जगणे असे !

Submitted by रेकु on 24 July, 2016 - 05:37

जगणे असे, मरणे जसे,
सरणासवे जळणे जसे!
जगणे असे, हारणे जसे,
राखेतूनी उरणे जसे!
जगणे असे, रुतणे जसे
काट्यापरी सलते जसे!
जगणे असे, सरणे जसे,
तेजाऴले, झाले रिते!
जगणे असे, म्रुगजऴ जसे,
फेसाऴले झाले फिके!
जगणे असे, पऴणे जसे,
वाटेपरी झाले जुने!
जगणे असे, दमणे जसे,
श्वासापरी झाले मुके!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users