पाऊस आणि मी!!!

Submitted by भागवत on 16 July, 2016 - 06:02

मेघांनी आक्रमिले नभांगण
विचाराने आक्रसले प्रांगण
कोंडी काही केल्या फुटेना
पाऊस काही केल्या पडेना

क्षितिजावर जमले काळे ढग
जीवनात प्रतिबिंब पडले मग
पाऊस आला खुप जोरात
प्रश्नाचा निचरा झाला क्षणात

आकाशात उमलले सुंदर इंद्रधनुष्य
पेलायचे मला लिखाणाचे शिवधनुष्य
इंद्रधनुष्य म्हणजे आयुष्याचे सप्तरंग
लिखाणात उधळेल विविध शब्दरंग

Group content visibility: 
Public - accessible to all site users