ससा, कासव आणि गिधाडं !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 August, 2016 - 17:00

लहानपणी ससा आणि कासवाची कथा ऐकलेली. कासव हा स्लो बट स्टडी, तर ससा हा फास्ट बट लेझी. या दोघांच्या स्पर्धेत आळशीपणाला हलके लेखायला, आणि चिकाटी दाखवल्यास तुलनेत कच्चेही कसे बलाढ्यांवर विजय मिळवू शकतात हे दर्शवायला कथेत कासवाला विजयी केले होते. कथेची शिकवण - "एकवेळ कासव बना, पण ससा बनू नका" - ही अशी होती, की आणखी काही याची कल्पना नाही. मात्र इंजिनीअरींग पास करत कॉलेजच्या उंबरठा ओलांडताना एक गोष्ट मात्र समजलेली, ही फिल्ड गधामजूरी करणार्‍यांची नाही तर स्मार्ट वर्क करणार्‍यांची आहे. तब्बल नऊ महिने माझा हा समज टिकलाही. मग हळूहळू प्रखर वास्तवाची जाणीव होऊ लागली. तुम्ही हुशार असा किंवा नसा, स्मार्टवर्क करा किंवा नका करू, पण हार्डवर्क काही तुम्हाला सुटलेले नाही. नुसते हार्डवर्कच नाही तर लॉंग टाईम हार्डवर्क. ऑफिस आठ तासांचे आहे. कागदोपत्री. नऊ ते साडेपाच. पण साडेपाचला तुम्ही आयुष्यात कधी घरी जाऊ शकत नाही.

एखाद्या दिवशी सहालाच जायचेय. नो प्रॉब्लेम. काहीतरी जेन्युअन कारण तयार करा. जे कोणी तुम्हाला परवानगी नाकारू शकणार नाही.

एखाद्या दिवशी साडेसहाला निघालात. काय ऋन्मेष, वर्कलोड कमी दिसतेय तुमच्याकडे, आमच्याकडचे देऊ का?

सातला घरी निघालात. काय रे, कुठे चाललास, घरी काही काम आहे का?

साडेसातला निघालात. काय रे तुम्ही बॅचलर लोकं, काय करता एवढ्या लवकर घरी जाऊन.

आठला घरी निघालात. थांब अर्धा तास, मी पण निघणारच आहे. एकदमच निघू, तुला ड्रॉप करतो स्टेशनवर.

साडेआठला निघालात. आजचे आपले काम झाले ना सारे? उद्या मग त्या दुसर्‍या कामाला सुरुवात करू.

नऊ ते नऊनंतर कधीही आणि कितीही लेट निघालात. उद्या वेळेवर ये हा. सकाळी सर्वात पहिला तो एस्टीमेशनचा मेल आपल्याला टाकायचा आहे.
...

आता तुम्ही म्हणाल, दरवेळी हा टांग अडवणारा, चौकशी करणारा, स्वताला बॉस, सिनिअर, मॅनेजर म्हणवणारा टोणग्या जर एवढ्या उशीरापर्यंत मुकादमगिरी करत थांबून असतो तर तुला थांबायला काय धाड भरलीय.
अरे पण त्याला कदाचित त्याच्या कामाचा हिशोब द्यायचा नसेल. मुकादमगिरी करणे एवढेच त्याचे काम असेल. त्या कामाचाही त्याला माझ्या दुप्पट पगार मिळत असेल. भले मलाही जवळपास तेवढाच पगार द्यायला कंपनी तयार झाली. किंवा पगारापेक्षा चांगल्या रेटने ओवरटाईम देतही असली. तरी मला नाही करायचेय यार एक्स्ट्रा काम. जेवढे काम नऊ ते साडेपाच मध्ये करण्याची माझी क्षमता आहे तेवढाच मला पगार द्या. पुढच्या कामासाठी नाईट शिफ्ट चालू करा. त्यात जो काम करेल त्याला त्याने केलेल्या कामाचा पगार द्या. पण मला नऊ ते साडेपाचच काय ते राबवा.

पण हे शक्य नाही. जरी तुम्ही कितीही स्मार्ट आणि फास्ट काम केले, जरी आठ तासाचे काम सहा तासात केले. तरी मग तुमची ही क्षमता ओळखत तुम्हाला चौदा तासांचे काम देत दहा-बारा तास ऑफिसमध्ये थांबवलेच जाते. भले मग पगार चौदा तास कामाचा देत असले. म्हणजेच ईतर दहा तासात दहा तासांचेच काम करणार्‍या सर्वसामान्य कर्मचार्‍यांपेक्षा जास्तीचा देत असले. तरी तो पैश्यातला फरक वगळता तुम्हीही कंपनीत दहाबारा तास राबणारे वर्करच असता. ईतरांसारखेच तुमच्याही आयुष्यातील दहाबारा तास ओरबाडून खरवडून खेचून घेतले गेले असतात. आणि तुम्ही देखील नाईलाज असल्यागत, ज्याला ईतर आक्षेप घेत नाहीत त्याला विरोध करणारा मीच कोण शहाणा असे म्हणत, स्वत:ला घाण्याला जुंपलेला बैल समजून, स्वताच्या वैयक्तिक आवडीनिवडी आणि छंद मारून, स्वताच्या फॅमिलीला कमी वेळ देऊन, बस्स ऑफिसच्या कामाचा गाडा ओढत राहता..

कधीतरी कोणीतरी बॉस खूश होत आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मारतो. कंपनी एक दिवस आपल्यालाही छोट्यामोठ्या टीमचा बॉस बनवते. मग आपण आपल्या हाताखालच्या लोकांची अशीच पिळवणूक करतो. ती करताना आपलाही वेळ ऑफिसमध्ये त्यांच्यासारखाच सडतोय हे विसरून जातो. आपल्या हाताखालचे आपण सांगतोय म्हणून थांबत आहेत, तर आपण स्वत: आपल्या मर्जीने थांबत आहोत, असे स्वत:चे खोटेखोटे समाधान करतो. आपल्या बॉस असण्याचा अहंकार कुरवाळत स्वताचीही जिंदगी झंड करतो आणि दुसर्‍याचीही जहन्नुम करतो.

अरे हो, काही कंपन्यांमध्ये नावालाच ‘फाईव्ह डे वीक’ असतो पण दर शनिवारी आणि गरज पडल्यास रविवारीही राबवले जाते हे यात राहिलेच. त्यातही बदल्यात कॉम्पेनसेटरी ऑफ न देता ओवरटाईमच काय तो घ्या अशी गळ घातली जाते. कारण तो कॉम्पऑफ वापरून कामगाराने रजा घेऊ नये हि त्यामागची कुटील बुद्धी.
सणांच्या दिवशीही मग बोलावले जाते. मुलाचा बारसा काय संध्याकाळी आहे, सकाळी तासभर लवकर येऊन चारलाच निघून जाशील, असे सुनावले जाते. सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला मात्र नाईलाजाने सुट्टी द्यावीच लागत असल्याने तिथे तेवढी चरफड होते.

यातही गंमत एका गोष्टीची वाटते. या सर्वातूनही कधी फुरसत काढून आपण मायबोलीवर एखाद्या दिवशी जास्त वेळ रेंगाळलोच. तर लोकं बोलतात, याला ऑफिसमध्ये काही काम दिसत नाही....
आपला जन्म नऊ ते साडेसात काम करण्यासाठीच झाला आहे यावर लोकांचा ईतका ठाम विश्वास बघून मला खरंच मीच चुकीच्या युगात जन्माला आलोय असे कधीकधी वाटते..

त्या दिवशी अतरंगी यांच्या त्या समानतेच्या धाग्यावरची चर्चा मी हे सारे विचार मनात येताच तिथेच सोडली. जिथे माणसाला माणसासारखे न वागवता ओझ्याच्या गाढवासारखे वागवले जाते तिथे आणखी समानतेच्या काय अपेक्षा करायच्या..

चला खूप रात्र झाली. आता रजा घेतो. उद्या देखील लेट गेलो तर या महिन्यातला दुसरा लेटमार्क व्हायचा. तिसर्‍याला हाल्फ डे कटतो. पाचव्याला पगार कटतो. सातव्याला सर्वांसमोर उठाबश्या काढायला लावतात. इथे लेटनाईट थांबणार्‍यांचे रात्रीच्या अंधारात कौतुक आहे, मात्र सकाळच्या उजेडात लेट येण्याची मुभा त्यांनाही नाही..

पण जाता जाता डेडलाईन या शब्दाचा मला लागलेला अर्थ सांगतो,
माणूस मेला तरी चालेल, पण त्या आधी काम झाले पाहिजे !

शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>सर्वातूनही कधी फुरसत काढून आपण मायबोलीवर एखाद्या दिवशी जास्त वेळ रेंगाळलोच. तर लोकं बोलतात, याला ऑफिसमध्ये काही काम दिसत नाही>> ज्या माणसाला दर दोन दिवसांआड मायबोलीवर नवीन नवीन विषयांचे बीबी काढायला वेळ असेल त्याला ऑफिसात भरपूर काम असावं ह्यावर माझा तरी विश्वास बसत नाही.

सायो, आपल्याला माझे धागे आवडत नाहीत. (असे आपल्या प्रतिसादावरून गृहीत धरू. चुकले असल्यास क्षमस्व)
तरीही आपण वेळ काढून धागा वाचला. वेळात वेळ काढून प्रतिसाद दिलात.
मग धागा काढणे ही तर माझी आवड आहे. आणि आवडीसाठी वेळ कुठूनही निघणारच Happy

तरीही प्लीज धाग्याची वेळ चेक करा. कसला मध्यरात्री काढला आहे. कारण कालही ऑफिसमधून लेट सुटलो. गर्लफ्रेंडबरोबर डिनर केले. कॉफी डेटलाच जायचे होते पण सुटेपर्यण्त वेळ डिनरची झालेली. मग तिला घरी ड्रॉप केले. रात्री व्हॉटसपवर तिच्याशी चॅट केले. तिला गूडनाईट बोलून झोपवले. आणि मगच वेळ काढून धागा काढलाय.
बाकी माझ्या मराठी टायपिंग स्पीडबद्दल शंका नसावी. चित्रपट बघता बघता मी त्यातील डायलॉग लिहू शकतो. आपण वाचायला जो वेळ घेतला त्याचा निम्माही मला लिहायला लागला नसेल.
आणि हो, आता या पोस्टचाही टाईम बघा. रोजच उशीरा झोपूनही नऊच्या ऑफिसला वेळेत पोहोचताना ट्रेनमध्ये बसून लिहिली आहे Happy

ऋन्मेष!
Happy

खरंच किती गुणाचा तू!

जन्मोजन्मी असाच बॉयफ्रेंड मिळो यासाठी तुझी गर्लफ्रेंड कुठलं व्रत करते?

तिच्याशी चॅट केले. तिला गूडनाईट बोलून झोपवले.>>>>>> ऋनम्या ह्या सवयी चांगल्या न्हैत , पुढं चालून जड जाईल . Proud
जन्मोजन्मी असाच बॉयफ्रेंड मिळो यासाठी तुझी गर्लफ्रेंड कुठलं व्रत करते? >>> का हो ? Proud

आमचा तर जन्म गेला, सईला (म्हणजे ऋन्म्याच्या सईला नव्हे, माझ्या लेकीला) तरी करायला सांगेन.
Happy

कारण कालही ऑफिसमधून लेट सुटलो. गर्लफ्रेंडबरोबर डिनर केले. कॉफी डेटलाच जायचे होते पण सुटेपर्यण्त वेळ डिनरची झालेली. मग तिला घरी ड्रॉप केले. रात्री व्हॉटसपवर तिच्याशी चॅट केले. तिला गूडनाईट बोलून झोपवले.
>>
का रे असा वागतोस?
बाॅयफ्रेन्ड पदाचा स्टॅन्डर्ड इतका उंचावून ठेवलास? ह्यामुळे सर्वसामान्य पुरूषांची वाट लागते रे आपाअापल्या गफ्रेचे हट्ट पुरवताना

आम्ही बै साड्डे पाच्चलाच निघतो.
घाण्ञाचा बैल (?) होण्याची इच्छा नव्हती आणि नाहीये.
तिच्याशी चॅट केले. तिला गूडनाईट बोलून झोपवले>>>>>>>> डिनर एका गल्र्फ्रेंड बरोबर आणि चॅट दुसरीशी काय रे? Happy

ऋन्म्या - वाचून अगदी गलबलून आलं रे.

जे लोक वेळेवर जाऊ शकतात ते काय व्रत करतात सांगा रे, आम्ही पुढच्या जन्मीसाठी करू...

जे लोक वेळेवर जाऊ शकतात ते काय व्रत करतात सांगा रे>>>>>
समाधान असे व्रत आहे. Happy
वेळेवर कामाला यावे आणि वेळेत घरी जावे. कामाच्या वेळेत काम संपवून टाकावे. जे संपले नाही ते उद्यावर टाकावे.
इन्क्रीमेन्ट, बोनस, प्रमोशन अशा सगळ्यावर परिणाम होउ शकतो, त्याकडे दुर्लक्ष करावे. कुटुंबासोबत घालवलेला वेळ आणि स्वास्थ्य हाच बोनस मानावा.

नाहीतर सरळ कंपनी बदलावी. जिथे शांत चित्ताने काम करता येईल अशा ठिकाणी जावे.

आपण समोरच्याला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना exploit करायची संधी दिली की ते करतीलच.

सायो | 8 August, 2016 - 18:41
>>सर्वातूनही कधी फुरसत काढून आपण मायबोलीवर एखाद्या दिवशी जास्त वेळ रेंगाळलोच. तर लोकं बोलतात, याला ऑफिसमध्ये काही काम दिसत नाही>> ज्या माणसाला दर दोन दिवसांआड मायबोलीवर नवीन नवीन विषयांचे बीबी काढायला वेळ असेल त्याला ऑफिसात भरपूर काम असावं ह्यावर माझा तरी विश्वास बसत नाही.

.--> जळण्याचा वास येतोय ... Happy

दिवसभर इथे तिथे अशा पोस्ट्स खरंच दिसत नाहीत ऋन्मेषच्या.
खरंच कामात बिझी असावं पोरगं.
हां, आता दुसरीकडे म्हणजे इतर साइट्सवर असेल तर काय माहित?.
पण तसं असेल तर इकडं पण फिरकणारच ना?
असो.

कंपनी बदलणे हा उपाय आहे.
आमच्या कंपनीत पण हार्ड वर्क आहेच. पण स्मार्टली तुम्ही लौकर पूर्ण केलं तर, लौकर जायला ना नसते. निदान आठवड्यातून काही दिवस तरी.
मर्फीभाउंच्या लॉ प्रमाणे, वर्क विल फ्लो टू कॉम्पिटंन्ट पर्सन, अंटिल ही/शी सबमर्जेस, असं काय ते पण खरंच आहे.
सबमर्जिंगचा अनुभव सतत येत असेल तर कंपनी बदलणे योग्य.

रुन्म्या लेका 8-9 तास काम करून इतका त्रागा करतोस तर आमच्यासारखे 13-14 तास काम करू लागलास तर काय होईल Wink

ऋन्मेष : इतका वेळ हापिसात काम करून ग. फ्रे आणि मायबोली साठी तुला वेळ देता येतोय हे जर का तुझ्या बॉस ला कळलं तर तो तुला अजून काम देईल.

दिलेलं काम पुरवून पुरवून करायच कसं याचं एखादं ट्रेनिंग घे पाहू ............. Happy

Maybe if you find something which you actually like, good at and pays too. The problem is not working hours necessarily but liking what you do. I have seen people who are in office not for boss or punching time but the new ideas or possibilities excite them.

आलो फायनली दिवसभराचे दमूनभागून. दिवसभर मुद्दाम किती काम करतोय हे दाखवायला लपून बसलो नव्हतो, तर खरेच आज पुन्हा एकदा कामाचा कालचा रेकॉर्ड मोडून आलोय Sad

पण ईथे हे काय चाल्लंय. निम्मे प्रतिसाद गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वर. ..
अरे लोकहो एखाद्याचे खाजगी आयुष्य असते, हे तुम्हाला समजत नाही का Wink

@ साती, लेकीचे ईतके सुंदर नाव ठेवल्याबद्दल तुम्हाला माझ्याकडून दहा धागे ईनाम Happy

@ बाहुबली, जर एकमेकांचे हट्ट पुरवता येत असतील तरच गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड हे नाते जोपासायचे असते. ते फक्त शोभेचे नाते म्हणून मिरवायला नसते Happy

@ राजसी, सहमत आहे. पण या जगात असे लोकं फार कमी आहेत ज्यांना आपल्या आवडीचे काम करायला मिळते. आपली आवड हाच आपला व्यवसाय बनवता येते. नऊ ते साडेपाच (ते साडेआठ) नोकरी करणार्‍यांमध्ये तर अपवादानेच असे कोणी त्या कामाची आवड असलेला सापडतो. आपण जर यापैकी असाल तर आपला मी हेवा करतो Happy

आणि लोकहो, एवढे सोपे नसते हो, ठरवले काम ऑफिसच्या वेळेतच करायचे आणि तसे तत्व आपल्यापुरते पाळायचे.
पण येस्स, सर्वांनी मिळून एखाद्या संध्याकाळी १८.५७ चा उठाव घडवायला हवा. फक्त सुमडीत. या उठावाचा लीडर कोण आहे हे बाहेर फुटायला नको. नाहीतर त्याचीच तेवढी कंपनीतून हकालपट्टी करतील. जेव्हा मार्केटमध्ये जॉब कमी असतात, आणि आपल्या कंपनीत काम असते, तेव्हाच मॅनेजमेंट हे असले खेळ खेळते. पटकन कोणाला कामावरून काढून टाकले आण दोनेक महिने जॉब नाही मिळाला तर हल्ली फार अवघड होते. अर्थात हे आपणच करून ठेवलेले असते. कसले कसले लोणचे हप्ते आणि सर्व पगार वापरून संपेल अशी बनवून ठेवलेली लाईफस्टाईल. आधी ती चेंज करायला हवी. मगच नोकरीला लाथाडण्याची हिंमत अंगी येईल. आणि मगच असले उठाव वगैरे करता येतील.

ही नारायण मुर्तीनी लिहेलेली मेल वाचा-

Mail sent by Narayan Murthy to all Infosys staff:

It’s half past 8 in the office but the lights are still on… PCs still running, coffee machines still buzzing… And who’s at work? Most of them ??? Take a closer look…

All or most specimens are ?? Something male species of the human race…

Look closer… again all or most of them are bachelors…

And why are they sitting late? Working hard? No way!!! Any guesses??? Let’s ask one of them… Here’s what he says… ‘What’s there 2 do after going home…Here we get to surf, AC, phone, food, coffee that is why I am working late…Importantly no bossssssss!!!!!!!!!!!’

This is the scene in most research centers and software companies and other off-shore offices.

Bachelors ‘Passing-Time’ during late hours in the office just bcoz they say they’ve nothing else to do… Now what r the consequences…

‘Working’ (for the record only) late hours soon becomes part of the institute or company culture.

With bosses more than eager to provide support to those ‘working’ late in the form of taxi vouchers, food vouchers and of course good feedback, (oh, he’s a hard worker….. goes home only to change..!!). They aren’t helping things too…

To hell with bosses who don’t understand the difference between ‘sitting’ late and ‘working’ late!!!

Very soon, the boss start expecting all employees to put in extra working hours.

So, My dear Bachelors let me tell you, life changes when u get married and start having a family… office is no longer a priority, family is… and That’s when the problem starts… b’coz u start having commitments at home too.

For your boss, the earlier ‘hardworking’ guy suddenly seems to become a ‘early leaver’ even if u leave an hour after regular time… after doing the same amount of work.

People leaving on time after doing their tasks for the day are labelled as work-shirkers…

Girls who thankfully always (its changing nowadays… though) leave on time are labelled as ‘not up to it’. All the while, the bachelors pat their own backs and carry on ‘working’ not realizing that they r spoiling the work culture at their own place and never realize that they would have to regret at one point of time.

So what’s the moral of the story??
* Very clear, LEAVE ON TIME!!!
* Never put in extra time ‘ unless really needed ‘
* Don’t stay back unnecessarily and spoil your company work culture which will in turn cause inconvenience to you and your colleagues.

There are hundred other things to do in the evening..

Learn music…..

Learn a foreign language…

Try a sport… TT, cricket………..

Importantly,get a girl friend or boy friend, take him/her around town…

* And for heaven’s sake, net cafe rates have dropped to an all-time low (plus, no fire-walls) and try cooking for a change.

Take a tip from the Smirnoff ad: *’Life’s calling, where are you??’*

Please pass on this message to all those colleagues and please do it before leaving time, don’t stay back till midnight to forward this!!!

IT’S A TYPICAL INDIAN MENTALITY THAT WORKING FOR LONG HOURS MEANS VERY HARD WORKING & 100% COMMITMENT ETC.

PEOPLE WHO REGULARLY SIT LATE IN THE OFFICE DON’T KNOW TO MANAGE THEIR TIME. SIMPLE !

Regards, NARAYAN MURTHY

ईथे हे काय चाल्लंय. निम्मे प्रतिसाद गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वर. ..
अरे लोकहो एखाद्याचे खाजगी आयुष्य असते, हे तुम्हाला समजत नाही का>>

अापलं खाजगी आयुष्य चव्हाट्यावर आणुन मिरवलं की काय होणार ऋ दादा

ऋन्मेऽऽष,
कामाचे एस्टिमेशन योग्य असा बफर अॅड करुन द्यावे. त्यात तडजोड करु नये. बाॅस लोक घासाघीस करुन प्रेशराइज करतात, पण आपण आपल्या एस्टिमेटेड टाईमलाईन वर दटुन राहावे.

कसले कसले लोणचे हप्ते >>>> वाचताना गडबडले ना मी... कुठल लोणच मधुन आल ????

बाकी धागा आवडला ऋन्मेष Happy
माझ्या हापिसात,, रजेचा अर्ज भरण्यापासुन ती सॅक्शन करुन घेण आनि परत रुजु झाल्यावर ताठ मानेने काम करण हे स्र्मार्ट आनि हार्ड वर्क दोन्ही आहे.

मायबोलीवरचा फुटफॉल प्रचंड वाढण्यास ऋन्मेषचे धागे कारणीभूत आहेत हे विसरू नका लोकहो.
>>
खरं आहे बेफिकीर.
ऋ दादाचे मायबोलीच्या साहित्याला केलेले योगदान खरोखर लक्षणीय आहे.

सर्वांनी मिळून एखाद्या संध्याकाळी १८.५७ चा उठाव घडवायला हवा.>>> वाह वा !
कसले कसले लोणचे हप्ते >>> Lol लोणचं पण हप्त्यावर घेतोस का रे ?

बायदवे ते टायटल मध्ये ससा आणि कासवं कळलं , गिधाड म्हणजे बॉस का ?

वाचनखूनात एवढे लिहिलेय नका विचारू तरी लोकं तेच विचारणार. आजही ज्यांच्यामुळे उशीरा उगवलो ती माझ्या आयुष्यातील गिधाडं. प्रत्येकाच्या आयुष्यातील वेगळी असतील.

धन्यवाद बेफिजी Happy
बाकी हे फूटफॉल काय असते?

मानसकन्या, छान पोस्ट आहे. तो मेल ईंजिनीअरींग घ्यायचा जेव्हा विचारही नव्हता केलेला तेव्हाच वाचलेला. जुना आहे, पण पन्नास वर्षांनीही तेव्हाची पिढी वाचतील तेव्हा त्यांनाही लागू होईल आणि पटेल.

Pages