वेडा पाऊस

Submitted by नीलम बुचडे on 20 August, 2016 - 01:56

     कोपर्डी - आणखी एक 'निर्भया'...

टीव्हीवरील बातमी बघून सगळं सुन्न झालं..
त्या ह्रदयद्रावक घटनेने माझ्यातल्या 'स्त्रीत्वावर' जो आघात झाला त्याचे पडसाद मनात उमटले..
त्यातूनच "ती" माझ्या मनातून लेखणीत झिरपत गेली..पण हे झालं गद्य... 
हे लिहिताना माझ्यातली कवयित्री मला स्वस्थ बसू देईना... 
अशा रितीने अवतरलेली ही तिची कविता...........,.

  ----  पाऊस ----
असा वेडा हा पाऊस,
करी उगाच वर्षाव..
मन गेलं हे सुकून,
होतो खळखळाट फार...

त्याच्या ढगांची ती शर्थ,
येती दाटूनीया फार..
त्याला नव्हते माहित,
येथे वारा नाही फार..

मन कुजूनी जाईल,
तुझ्या अतिवृष्टीने...
झाकोळल्या विचारांचे,
होईल मळभ हे जुने..

सांग कसे आवरू मी ?
कारंजे हे या मनाचे...
सांग कसे स्वीकारू मी ?
निर्मळ थेंब पावसाचे....

उत्साही या पावसाला,
नाही येथे थारा..
माझ्या मनी दाटलाय,
दुःखाचा पसारा.........
               - निलम बुचडे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users