भिकारी...

Submitted by झुलेलाल on 19 July, 2016 - 00:58

मरणाआधीच मेलेल्या
जित्या मढ्याचा प्राण
चितेच्या चटक्यांनी कळवळून
बाहेर पडला आणि लांबूनच
जमावाचे अश्रू न्याहाळताना
त्याला खदखदून हसू फुटले...
भेसूर नजर भवताली भिरभिरली
अन् हात पसरून आत्मा
निघाला भीक मागण्यासाठी..

देहक्लेशांची नाटके बंद करा,
अन् चित्तक्लेशाचे रेचक रिचवा..
होऊ द्या झडझडून झाडा
पडून जाऊ द्या विकृतीच्या कृमी
कधीतरी जेव्हा वाटेल लाज,
गळून जाईल लिंगाचा माज..

माझ्या झोळीत काही घालू नका
पण एक तरी मेणबत्ती पेटवा
मंद थरथरता उजेड
आतल्या आवाजापर्यंत पोचवा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users