पाऊस

Submitted by धनुर्धर on 19 August, 2016 - 07:52

पाऊस दाटतो मनी
थेंब थेंब आनंदुनी
पाऊस उगवतो रानी
कोंब हिरवे होऊनी

पाऊस झाडावरती
पाऊस माडावरती
पाऊस घेऊन पक्षी
आकाशी भिरभिरती

पाऊस छतावर वाजे
पाऊस तळहाती सजे
पाऊस गवत होऊनी
माळरानावर गजबजे

पाऊस असा घनात
पाऊस असा कानात
भिजून चिंब राहतो
पाऊस मनामनात

. . . . धर्नुधर . . . .

Group content visibility: 
Public - accessible to all site users