माझे भाग्य....

Submitted by राजेंद्र देवी on 13 July, 2016 - 06:17

माझे भाग्य....

आहे माझे भाग्य
लाभले मज वैराग्य
विठुनामांविना सारे
आहे मज त्याग्य

आहे माझे भाग्य
लाभे दर दिनी वारी
माझे माहेर पंढरी
माझे सासर पंढरी

माथी घेऊन तुलसी वृंदावन
मुखी विठुनामाचा गजर
वाजती तारा हृदयिच्या
देह हा माझा वीणेपरी

आहे माझे भाग्य
नाही कोणता आळ
नाही कोणते किटाळ
विठू विठू बोले माझा टाळ

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users