तर मराठी साहित्यात पावसाची सुरूवात आणि लिज्जत पापड यांची मैत्री जगज्ञात आहे.
आता इथे 'नुकतीच पावसाला सुरूवात होत आहे' असे पापडीय मटेरियल आल्यावर आमच्यासारख्या लाटणंवालीने पापड न लाटणं ,ही काही होण्यासारखी गोष्टंच नाही.
तर हा पहिला पापड!
हा पापड म्हणजे बेफिकीर यांच्या तरहीचे विडंबन आहे.
त्यांनी मोठ्या मनाने परवानगी दिली म्हणून इथे छापण्याचे धाडस करत्येय.
धन्यवाद बेफिकीरजी!
पुन्हैकवार धागा वाह्यात होत आहे
नुकतीच कीर्तनाला सुरुवात होत आहे
मुरतो जसा जसा तो गुंडाळण्यात गझला
त्यांना विडंबण्या मी निष्णात होत आहे
नजरानजर, उसासे, ताटातुटी, दिलासे
प्रत्यक्ष जे नसे ते शब्दांत होत आहे
कणभर स्वतः बदल रे पाहून थक्क होशी
हा केवढा बदल ह्या विश्वात होत आहे
अपुली लहान बुद्धी, नुसते बघत बसावे
बोलायच्या कढीची खैरात होत आहे
( मूळ गझल- ५९६११)
तर , हा पापड लाटायला पाचच मिनिटे वेळ लागला. कारण बेफिजींच्या शब्दातच मोठी कळा होती, मी फक्त चार दोन शब्द बदलले.
*******************************************
दुसरा पापड!
नुकतीच पावसाला सुरूवात होत आहे
कांदाभजी न वाईन बघ फस्त होत आहे
जाऊन का मरावे गर्दीत धबधब्यांशी
गच्चीवरी सुखाची बरसात होत आहे
कृत्रिम लिपस्टिकांची मातब्बरी कशाला
ओठांवरील लाली, पानात कात आहे
डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांत वाढ झाली
ती डॉक्टरीण आता पैशांत न्हात आहे
ये पावसा असा तू वेळेवरी हमेशा
दुष्काळ कोरडा रे धंद्यास घात आहे
पावसाला सुरूवात झाल्यावर अनिलचेंबूरना भजी नी वाई फस्तं करायची स्वप्ने पडली.
मग फक्तं आणि फक्तं त्यांच्यासाठी रचलेली ही थोडीशी डॉक्टरी गझल.
इथं वाईन पिल्याने अलामतीवर बिलामत आलीय. पण पहिल्या द्विपदीत 'फस्त' शब्द यायलाच हवा होता म्हणे.
तर हा पापड सहा मिनिटात.
**************************
तर चेंबूर दादा म्हणाले की आता हॅटट्रिकच करून टाका.
ते ओरिजिनल लिज्जत पापडवाले पण एका वेळेस तीन तीन पापड लाटतच असत.
त्यामुळे ही एक
स्वप्नातल्या सुगीची रुजुवात होत आहे
नुकतीच पावसाला सुरूवात होत आहे
चाहूल ही सखीची की भास या मनाचा
का नाद पैंजणांचा कानात होत आहे
हृदयात काहिली जी बाहुंमध्ये निमाली
मन थंडगार ओले रानात होत आहे
हे भेटणे घडीचे मग साथ आठवांची
जाऊ नको प्रिये तू का रात होत आहे
पुसतील साजणाला रे या खुणा कशाच्या
'साती जराजराशी वाह्यात होत आहे'
हा पापड भर ओपिडीत लाटला. मध्येच एक पेशंटपण पाहिला.
त्यामुळे मग याला १९ मिनिटे लागली.
असो.
तर नुकतीच पावसाला सुरूवात होत आहे.
मायक्रोवेवात एकेक पापड वीस ते तीस सेकंद गरम करा आणि आपापल्या आवडत्या उष्णपेयांबरोबर रिचवा.
******************
तर, इथे लाटायची प्रेरणा घेऊन बाकीचे लाटणीबहाद्दर आले होते.
या त्यांच्या लाट्या.
अमेय२८०८०७
दुपटी धुवायला 'बा' तैनात होत आहे
नुकतीच पावसाला सुरुवात होत आहे
चोरून वळचणीला जे व्हायचे अता ते
सर्वांसमोर बागा-खडकात होत आहे
******
जाग्याव पलटी
वाढेल फार आता बघ रक्तदाब माझा
जर सोय पापडांची फुकटात होत आहे
वाड्या, गढ्या नि गावे नेली धुवून सारी
म्हणतात लोक ह्याला 'सुरुवात' होत आहे
'पलटी' नको उगाचच सेंटी करू स्वतःला
आनंद 'लाट'ण्याची जर बात होत आहे
तोडीस तोड पापड खाऊन घेतले पण
झाले अजीर्ण... डॉक्टर तेलंगणात आहे
****
भास्कराचार्य |
फ्रेंडशिप मागितली, बॉयफ्रेंड आहे म्हणाली
मनातल्या आकांक्षांचा आज घात होत आहे
याची सुधारित आवृत्ती
मी फ्रेंडशीप पुसता 'आहे दुजा' म्हणाली
आकांक्षिल्या सुखावर हा घात होत आहे
****
anilchembur
घाला मलाच गोळ्या सेवक-प्रधान बोले
गोरक्ष टोळक्यांची जळवात होत आहे.
****
मुक्तेश्वर कुळकर्णी - यांचे पापड गोल नाहीत, पण चालतंय.
कोणास ठाऊक कुणाला काय होत आहे
मलाही नाही उमजत मला काय होत आहे
****
मानव पृथ्वीकर - यांचे पापड उडदाचे नाहीत, नागलीचे आहेत.
ओझोनच्या थराची तडकून काच गेली
पृथ्वीत मावलेली छाया उडुन गेली
अतीनील किरणांनी केला त्वचाक्षोभ
उबदारशा उन्हाची व्याख्या विरुन गेली
वैश्विक तपमानाची चिंता इथे कुणाला
भाकरी लष्कराची करपून पार गेली
******
आणि भरत. याने की आमच्या भमंनी इतके छान शेर रचले की शेवटी त्यांची एक वेगळी तरही झाली.
तर ही भरतनी रचलेली तरही.
और आने दो!
वावा, जापजी आणि भमजी!
वावा,
जापजी आणि भमजी!
डॉक्टरांनी उतारा सुचवावा.
डॉक्टरांनी उतारा सुचवावा. म्हणजे मग आमची गजल 'व्रुत्तात होत आहे' होईल.
भाचाजी, तुम्ही मात्रांच्या
भाचाजी, तुम्ही मात्रांच्या गणितात कच्चे आहात.
त्या गणिताच्या वाटेस जायची
त्या गणिताच्या वाटेस जायची माझी छाती नाही.
गोलकीपर असतानाही गोल करता
गोलकीपर असतानाही गोल करता येतो भास्कराचार्य
अडथळे पार करून जिंकण्यातली लज्जत काही औरच आहे
भारी जमलेयंत हे सर्टीफिकेट
भारी जमलेयंत
हे सर्टीफिकेट सारखे फ्रेम करून ओपीडीत लावा. पेशंटना कळले न कळले तरी डॉक्टरीणबाई खूप भारी आहेत असे वाटतंय बघा..
रच्याकने, ती शेवटची ओळ शेवटचा पापड लाटता लाटला मध्ये जो एक पेशंट आटपला त्याच्या मनातली तर नाही ना
बादवे, सगळे पापड मस्त जमलेत.
बादवे, सगळे पापड मस्त जमलेत. ते लिहायचं राहिलं स्वतःचा पापड लाटता लाटता.
मी फ्रेंडशीप पुसता 'आहे दुजा'
मी फ्रेंडशीप पुसता 'आहे दुजा' म्हणाली
आकांक्षिल्या सुखावर हा घात होत आहे.
सांडून रक्त ज्यांनी स्वर्गास
सांडून रक्त ज्यांनी स्वर्गास आणलेले
त्यांची रवानगीही नरकात होत आहे
आमचे येथे पेशंट दुरूस्तं करून
आमचे येथे पेशंट दुरूस्तं करून व गझला पाडून मिळतील असा बोर्ड लावा
शक्य आहे ऋबाळा. इंजेक्शन जरा
शक्य आहे ऋबाळा.
इंजेक्शन जरा जास्तच जोरात टोचलं गेलं असेल आणि त्याची गाठ बघून बिचारा म्हणाला असेल.
बाकी हितं लोकांना मराठी येत नाही , त्यामुळे फ्रेम करूनही फायदा नाही.
बाकी बर्याच फ्रेमी बाकायदा आहेतच.
भरतजीही सेंटी झाले का?
भरतजीही सेंटी झाले का?
वा वा भरत. आचार्य, डॉक्टरांनी
वा वा भरत.
आचार्य, डॉक्टरांनी जालीम व्हॅक्सिन दिलेय बघा
मी फ्रेंडशीप पुसता 'आहे दुजा'
मी फ्रेंडशीप पुसता 'आहे दुजा' म्हणाली
आकांक्षिल्या सुखावर हा घात होत आहे. >> व्वा!
आमचे येथे पेशंट दुरूस्तं करून व गझला पाडून मिळतील असा बोर्ड लावा >> त्या गजला पण दुरूस्त करतायत की!
सेंटी नाही. यमकानुसार हेच
सेंटी नाही. यमकानुसार हेच सुचलं.
साती पापड लईच कुरकुरीत
साती
पापड लईच कुरकुरीत हैत... मौसमाला बहार आली.
जापजी आणि भरतजी, तुमचे शेर
जापजी आणि भरतजी, तुमचे शेर छान जमतायत.
तोडीस तोड पापड खाऊन घेतले
तोडीस तोड पापड खाऊन घेतले पण
झाले अजीर्ण... डॉक्टर तेलंगणात आहे
धन्यवाद आचार्य, पूर्वपुण्याई
धन्यवाद आचार्य, पूर्वपुण्याई म्हणायची दुसरं काय!
ज्वालामुखी म्हणोनी जगतात
ज्वालामुखी म्हणोनी जगतात ख्यात आहे
पण आजकाल त्याची फुलवात होत आहे
ओझोनच्या थराची तडकून काच
ओझोनच्या थराची तडकून काच गेली
पृथ्वीत मावलेली छाया उडुन गेली
अतीनील किरणांनी केला त्वचाक्षोभ
उबदारशा उन्हाची व्याख्या विरुन गेली
वैश्विक तपमानाची चिंता इथे कुणाला
भाकरी लष्कराची करपून पार गेली
नुकतीच वादळाला सुरुवात होत
नुकतीच वादळाला सुरुवात होत आहे
भलताच प्रश्न कैसा गुजरात होत आहे
सगळेच कर्ज माझे बुडणार हाय
सगळेच कर्ज माझे बुडणार हाय भासे
शिरजोर आज मल्ल्या मुदलात होत आहे
भम, जाप, भारीच! मी नंतर
भम, जाप, भारीच!
मी नंतर हेडरात अपडेट करेन.
मानव, आमचे उडदाचे पापड आहेत.
तुमचे नागलीचे दिसतायत.
पण चालेल आम्हाला.
घाला मलाच गोळ्या सेवक-प्रधान
घाला मलाच गोळ्या सेवक-प्रधान बोले
गोरक्ष टोळक्यांची जळवात होत आहे.
मज छंद वाटलेला बघ नाद आज
मज छंद वाटलेला बघ नाद आज झाला
परिणाम काय त्याचा खर्चात होत आहे
तुलसीस वाटलेले पढवीन यांस
तुलसीस वाटलेले पढवीन यांस पाढे
पण तीच मग्न आता कपड्यांत होत आहे
नजरेत काय सांगू भलतीच गोड
नजरेत काय सांगू भलतीच गोड जादू
दिवसाच चांदण्याची बरसात होत आहे
भम! काय खरं नाही!
भम!
काय खरं नाही!
भम श्रावणात भलतेच बरसु लागलेत
भम श्रावणात भलतेच बरसु लागलेत
Pages