ह्याच कारणामुळे मानतो तुझ्याहून मी सफल मला

Submitted by बेफ़िकीर on 2 August, 2016 - 11:17

ह्याच कारणामुळे मानतो तुझ्याहून मी सफल मला
जशी तुझी घेतेस, न घ्यावी लागे माझी दखल मला

माझ्या गझलेमध्ये आता येतच नाही तुझा विषय
गोष्ट वेगळी की आताशा जमतच नाही गझल मला

लोक उगाचच वेगवेगळी स्थळे बघत बसतात इथे
तू असल्याने अख्खे जीवन वाटत आहे सहल मला

"नको मला भेटूस असे कुठल्या भेटीमध्ये सांगू?"
मजेशीर वाटत होती ती तुझी खुळी चलबिचल मला

बाकी जग का होते ह्यावर प्रदीर्घ संशोधन केले
मी येथे का होतो ह्याची कधी व्हायची उकल मला

ह्यापेक्षा कोणी दुर्दैवी असले तर कळवा बर का
मला पाहुनी उमलत जी, ती फुले म्हणाली "उमल" मला

ऋतू आणले, कळ्या आणल्या, नाही नाही ते केले
तुझ्याएवढा सुचला नाही शेर कधीही तरल मला

तिघे मित्र फिरलो सोबत, पण तिथे कुणी गेला नव्हता
आमच्यातला एक म्हणाला "हे मरणा चल उचल मला"

"माझ्या सीमांमध्ये नाही मावत आविष्कार तुझे"
शरीर म्हणते "जमले तर हो 'बेफिकीर' अन् बदल मला"

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोज सकाळी मायबोलीवर काय लिहावे प्रश्न पडे
सूचेल त्या त्या ओळी जोडुनी गझला लिहणे जमल मला

गोळा केले चार दोन ज्या फ्यानांचे मंडळ येते
वा वा वा वा म्हणताना 'लय भारी' तर ते म्हणल मला.

जमल/म्हणल वर सैराट इफेक्ट आहे हां!
Wink

>>>
Filmy | 2 August, 2016 - 20:56

ग गद्याचा!

साती | 2 August, 2016 - 22:05

रोज सकाळी मायबोलीवर काय लिहावे प्रश्न पडे
सूचेल त्या त्या ओळी जोडुनी गझला लिहणे जमल मला

गोळा केले चार दोन ज्या फ्यानांचे मंडळ येते
वा वा वा वा म्हणताना 'लय भारी' तर ते म्हणल मला.

जमल/म्हणल वर सैराट इफेक्ट आहे हां!
डोळा मारा
<<<

फिल्मी आणि साती,

आभारी आहे. Happy

>>>> साती | 2 August, 2016 - 22:20 नवीन

आभार कसले मानताय?
बिचार्‍या शब्दांना पीळ पीळ पिळताय.
सोडा बिचार्‍यांना!
डोळा मारा
<<<<

ही अ‍ॅक्च्युअली तशी बर्‍यापैकी गझल आहे. पण स्वतःचे मत देणे हा अपराध आहे ह्याची जाणीव आहे. तुमच्या मताचा पूर्ण आदर! Happy

>>>> साती | 2 August, 2016 - 22:25 नवीन

डोळा मारा - शब्दात लिहू नका हो(आपोआप येतं ते पण एडीट करा)
लईच ब्येकार दिसतंय!
<<<<

मी फक्त कॉपी पेस्ट केला तुमचा प्रतिसाद

>>> साती | 2 August, 2016 - 22:30 नवीन

'आपोआप येतं ते पण एडिट करा.'

हे लिहलेलं वाचलं नाही का?
<<<

वाचलं. मी फक्त कॉपी पेस्ट केलं.

काय लिहायचं ते लिहिणार्‍यांनी ठरवावं. Happy

>>> साती | 2 August, 2016 - 22:37 नवीन

डोळा मारा

चालू द्या!

आज अड्ड्यावर पकवायला कोणी नाही म्हणून इथे टाईमपास केला.
<<<

धन्यवाद Happy

एक धावल्या यादीमधल्या अप्रतिम म्हणण्यास परी
बाकी सगळे कुठे उलथले हेच वाटते नवल मला

>>>> साती | 2 August, 2016 - 23:14 नवीन

एक धावल्या यादीमधल्या अप्रतिम म्हणण्यास परी
बाकी सगळे कुठे उलथले हेच वाटते नवल मला
<<<<

हा हा

वा

माझ्या गझलेमध्ये आता येतच नाही तुझा विषय
गोष्ट वेगळी की आताशा जमतच नाही गझल मला

ह्यापेक्षा कोणी दुर्दैवी असले तर कळवा बर का
मला पाहुनी उमलत जी, ती फुले म्हणाली "उमल" मला

ऋतू आणले, कळ्या आणल्या, नाही नाही ते केले
तुझ्याएवढा सुचला नाही शेर कधीही तरल मला.
वा!

छान

>> ऋतू आणले, कळ्या आणल्या, नाही नाही ते केले
>> तुझ्याएवढा सुचला नाही शेर कधीही तरल मला.

क्या बात Happy