निशब्द

Submitted by रेनी on 16 July, 2016 - 11:57

तिला येत नाही वाचता
मला येत नाही लिहिता

तरी वाटले तिला एक पत्र लिहावे
मनातले गुज शब्दातुन सांगावे

मी काय लिहिणार, कागदालाही उस्तुकता
लेखणीला मात्र कळली माझी निशब्द विवशता

कागद डोळ्यासमोर धरता दिसली पलीकडे चंद्राची शुभ्र कोर
खरे नाते जोडायला लागते का कुठल्या शब्दाची दोर

पत्रात दिलीय मोगऱ्याची कळी पाठवून, तिला आठवून
उत्तरात गुलाब दिलेय तिने पाठवून अन पत्र ठेवलेय पुस्तकात लपवून

Group content visibility: 
Public - accessible to all site users