पुरू का पेटवू

Submitted by विजय दिनकर पाटील on 2 August, 2016 - 23:19

अनेक महिन्यांच्या विरामानंतर... काही खरडलेले शेर

जरी आवडनिवड आहे मलाही
तुझ्या मर्जीप्रमाणे बेत ठरवू

छुप्याने खूप नंगानाच झाला
उघड भेटायचे संकेत ठरवू

पिण्यासाठी तरी पाणी मिळाले
अता पिकवायचे का शेत ठरवू

जिथुन वारस पुढे येईल त्यावर
पुरू का पेटवू हे प्रेत ठरवू

-विजय दिनकर पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users