नवी गझल १६.०८.२०१६

Submitted by विजय दिनकर पाटील on 16 August, 2016 - 00:35

नवी गझल -

करायची तर इच्छा आहे अचाट काही
मनासारखी मात्र मिळेनाच वाट काही

तुझ्या सातबारावर माझे नाव चढेलच
गवसली मला कागदपत्रे जुनाट काही

रुतून बसलेत पाय माझे ह्या रस्त्यातच
कुठे निघालेत लोक इतके सुसाट काही

किती बळी देऊन घुमट ताब्यात घेतला
घुमत राहिले पुसणारे तळतळाट काही

एक आणखी रात्र रिकामी संपत आली
बघत आणते का वाट्याला पहाट काही

-विजय दिनकर पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users