D(is)hoom ची धूम ! - (Movie Review - Dishoom)

Submitted by रसप on 30 July, 2016 - 01:31

'अभिनय' नावाची हवा जॉन अब्राहमपर्यंत पोहोचेपर्यंत इतकी मंद होते की तिने त्याच्या नाकावरची माशी हलतसुद्धा नाही, उडणं तर सोडाच ! तो दिसायला चांगला आहे म्हणावं, तर अंघोळीच्या नावाखाली डोक्यावर एक बादली ओतून रोज अर्ध्या मिनिटात बाहेर येत असावा इतका तो पारोसा दिसतो. तो नाचायला लागला की थेट सनी देओलची आठवण येते. त्याची संवादफेक फार तर रामी रेड्डीपेक्षा थोडीशी बरी आहे.
तरीही जॉन अब्राहमला लोक सिनेमात का घेतात, हा प्रश्न मला कधी कधी पडतो.
'फॅन फॉलोईंग' हे एकमेव कारण असावं. कारण त्याच्या मागे त्याचे आई, बाप, बहिण, भाऊ वगैरे कुणीही नाहीत आणि ह्याच एकमेव कारणामुळे तो कितीही सुमार असला तरी मला त्याच्याबद्दल थोडासा आदरही वाटतो. पण थोडासाच. एरव्ही शैलेन्द्र सिंग, नितीन मुकेश वगैरेंचा सुरेलपणाशी आणि हनी सिंगचा एकूणच संगीताशी जितका संबंध आहे तितकाच जॉन अब्राहम मला सहन होतो.

हे का सांगितलं ?
तर 'असं' असूनही मी 'डीशूम' पाहायला गेलो कारण -
१. ठोकळा असला तरी 'बॉडी' जबरदस्त बनवली आहे त्याने. 'सुपर कॉप' वगैरे अभिनय आवश्यक नसलेल्या भूमिकांसाठी अगदी फिट्ट आहे आणि त्याचा फिटनेस सलमानसारखा बोदला नाहीय. 'सुलतान'मध्ये ट्रेनच्या बाजूने पाय न उचलता धावणारा फोफसा सलमान आणि 'डीशूम'च्या ट्रेलरमध्ये पाठलाग करताना धावतानाचा जॉन ह्यांच्यात इंझमाम आणि धोनीच्या धावण्याइतका फरक आहे.
२. ट्रेलरमध्ये दिसलेला वरुण धवन आवडला होता !
३. अक्षय खन्ना मला नेहमीच खूप सिन्सियर वाटला आहे आणि हे त्याचं पुनरागमन. (ह्यानंतर त्याचा कुठला सिनेमा येतो आहे, असं सध्या तरी ऐकिवात नाही !)
४. टाईमपास मूव्ही पाहायचा होता आणि 'डीशूम'चा दिग्दर्शक धवन-पुत्र आहे आणि 'डेव्हिड धवन' हे नाव माझ्या पिढीच्या मनावर विशिष्ट पद्धतीने कोरलं गेलेलं आहे. त्याच्या सिनेमांनी आमच्यावर असा संस्कार केला आहे की 'धवन' आडनावाच्या कुणालाही आम्ही फारसं गांभीर्याने घेतच नाही. कदाचित म्हणूनच वरुण धवनने केलेले 'मैं तेरा हिरो' वाले माकडचाळे विसरुन आम्ही त्याचा 'बदलापूर'च लक्षात ठेवतो. कदाचित म्हणूनच (काहीही नातं नसतानाही) शिखर धवनकडूनही विशेष काही अपेक्षा नसतात ! Proud 'रोहित धवन'ने वडिलांकडून निरुपद्रवी मनोरंजनाचा बोध घेतला आहे का, हे पाहायचं होतं.

सिनेमाबद्दल बोलण्यापूर्वी सिनेमाच्या शीर्षकाबद्दल बोलू.
'डीशूम' काय ? किती पोरकट नाव असावं ? काही अर्थ आहे का ह्याला ? वगैरे प्रश्न मला पडले. मग जाणवलं, च्यायला 'डिशक्याँव'सुद्धा असू शकलं असतं की ! त्यापेक्षा तरी बरं आहे !
तर ह्या नावावरुनच स्पष्ट होतं की हा एक 'अ‍ॅक्शन कॉमेडी' सिनेमा आहे आणि तो निराशा करत नाही !

कुठल्याश्या आखाती देशात होणाऱ्या कुठल्याश्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत भारताचा स्टार फलंदाज विराज शर्मा (साकीब सलीम) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि भारताला सामने एकहाती जिंकून देतो आहे. पाकिस्तानशी खेळला जाणार असलेला अंतिम सामना दोन दिवसांवर असताना त्याचं अपहरण होतं आणि भारत व तो आखाती देश, अशी दोन्ही सरकारं खडबडून जागी होतात. त्याला शोधण्यासाठी एक स्पेशल टीम तयार केली जाते आणि तिचा भाग म्हणून भारतातून कबीर शेरगिल (जॉन अब्राहम) ह्या 'स्टार कॉप'ला पाठवलं जातं. स्वत:चा जोडीदार म्हणून कबीरला स्वत:चं डोकं न चालवणारा व स्थानिक माहिती असलेला एक माणूस हवा असतो. तो 'जुनैद अन्सारी' (वरुण धवन) ला निवडतो. विराजच्या अपहरणात एक बुकी 'वाघा' (अक्षय खन्ना) चा हात असतो.
बाकीची कहाणी कुणीही सुज्ञ प्रेक्षक स्वत:च जाणतो.

खुमासदार वनलायनर्स आणि काही परिस्थितीजन्य चटपटीत विनोद ह्यांची अचूक पेरणी, गतिमान कथानक आणि काही थरारक अ‍ॅक्शन ह्या सगळ्यामुळे पूर्वार्ध 'पॅक्ड विथ एण्टरटेन्मेंट' आहे. इंटरवलनंतर मात्र तो ढेपाळतो. शेवटी तर घाईघाईत गुंडाळून आवरतं घेतल्यासारखंच झालं आहे.

dishoom-first-official-poster-smoking-varun-dog-bw-1.jpeg

पण ह्या संपूर्ण वेळात, वरुण धवन धमाल करतो ! तो सहाय्यक भूमिकेत असला तरी जॉन अब्राहमला सहज झाकून टाकतो. अर्थात, जॉन अब्राहमला झाकणं ही काही फार मोठी अचिव्हमेंट नाहीच. तरी, चांगली गोष्ट ही की तो झाकला जातो आणि त्यामुळे सिनेमा बघावासाही वाटतो.
अक्षय खन्नाच्या भूमिकेची लांबी कमी आहे आणि तो फार काही छाप सोडत नाही. हे त्याचं पुरागमन फूसकंच ठरेल असं वाटतं. (त्याचं आखडून चालणं पाहता, तो एखाद्या रोबोच्या भूमिकेत शोभेल, खरं तर.)
फताड्या जिवणीच्या अभिनेत्र्या सध्या खूप झाल्या आहेत. ज्यांची जिवणी फताडी नाही, त्या शस्त्रक्रिया करून घेऊन ती फाकवत आहेत, हे त्याहून वाईट ! ह्या सगळ्या गायबाजारात (बैलबाजार तसा गायबाजार !) मला त्यातल्या त्यात जॅकलिन फर्नांडिस सहनीय वाटते. इथे मात्र ती नुसती सहनीयच नव्हे तर 'बघणीय'ही वाटली ! तिच्यात जाणवलेला खट्याळपणाही भावला ! आणि नर्गिस फाक्री फक्त काही मिनीटांसाठीच आहे, हे अतिशय उत्तम झालं.
पाहुणे कलाकार म्हणून अक्षय कुमार आणि सतीश कौशिक (फक्त आवाज) सॉलिड धमाल करतात ! विराज शर्मासोबतचा सेल्फी तर जबरदस्तच !

सिनेमादरम्यान एकच गाणं आहे. तेही उगाच आहे. बाकी आजचं सिनेसंगीत ही एक स्वतंत्रपणे गांभीर्याने विचार करण्याजोगी समस्या असल्याने त्यावर दोन-तीन वाक्यांची टिपणी पुरेशी नाही. दुसरं म्हणजे, 'भयाण' सदरात मोडणारी अनेक गाणी मी गेल्या काही वर्षांत सोसली आहेत आणि 'डीशूम-संगीत' कानांना फार त्रास तरी देत नसल्याने दुर्लक्ष करता येतं म्हणून केलं.

'डीशूम'वर 'धूम'चा प्रभाव सतत जाणवत राहतो. हे नावही फक्त दोन अक्षरं जोडून त्यावरुनच उचलल्यासारखं वाटतं. तोच वेग, तशीच हाताळणी असेल आणि त्यात 'उदय चोप्रा' नसेल तर 'धूम' कसा वाटेल ? तसाच 'D(is)HOOM' आहे, दुसरं काही नाही.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/07/disoom-movie-review-dishoom.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुतेक मी पण टाईमपास म्हणूनच बघेन... जॉन स्वतः निर्मिती करतो तेव्हा मात्र चांगले विषय निवडतो.. त्यासाठी तरी त्याला चित्रपट मिळावेत असे वाटते.

वरूण धवन ची कॉमेडी आवडते . ( मै तेरा हिरो सारखा तद्दन आचरट सिनेमा , केवळ त्याच्यामुळे सहनीय आहे )
त्याच टायमिंग भन्नाट आहे , शेवटी डेव्हिड धवनचा मुलगा आहे तो .

ट्रेलरमध्येच जॅकलीन आवडली.

बघायचा आहे , वेळ जमवायला लागेल.

दिनेश. | 30 July, 2016 - 12:38 नवीन
बहुतेक मी पण टाईमपास म्हणूनच बघेन...

>> हो. टाईमपाससाठीच मीही पाहिला. मजा आलीच. Happy
पण सेकंड हाफ भरकटलाय.

----------------------

जॉन स्वतः निर्मिती करतो तेव्हा मात्र चांगले विषय निवडतो.. त्यासाठी तरी त्याला चित्रपट मिळावेत असे वाटते

>> विकी डोनर, मद्रास कॅफे, रॉकी हँडसम असे तीनच प्रोड्यूस केलेयत. 'रॉकी हँडसम' ठीकच होता. बाकी दोनबाबत सहमत.

'अभिनय' नावाची हवा जॉन अब्राहमपर्यंत पोहोचेपर्यंत इतकी मंद होते की तिने त्याच्या नाकावरची माशी हलतसुद्धा नाही, उडणं तर सोडाच ! तो दिसायला चांगला आहे म्हणावं, तर अंघोळीच्या नावाखाली डोक्यावर एक बादली ओतून रोज अर्ध्या मिनिटात बाहेर येत असावा इतका तो पारोसा दिसतो. तो नाचायला लागला की थेट सनी देओलची आठवण येते. त्याची संवादफेक फार तर रामी रेड्डीपेक्षा थोडीशी बरी आहे. >>> अभिनय आणि नाचण्याच्या बाबतीत ठीक आहे, पण दिसण्याच्या बाबतीत सॉरीच!!! जॉन अब्राहम निर्विवाद चांगला दिसतो...त्याच्या गालावरच्या खळ्या तर खूपच गोड़ आहेत!

सतीश कौशिक (फक्त आवाज) >> कुत्र्याला वगैरे आवाज द्यायचा प्रकार नाही ना? Wink

तो दिसायला चांगला आहे म्हणावं, तर अंघोळीच्या नावाखाली डोक्यावर एक बादली ओतून रोज अर्ध्या मिनिटात बाहेर येत असावा इतका तो पारोसा दिसतो.
>>>>
रसप आपली सौंदर्याची व्याख्या बहुधा मागच्या जनरेशनची आहे Happy
त्याचे सौंदर्य त्याच्या बोडीच्या शेपमध्ये आहे आणि त्या एकमेव कारणामुळे तो फिल्म ईंडस्ट्रीमध्ये टिकून आहे.
अर्थात माझा तो काही फार आवडता नाहीये ती गोष्ट वेगळी. पण एक माणूस म्हणून नेहमी भला वाटतो.

@ डिशूम, असा काही पिक्चर आहे हे या धाग्यामुळे समजले. ट्रेलर बघत नसल्याने खान सुपर्रस्टार वगळता ईतरांचे चित्रपट आलेले मायबोलीवर त्यांचे परीक्षण वाचल्यावरच समजते..

एकूण वाचून मला ईंटरेस्टींग वाटतोय, घरात निवांत वेळी बघायला हरकत नाही.

मला त्यातल्या त्यात जॅकलिन फर्नांडिस सहनीय वाटते. इथे मात्र ती नुसती सहनीयच नव्हे तर 'बघणीय'ही वाटली ! >>>> मला ती नेहमीच फारच बघणीय वाटते. एखाद्या बार्बीडॉलसारखी. तिच्याकडे पाहिले तर मनात विचार येतो की हि आपली गर्लफ्रेंड असती आणि आपण हिच्याबरोबर फिरायला गेलो असतो तर सारे लोकं आपल्याकडे (म्हणजे तिच्याकडेच) बघत बसतील आणि किती ऑकवर्ड होईल. मग या टेंशनने नकोच अशी गर्लफ्रेंड म्हणून डोक्यातून ते झटकून टाकतो

पारोसा तर पारोसा, कुठे आपल्याला त्याची धुलाई करायची आहे. अगदी डुकरासारखा टाटा यंग बरोबर चिखलात लोळला तरी जॉन म्हणजे.... जाऊ द्या, काय आता गीता वाचून फायदा!

जॉन अब्राहम आणि मिलिंद सोमण ह्या दोन लोकांना मायबोलीवर अतिप्रचंड डोक्यावर चढवलेलं आहे मग त्यांच्यात कसलं काही पोटेन्शियल असो वा नसो.

मिलिंद सोमण मराठी असल्याने असेल .. पण येस्स, माझ्यासाठीही हे नवीनच होते, की मिलिंद सोमणची ईतकी क्रेझ असू शकते हे पहिल्यांदा मायबोलीवरच अनुभवले..

पण जॉन अब्राहमची क्रेझ तर मायबोलीबाहेरही आहे .. भारतभरात.. जगभरात आहे.. पर्सनॅलिटीच्या बाबतीत तो अक्षयकुमारलाही खाऊन टाकतो. अभिनय कधी कधी डोक्यात जातो त्यामुळे चित्रपटांत बघवत नाही फारसा ईतकेच..

अवांतर - जॉन लांब केसात छान दिसतो की अगदी छोट्या हा पोलचा विषय ठरू शकतो Happy

मिलिंद सोमण आणि जॉन.. They are full package man..
तोड मॉडेल आहेत.. चुम्मेश्वरी एकदम ..
२ मिन साठी अक्षय आहे ना.. वाह.. थेटरात पाहिलसं वाटत नाही पण बघेल समोर आला तर..
रॉकी हँडसम चा वरिजनल कोरियन मुव्हीला १००% रॉटन टोमॅटोचे रेटींग आहे म्हणुन निशिकांत कामत ने बनवायचा विचार केला असेल.. काही दिवसांपूर्वीच पाहिला.. तितकासा आवडला नाही. वन टाईम वॉच आहे.. पोरीच काम आवडलं.. जॉन मद्रास कॅफे तसेच दोस्ताना मधे आवडला.. जिस्म पाहिला नाहीए.. विकी डोनर मधे शेवटच्या आयटम साँग मधे तो आयुष्यमान आणि यामी (?) दोघांनाह पुरुन उरतो..त्याला हलके फुलके काम चांगले वाटतात.. सिरीयस रोल मधे झेपत नाही तो..

जॉन स्वतः निर्मिती करतो तेव्हा मात्र चांगले विषय निवडतो.. त्यासाठी तरी त्याला चित्रपट मिळावेत असे वाटते>>
बाकी दिदाला सहमत..

मिसोफॅनसाठी खुषखबर म्हणजे 'कॅप्टन व्योम' शो परत एकदा भेटीला येत आहे.. आय गेस रिरीलीज होतोय. पण आजकालच्या गड्यांना तो अज्याब्बात झेपेलसं मात्र वाटत नाही. फारफार तर आमच्या पिढीतले त्याचे फॅन त्याच्यासाठी बघु तो शो..

मिलिंद सोमणची क्रेझ हा खरेच एक नवीन शोधाचा विषय होऊ शकतो. प्रचंड फॅन्स आहेत त्याचे मात्र वरवर दिसुन नाही येत. Wink

वरुण धवनची क्रेझ लहान व टिनेज पोरांमध्ये फार आहे, इव्हन कोहलीपेक्षा जास्त फॅन फॉलोंईग असेल त्याचा.

जॉन आवडलाय तो जिस्म मध्ये 'आवारापन बंजारापन' गाण्यात. अर्थात गाण्यामुळे असेल.

जॉनची fan नाही पण आवडतो मला, दिसायला चांगला आहे. गालावरच्या खळ्या मोहक आहेत आणि हसतो छान. वरूण धवन आवडला परवा च ह ये द्या मध्ये, मूवी त्याच्या कुठल्याच बघितल्या नाहीयेत अजून. हा पण टीव्ही वर आला तर बघायचा विचार करेन.

टीना बघायला हवी परत 'कॅप्टन व्योम', Happy .

सीमंतिनी,
वॉटर बघायचा आहे पण सापडेना मला Sad
त्यात सीमा बिस्वास सुद्धा आहे ना.. माझी आणखी एक आवडती अभिनेत्री.. एखाद्यामधे गट्स असुन वाया घालवलेल्या कलाकारात हिचपन एक नाव अ‍ॅड होईल Sad

जॉनच्या गालावरच्या खळ्या.. हाय मै मरजावा..

मिसो आणि जॉन दोघेही वेगवेगळ्या जनरेशन मधले म्हणुया का ?

मला बघायला मिळाली तर मीपन बघेल कॅप्टन व्योम..

जॉन अब्रह्म्म फक्त मल्याळम मूवीत एका माडावर चढलेला माणूस म्हणून्न रोल करु शकतो.

इतका ठोकळा टाईप आणि एक डोळा बारीक असलेला का बरं आवडत असेल हा संशोधनाचा विषय आहे. पण कोणीतरी हे संशोधान करेल तरच वाचू. Proud

जॅकलीन्चे डोळे पहाता नक्की चायनीज आई होती की वडील हा प्रश्ण भेडासावतो.

जॉन अब्राहम आणि मिलिंद सोमण ह्या दोन लोकांना मायबोलीवर अतिप्रचंड डोक्यावर चढवलेलं आहे मग त्यांच्यात कसलं काही पोटेन्शियल असो वा नसो.≥>>>>>>>>>>>>> +9999999

मायबोली कोणाला डोक्यावर घेईल सांगता येत नाही. तरी त्यातल्या त्यात मी जॉनला जास्त मार्क देईन. दिसायला बरा होता, हल्ली कुठेतरी trailor मध्ये दिसला तो एकदम बोदल्या वाटला, पण ते तात्कालिक असावे. त्याची खळी आणि हास्य गोड आहे. रूपवान लोकांकडून अभिनयाची अपेक्षा ठेऊ नये. काय काय करणार बिचारे. जिस्ममध्ये बघायला आवडलेला मला, पण आता त्याला 15 वर्षे तरी झाली असावीत.

जकलीन गोड दिसायची आधी, नंतर अजून गोड दिसायच्या नादात भजे झाले चेहऱ्याचे.

साधना, त्यांच्यात 'दिसायचं' पोटेन्शियल आहे एवढं पुरेसं नाही का ? त्यांच्याकडून अभिनयाची अपेक्षा त्यांचे फॅन्स पण ठेवत नाहीत Happy

जॉन अब्राहम आणि मिसो नुसते मॉडेलिंग करताना दिसले तर त्यांच्याकडून कसल्याच अपेक्षा ठेवू नयेत कारण त्यांचं काम गोग्गोड दिसत ब्रँड कॅरी करणं आहे हे पटतं. पण पिक्चरमध्ये अ‍ॅक्टिंग (?) करतायत म्हटल्यावर त्यांच्या नुसत्या दिसण्यावर फिदा होत मठ्ठपणाकडे किती तास दुर्लक्ष करणार हे ही आहेच. त्यांनी पिक्चरमध्ये येऊ नयेच.

@सीमंतिनी,
आपल्या दुगाण्या आपण आपल्या स्वतंत्र बाफवर झाडाव्यात, ही विनंती. Happy

----------------------------

लोकांना वाटतं की ते मिसो वगैरेंचे फॅन आहेत. प्रत्यक्षात त्यांना त्याला बघायला फक्त आवडत असतं. ह्याला फॅन म्हणत नाहीत. फॅन फॉलोईंग असतं तर तो फ्लॉप झाला नसता. त्याने केलेली फालतू कामंही लोकांनी आवडीने पाहिली असती आणि डोक्यावरही घेतली असती. जशी अनेक लोकांची घेतली जातात.

सिनेमा पाहिला मी काल.

परीक्षणाशी सहमत आहे फक्त अक्षयकुमारचा मुद्दा सोडून. त्याने धमाल वगैरे काही केलेली नाही पांचटपणा केलेला आहे असे मी म्हणतो.

पटकथा अजून गच्च बांधता आली असती असे वाटले. शोधकार्याचा थरार वाटत नाही एकंदर, गतिमानतेला खूप वाव असूनसुद्धा!

सायो,
माबो हाइप माहित नाही , पण जॉन आवडतो आधी पासूनच.
'हाय हनी आयॅम होम' अ‍ॅड पासूनच आवडतो .
मॉडेल टर्न्ड अ‍ॅक्टर सारखा ठोकळा मला तरी नाही वाटत.
'धूम' मधल्या निगेटीव रोल मधे सर्वात जास्तं आवडला.
वॉटर, विरुध्द , पाप, जिस्म, दोस्ताना मधेही आवडला.

आवारापन चांगले आहेच. राहत फतेह अलींचे "लगन लागी" पण आवडते. (त्या सिनेमात जॉन अब्राहम समोर हिरोईन आणायची तर ती भिक्षुणी. महेश भट्ट इतके ट्विस्टेड माईंड फार कमी लोकांचे असेल Happy )

{{{ जॉन अब्राहम आणि मिलिंद सोमण ह्या दोन लोकांना मायबोलीवर अतिप्रचंड डोक्यावर चढवलेलं आहे मग त्यांच्यात कसलं काही पोटेन्शियल असो वा नसो }}}

यात ऋन्मेषचं नाव का टाकलं नाही.

{{{ सीमंतिनी | 31 July, 2016 - 14:50 नवीन

आवारापन चांगले आहेच. राहत फतेह अलींचे "लगन लागी" पण आवडते. (त्या सिनेमात जॉन अब्राहम समोर हिरोईन आणायची तर ती भिक्षुणी. महेश भट्ट इतके ट्विस्टेड माईंड फार कमी लोकांचे असेल स्मित ) }}}

तुम्ही जिस्म आणि पाप या दोन्ही चित्रपटांविषयी एकत्रित रीत्या लिहिताय का?

ओव्हरहाइप बाबत सहमत, जॉन आणी मिसो दोघही अभिनयात शुन्य आहेत पण त्यातला त्यात जॉन मिसो पेक्षा कमी ठोकळा आहे,

Happy .. मिसो. ला मी पण अभिनेता मानत नाही म्हणुन मॉडेल म्हणुन दिसायला आवडतो.
अब्राहम, म्हणजे अर्नाल्ड . रुप नाही, अभिनय नाही. पण कमावलेले शरीर म्हणुन तसल्या सिनेमात चालतो.
ते दोघेही परवडले पण त्या जॅकलीनची इथे थोडे थोडी हवा आहे हे बघुन धक्काच बसला. अरे कसली ती बाई, कोण घेतं तिला सिनेमात? का घेतात?

Pages