" एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो रमेशबाबू ! "

Submitted by सुप्रिया जाधव. on 20 July, 2016 - 06:02

" एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो रमेशबाबू ! "

निव्वळ मनोरंजनाचा भाग म्हणून
अनेकवार ऐकलेला डायलॉग
रेड एफ एम वर ...
अनेकांकडून...
गम्मतशीररित्या उच्चारून घेतला जात होता
ड्राइवहींग व्हीलवरच्या तिच्या हाताची घट्ट झालेली पकड़
एक्सलरेटरवरचा वाढलेला दबाव
उघड्या खिडकीतुन भरारा येणारा हाय वे वरील वार्याचा झोत
तिच्या विचारचक्राला चालना देवून गेला
ताजे होत गेले त्याच्या नसण्याने उदभवलेले एक-एक प्रसंग
नजरेसमोर तरळायला लागले

जर्जर आईच्या आजारपणाची एकटीने केलेली उस्तवार
तिच्यानंतर तिच्या पैशावर हक्क सांगत जीवावर उठलेला पाठचा
संधी साधून अतिप्रसंग करणारा आत्याचा
हाती लागत नाही पाहिल्यावर बदनाम करणारा कुणी सासरचा
आता काय सहज उपलब्ध होवू शकेल ह्या विचाराने
तिला पाहून नव्याने पालवी फुटलेले
जमीनदोस्त झालेले बरेचसे आसपासचे ओंडके
कार्यक्षेत्रात नव्या सन्धी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवणारे
न थकता लोचट गळ घालणारे रोजचे
त्याच्यानंतर व्यवसायात सपशेल बुडवणारे विश्वासाचे
सल्लामसलतीचा फ़ार्स करून ओरबाडणारे वकील
संधीवर डोळा ठेवून असणारे सी ए
कुंपणासहीत शेत गिळंकृत करायला निघालेल कुळ
पोस्टमार्टेमपासून स्मशानात होणाऱ्या अंत्यसंस्कारापर्यंत
प्रोपर्टी नामांतरीत करताना
एम् एस ई बी त लाईटबिलावरचे नाव बदलताना
निर्लज्जपणे लाच मागणारे महाभाग !

सासरच्या लग्नात कुंकवाशिवाय
आवर्जुन हातात दिेली गेलेली पांढरी साड़ी
माहेरच्या फॅमिली गटटुगेदरमधे
नेमके तिला वगळून सर्वांना लावले गेलेले कुंकू
श्रावणातील सत्यनारायणाच्या पुजेतील खुणावणारा रिकामा पाट
बारसे, साखरपुड़ा, लग्न, मुंजी, उदयापने येथील न आलेली आमंत्रणे
आणि हौसेने दारात काढलेली सुबक
मात्र कुंकवाशिवाय रंग उडालेली दिवाळीची रांगोळी !!!!

खरच !

तिलाही बेंबीच्या देठापासून ओरडावेसे वाटले ....

" एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो रमेशबाबू ! "

सुप्रिया

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रभावी ललित! ह्या ललिताचा आणि तुमच्याच 'त्या' ह्या शीर्षकाच्या धाग्याची जन्मप्रक्रिया मला माहीत असल्यामुळे येथे वेगळे काही लिहीत नाही. द्यायचा तेथे दिलखुलास प्रतिसाद दिलेलाच आहे.

सस्मित,
सार्कॅस्टीकली नाही, काळजीने विचारलंय.
अजूनही असं होतं!
मी मूळ प्रतिसादातला क्वेश्चनमार्क बदलते.

सुप्रिया, तुम्ही दुखावल्या गेल्या असल्यास क्षमस्व!

सत्य प्रभावीपणे मांडलय.

एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो रमेशबाबू ! >> म्हणुनच तर कितीतरी जणी फक्त या एक चुटकी सिंदुरासाठी त्याला सहन करत असतात. दारु पिऊन, त्याच्या शिव्या, लाथा खाऊनही खंगुन मरायला टेकलेल्या त्याला वाचविण्यासाठी जिवाचं रान करत असतात.

साती,
अहो...नाही नाही ..
दुखावले गेले होते असेच म्हणता नाही येणार मात्र चक्रावून नक्कीच गेले होते !

सर्व प्रत्तिसाददात्यांचे मनःपूर्वक आभार !

हे आणि ..."त्या"...ही दोन्ही ललित एका वॉट्सएप गुपवर घेण्यात आलेल्या उपक्रमामुळे सुचले आहेत !
ज्यामुळे मोकळ वाटते आहे आता.

त्या ग्रुपची ऋणी !

धन्यवाद !

सुप्रिया

ह्यात ले बरेच अनुभव जवळून पाहीले आहेत Sad
दु:खी स्त्री ला अश्या वागणूकी अजून दु:खी आणि एकटे बनवतात... Sad

<<<<सुन्न झाले.
यापुढे " एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो रमेशबाबू ! " हा डायलॉग ऐकल्यावर हेच ललित आठवेल.>>>>..खरंय अगदी:(

सुप्रिया,

माझा हा दुसरा प्रतिसाद! अतिशय हृदयस्पर्शी ललित! पुन्हा वाचले. खूप खूप शुभेच्छा, पुढील इतक्याच प्रभावी लेखनासाठी!

क्या बात है सुप्रियाजी,
साष्टांग आमच्याकडून!!!

____/\____

आवडत्या दहात !

क्या बात है सुप्रियाजी,
साष्टांग आमच्याकडून!!!

____/\____

आवडत्या दहात !

Kay dalan aahe! I had normally came across practical, alert and fighter ladies in the face of the adversity. This is just a crowd pleaser; there is other reality too if you let go of a pity party.

Loss of dear one is albeit painful but

सर्वांची अंत:करणापासून आभारी !

निवडक 10 साठी विशेष मंडळी !

मनापासून धन्यवाद बेफिजी...... प्रयत्नरत राहीन !

सुप्रिया.

खूप सारे वास्तव मोजक्या शब्दात अचूक मांडले आहे.
यातिल सगळेच्च्या सगळे कुणा एकीच्या वाट्याला येत असेल वा नसेलही, पण किमान काहि बाबी तरी स्त्री म्हणून नक्कीच वाट्याला येतात.

निल्सन | 20 July, 2016 - 08:27 नवीन
सत्य प्रभावीपणे मांडलय.

एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो रमेशबाबू ! >> म्हणुनच तर कितीतरी जणी फक्त या एक चुटकी सिंदुरासाठी त्याला सहन करत असतात. दारु पिऊन, त्याच्या शिव्या, लाथा खाऊनही खंगुन मरायला टेकलेल्या त्याला वाचविण्यासाठी जिवाचं रान करत असतात <<<<<<<<<<< ह्याच जिवंत उदाहरण म्हणजे माझी आई. हे सगळं अनुभवलं आहे तिने. Sad त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही आत्ता.

खुप हृदयस्पर्षी आहे.. आजही नवरा जाणे हे तुमचा जिवलग जाणे किंवा तुमच्या आयुष्यातली एक व्यक्ती जाणे यापेक्षा तुमच्या आयुष्यातल्या खुप काही गोष्टींवर काट मारणे आहे.

स्वरा Sad

Pages