चांदणभूल

Submitted by फूल on 11 July, 2016 - 02:45

चांदण्याच्या पावलांनी
दूर कुठल्या देशातून
मोरपंखी इवली वाट
सांडून आली चांदणभूल

मोरपीस मखमली
रोमरोमी हुळहुळे
तुझ्या-माझ्या नात्याला या
शाश्वताचे पंख नवे

आल्हाद हा कल्लोळला
दोन बोटे गगनाला
पारिजात सुखाचा हा
ठायी ठायी बहरला

डोहाळयांचे तरंगुले
उगाच हसू ओठावर
दिठी कधी पाणवते
आवडीचा गहिवर

ओटीमधला तान्हा जीव
सुटकेला आसुसला
तुझ्या माझ्या सौख्याचा हा
गोळा उरी विसावला

चांदण्यांची कैक स्वप्ने
भरून उरली इवल्या दिठी
पदराखाली मिटले ओठ
हळूच फिरल्या इवल्या मुठी...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुलाला कहर बहर आलेला दिसतोय Happy
खूप सुरेख कविता... आई होण्यातलं मार्दव, स्वर्गसुख, आनंदकल्लोळ... अगदी छान उतरलय..
किमया आहे.. नक्कीच
Happy