डोंबिवली ते डोंबिवली (व्हाया लेह लडाख)

Submitted by Amey Gadgil on 17 July, 2016 - 02:13

शेवटी एकदाचा लेह -लडाख बाईक प्रवास घडलाच.डोंबिवली लेह डोंबिवली बाईक सफर करायची हा विचार गेले काही वर्ष माझ्या मनात होता मात्र तो कधी घडेल याची शाश्वती नव्हती.
प्रवासवर्णनाच्या सुरुवातीलाच शेवटी हा शब्द वापरून किती नकारात्मक सुरुवात केली असा कदाचित लोकांच्या मनात येईल पण ज्या कोणाला या सगळ्याची पार्श्वभूमी माहिती आहे त्यांना माझं म्हणणं पटेल याची मला खात्री आहे.
लेह लडाख बद्दल अनेकदा वृत्तपत्रं मधून, इंटरनेट वर अनेक लेख,गोष्टी, छायाचित्रे वाचली होती,पहिली होती. तेव्हा नेहमी वाटायचं आपण देखील हा प्रवास किंवा खरं सांगायचं तर या प्रवास यातनांचा आनंद लुटायचा पण वेळ काळ जुळून येत नव्हतं.
गेले काही वर्ष आम्ही मित्र या सफारीची चर्चा आणि ती कशी पार पडायची याचे मनसुबे आखात होतो.पण अखेरीस मागच्या वर्षी 2012 च्या सप्टेंबर मध्ये या सफारीचे नियोजन झाले आणि जुने 2013 मध्ये लेह डोंबिवली लेह बाईक सफर करायची हे नक्की झाले.योगायोगाने ते गणपतीचे दिवस होते, गणरायाचा आशीर्वाद पाठीशी असताना कुठल्याच गोष्टींची चिंता करायची गरज नव्हती.
जुने 2013 मध्ये जायचं नक्की झाल्यावर मी ,निनाद आणि निखिल आम्ही प्राथमिक माहिती गोळा करायला सुरुवात केली.इंटरनेट वर बरेच ब्लॉग वाचले काही ओळखीचा लोकांनी ही सफर आधी केली असल्याने त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचं मार्गदर्शन घेतलं त्यांनी सांगितलेले अनुभव आमच्या चांगल्याच उपयोगाला आले.या सर्वाना मी मनापासून धन्यवाद देतो. एक गोष्ठ आवर्जून सांगायला हवी, माहिती गोळा करणे प्रवासाच्या तारखा ठरवणे,परावासात लागणाऱ्या गोष्टींची यादी करणे अगदी कुठली औषधे बरोबर घेयला हवीत या सगळ्यात निखिल अग्रेसर होता. त्याने आमच्या प्रवासाचा अगदी योग्य अभ्यास करून त्याप्रमाणे चोख आखणी केली होती. आमच्या प्रवासातील सगळ्यात महत्वाच्या भागच श्रेय पूर्णपणे निखिल ला जात यात काही वादच नाही. आमच्या टीम चा तो कॅप्टीन च होता असा म्हणा ना .......
7 जुने 2013 ते 29 जुने 2013 या तारखा ठरल्या नंतर आम्ही तिघांनी मुख्य मुद्द्याला हात घातला. आपापल्या ऑफिसेस मध्ये सुट्टीसाठी अर्ज करणे. सुदैवाने आम्हा 3 ची राजा मंजूर झाली आमचा उत्साह द्विगुणित झाला. आणि आम्ही तीघेऊही जोमात तयारी ला लागलो .दरम्यान आमचा अतिशय जवळचा मित्र कुणाल याने देखील या लेह ला येण्याची ईच्छा दर्शविली. आमच्या नकाराचा प्रश्नच येत नव्हता.नंतरच काही दिवस आम्ही चोघे जण 7 जुने ची चातकाप्रमाणे वाट बघायला लागलो.
आधीच ठरवल्याप्रमाणे 7 जुन ला दुपारी 3 वाजेपर्यंत कुणाल च्या घरी जमायचे होते.त्यापरमाने आम्ही जमलो देखील. संध्याकाळी 5 वाजता निघायचा आमचा बेत वरून राजा ला मान्य नव्हता आणि कधी नावे तो 7 जुने च्या संध्याकाळी नभ मेघांनी आक्रमिले झालं आणि जोरदार पाऊस पडायला लागला बघता बघता ठाण्याच्या वृंदावन सोसाटी मध्ये पाणी भरलं, थोडीफार पाऊस थांबण्याची वाट बघितली पण पथ्य चांगलाच मूड मध्ये होता,पण मग शेवटी आम्ही प्रवासाला सुरवात करायचे ठरवले. गणपती बाप्पा मोरया म्हणत कुणालाच भाऊ आणि त्याचे वडील यांचा निरोप घेतला.
घोडबंदर रोड वरील ट्राफिक जाम मधून मार्ग काढीत साधारण 7 च्या सुमारास आम्ही मुंबई अहमदाबाद हायवे गाठला.पाऊस थांबण्याची कुठलीच चिन्हे दिसत नव्हती. मोठे ट्रक दुंपेर बसेस यांना मागे टाकत वापी चा दिशेने प्रवास सुरू केला. पहिल्या दिवशी वापी गाठायचे ठरविले होते.
मात्र वरून राजाला माँचे मनसुबे उधळून लावायचे होते. ठाण्यापासून साधारण 40 ते 50 किमी अंतरावर निनाद च्या बाईक मध्ये बिघाड झाला आणि बंद पडली. सुरुवातीला बाईक सुरू करण्याचे काही जुजबू प्रयत्न केल्यावर लक्ष्यात आलं हे प्रकरण काही साधं नाही. आम्ही रस्त्याच्या बाजूला पुरेसा प्रकाश मिळेल अशी मोकळी जागा बघायला लागलो.
पण अंधार आणि पावसाच्या जोरदार सारी यामुळे काहीच अंदाज येत नव्हता,मी आणि कुणाल आम्ही दोघांनी थोडं पुढे जाऊन जागा शोधायचे ठरविले.नशिबाने साधारण 1 किमी अंतरावरच आम्हाला एक पेट्रोल पम्प दिसला जिथे पुरेसा प्रकाश आणि भरपूर मोकळी जागा होती.बंद पडलेली बाईक धक्का मारत तिथे नेण्याचे ठरविले.
अचानक बाईक बंद पडल्याने आम्ही 4 जरा निराश झालो होतो कारण निघण्याचा आधी आम्ही आमच्या बाईक चे routine chek ups करून घेतले होते. भरपूर पाऊस पडत असल्याने पेट्रोल टॅन्क मध्ये कदाचित पाणी गेलं असेल याची शंका आली. टॅन्क मधून पेट्रोल थोडे ड्रिन करून पाणी आणि पेट्रोल मिक्स झाले आहे का ते तपासायचे बघितले.आमचा अंदाज खरा ठरला मग थोडेफार अजून पेट्रोल काढून परत बाईक स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, दरम्यान बाईक स्टार्ट करण्याचे इतके प्रयत्न झाले होते की बॅटरी डाउन झाली. त्यामुळे धक्का स्टार्ट ला आता पर्यायच नव्हता,देवाच्या कृपेने 2,3 प्रयत्नामध्ये आले आणि finally एंजिने चा आवाज कानी आला,आम्ही 4 सुटकेचा निश्वास टाकला. आमच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हा चौघाना जाणवला.या गडबडीत आमचा बराच वेळ वाया गेला आणि पाऊस पण सुरू होता त्यामुळे आता वापी गाठणे शक्य नव्हते. आम्ही मनोर येथे राहण्याचा निर्णय घेतला.मनोर ला हायवे ला लागून असलेल्या एक ढाब्यावर राहायची सोय झाली.ढाब्यावरच्या चाच्यांनी आमचा व्यवस्थित पाहुणचार केला बहुदा आमच्या दमछाक झालेल्या अवस्थेकडे बघून त्यांना तास वाटलं असावं आमचे ओले कपडे वळवण्यासाठी त्यांनी आम्हाला वेगळी जागा दिली अशाप्रकारे पहिल्या दिवशीचा प्रवास मनोर ईथेच संपला साधारणपणे 80 किमी चा टप्पा गाठला.दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रवास सुरू करण्याचे ठरविले होते.ठरल्या प्रमाणे सगळे लवकर उठून पटापट यावरून तयार देखील झालो आणि बाईक वर सामान बांधायला सुरुवात केली.आणि पहिल्याच दिवशीओ लक्ष्यात आले की हा कंटाळवाणा प्रकार पुढचे 20 दिवस दिवसातून 2 वेळा करायचा आहे. सुदैवाने आज आम्हाला निसर्गाने चांगली साथ दिली.
स्वछ सूर्यप्रकाश चांगले आणि मोठे रस्ते यामुळे आमच्या गाड्यानी चांगलाच वेग पकडला होता.अल्पावधीतच आम्ही महाराष्ट्र बॉर्डर क्रोस केली आणि आपल्या राज्याला जय महाराष्ट्र म्हणत गुजराथ मध्ये प्रवेश केला.राज्य सीमा पार केल्या नंतर लगेच एक चहाची टपरी लागली तेथे थांबलो.ज्याने कोणी चहाला अमृततुल्य हे नाव दिले आहे त्याला माझा साष्टांग नमस्कार आहे. चहापान झाल्यावर परत पुढचा प्रवासाला लागलो दरम्यान आम्हाला एक बुल्लेट चा ग्रुप दिसला आमी त्यांना खुणेनंच ऑल थे बेस्ट दर्शवत शुभेच्छा दिल्या सुनंदार रस्ते आणि स्वच्छ प्रकाश याचा आम्ही पुरेपूर फायदा घेत होतो. आमच्या गाड्यांची चांगलाच वेग धरला होता. दुपार पर्यंत आम्ही भरूच गाठले आणि जेवायला थांबलो.
हॉटेल कुण्या एक मुस्लिम चाचा च होत त्याचा हॉटेल समोर गाड्या लावल्या आणि आत गेलो,आमचा एकूणच अवतार पाहून त्याने त्याच्या मनातल्या सगळ्या प्रश्नाची आरास आमच्या समोर मांडली.
थोड्याचवेळात वेटर ऑर्डर घेण्यासाठी आला,निनाद आणि कुणाल ने ऑर्डर देताक्षणी तो म्हणाला "साहब इसमे से अधा डिश नाही मिलेगा यह तो सिर्फ मेनू कार्ड के लिये लिखा है " मग आम्ही च त्याला सांगितले जो आपको अच्छा लागत है और जलदीने मिलेगा वो लेके आओ .त्याने आणलेल्या पदार्थांवर उदार भरणं नोहे जाणिजे यज्ञ कर्म एवढ्या परमाणिक इचछेने ताव मारला आणि पुढचा प्रवासाला निघालो.
गुजराथ मधील रस्त्यांची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे असे रस्ते आपल्या राज्यात का नाहीत हा आणि हाच प्रश्न मनात येत राहतो.जेवणं नंतर माझ्या बाईक चा ताबा कुणाल ने घेतला साधारणपणे दुपारइ 4 च्या सुमारास आम्ही बडोदा गाठले.बडोद्यापर्यंतच्या सुसाट प्रवासावर पुढचा प्रवास विरजण घालेल असे ध्यानी मनी पण वाटले नव्हते.बडोदा ते अहमदाबाद एक्सप्रेस हायवे असल्याने पुढील 90 कमी चा परावास एकेरी रस्त्याने करायचा होता कारण एक्सप्रेस हावे वर दुचाकी ला बंदी आहे .अतिशय कंटाळवाणा आणि धमछाक करणारा हा प्रवास होता.90 किमी चा रटाळ प्रवासानंतर आम्ही अहमदाबाद गाठले.आता मात्र चांगलीच भूक लागली होती. हिम्मतनगरच्या दिशेने थोडे अंतर गेल्यावर भेळेची गाडी लागली तिथेच आम्ही पोटोबा करायचे ठरविले. आम्ही घातलेलं जॅकेट रिडींग ग्लोव्हस knee and elbow guard वगरे बघून लोकांचा मनात कुतूहल निर्माण होत होत. तिथल्या एक मुलाने विचारले देखील रेस लागल्या है क्या ????
भरपेटनाश्ता करून आम्ही हिम्मतनगराचा दिशेने निघालो रस्ता टपो टाप होता त्यामुळे 80 किमी चा पल्ला गाठायला फार वेळ लागला नाही हायवे लागतच एक हॉटेल लागलं तिथे राहण्याची उत्तम सोय झाली.आदल्या दिवशीचा पावसाच्या तडाख्याने ओले झालेले कपडे परत एकदा धुवून वळत घातले आणि गुजराथी जेवण जेऊन आम्ही निद्रा राणीचा कुशीत गेलो.दिवसभराचा थकव्याने झोप कधी लागली समजलेच नाही आजच्या दिवसात साधारण 516 किमी चा टप्पा गाठला.

क्रमशः भाग 2

http://www.maayboli.com/node/59448

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरोखर अप्रतिम ..... अतिशय भावपूर्ण ..........

एवढा अप्रतिम अनुभव इथे शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद...

सह्याद्री मानव सेवा मंच, ठाणे - यांना वंदनच.... ____/\____

सुरेख लेख... !
काहीतरी एक possitive energy आहे ज्याची आपल्याला वेळोवेळी नितांत गरज असते,मग आस्तिकांनी ती देवरुपात बघितली काय आणि नास्तिकांनी त्यांचा अनुषंगाने...>>>हे खूपच आवडलं. लिहित रहा. Happy

Ya aadi vari var lihilela lekh chukun delete zala aahe...
Maay boli var mi navin asalyane,navin lekh lihitana to kasa suru karava yacha maza and aaj chukale...
Tari maafi asavi
Vari var lihilele likhan mi punha ekada lihun kadhun.

Amey Gadgil

लेख नेहमी वर्ड फाइल/नोटमध्ये सावकाश वेळ मिळेल तसा लिहून काढ.फोटो फ्लिकरवर अपलोड करून पब्लिक अक्सेस ठेवून लिंक कॅापी करून लेखात योग्य जागी टाकावी.फोटोला क्रमांक द्यावे आणि ते लिखाणात कंसात द्यावेत.वाचकांनाही संदर्भ विचारताना बरे पडते.असा सर्व लेख तयार झाला की कॅापी करून पेस्ट करावा व प्रकाशित करावा.काही कारणामुळे डिलीट झाला तरी पुन्हा लिहावा लागत नाही.आपल्याकडचा लगेच पेस्ट करता येतो.