचा येइपर्यन्त.
परत एकदा पॅटर्न च नोटेशन लिहाव काय ! Wink

मस्त! गुळाचे सर्व पदार्थ अति आवडतात मला.
गुळचुनाची कापं ( नारळाच्या गुळातल्या वड्या). > इन्ना , याचा पण फोटो , पाकृ. असेल तर टाक ना प्लीज.

ओके. वर जाउन पुन्हा फोटो बघितले. म्हणजे पहिला घावणा घातला. अर्ध्या भागावर सारण घालुन बाकीचा रिकामा अर्धा भाग त्यावर दुमड्सला. मग हा घावणा बाजुला सरकवुन दुसर पुर्ण गोल घावणा घातला *(?) मग हा उचलुन त्याच्या अर्ध्या भागावर ठेवला (?)

* मी समजले की पहिला घावणा घातला. अर्ध्या भागावर सारण घालुन बाकीचा रिकामा अर्धा भाग त्यावर दुमड्सला आणि मग फक्त दुमडलेल्या अर्ध्या साइडला अर्धाच घावणा घातला मग त्यावर सारण पसरवुन आधीच्या घावण्यावर रचला Happy
म्हणुन मला प्रश्न पडला की असं सात वेळा अर्धा घावणा घातला तर मेन जो आधीच्या पहिल्या घावण्याचा अर्धा भाग तव्यावरच आह तो करपणार नाही का?
हुश्श Happy

मी समजले की पहिला घावणा घातला. अर्ध्या भागावर सारण घालुन बाकीचा रिकामा अर्धा भाग त्यावर दुमड्सला आणि मग फक्त दुमडलेल्या अर्ध्या साइडला अर्धाच घावणा घातला मग त्यावर सारण पसरवुन आधीच्या घावण्यावर रचला स्मित>>> हेच बरोबर आहे. फक्त घावन एकदा उजवीकडे दुमडायचा आणि एकदा डावीकडे.
म्हणजे प्रत्येक भाग जास्तीत जास्त दोन वेळा भाजला जाईल.

फक्त घावन एकदा उजवीकडे दुमडायचा आणि एकदा डावीकडे.>>>>>>>>ओह ओके. हे डोक्यातच आलं नाही. Happy

सस्मित,

इन्ना यांनी इतकं छान f-d-a-b-c-e-g असं लिहून दिलेलं की!

इन्ना,
f-d-a-b-c-e-g चा प्रतिसाद मूळ लेखातच टाका, समजायला बरं पडतं.

Pages