सुलतान

Submitted by समीरपाठक on 10 July, 2016 - 10:58

सुलतान
सध्या आभासी जगाचा जमाना आहे, मग एखादा चित्रपट तिकीट बारीवर प्रचंड चालत असल्याचा आभास निर्माण करता येत असेल काय? हो कदाचित, कारण शंका असल्यास सुलतान हा चित्रपट बघून घ्यावा.चित्रपटाबद्दल आक्षेपार्ह काही नसेलही पण अति-पूर्वप्रसिद्धी?? यावर थोडा तरी चाप यशराज ने बसवावा माझ्यामते, सर्वाधिक विकेंड कलेक्शन - 500 कोटीच्या क्लबमधल्या काही मोजक्या कलाकृतींपैकी एक - सुपरस्टार सलमान च्या कारकिर्दीतील मैलाचा दगड इत्यादी इत्यादी इत्यादी पूर्वप्रसिद्धीने भुलून कदाचित, पण सध्या मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन दोन्हींचे दर आकाशाला भिडलेत. बरे असतीलही पण तितका प्रतिसाद चाहत्यांचा असेल काय?? शंकास्पद बाब आहे कारण मी जो शो बघितला त्या माझ्या दुपारच्या शोला जवळपास 70% खुर्च्या रिकाम्या होत्या.

Sultan's_logo.jpg

सुलतान अली खान (सुपरस्टार सलमान खान) आणि आरफा (अनुष्का शर्मा) या दोन्ही कुस्तीपटूंच्या प्रेमाची घडलेली\बी-घडलेली आणि शेवटी पूर्ण झालेली कहाणी म्हणजे सुलतान.

सुपरस्टार सलमान खान हा कुस्तीपटू- रेसलर अश्या भूमिकेत आहे. वयाच्या पन्नासाव्या वर्षी ज्या शिताफीने त्याने दोन्ही भूमिका त्यातल्या विविधांगी कंगोऱ्यांसकट निभावून नेल्यात त्याला तोड नाही. कितीही चांगला दिग्दर्शक असता आणि समजा तुषार कपूर सुलतान खान असता तर......जस्ट इमॅजिन!!! सलमान ने खरोखर खूप मेहनत घेतल्याचे जाणवते बरेचदा विशेष करून क्लायमॅक्स ला.
अनुष्का शर्मा(आरफा) या महिला कुस्तीपटूच्या भूमिकेत आहे. सलमान खानच्या भूमिकेसमोर तिची भूमिका मुख्य अभिनेत्री असूनही आपोआप एक सहाय्यक अभिनेत्री इतकी मर्यादित होते. रणदीप हुडा काही काळ सहाय्यक भूमिकेतून दर्शन देतो आणि छोटीशी भूमिका असली तरी तिची नोंद घ्यायला भाग पडतो.

अली अब्बास जफर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कहाणी लेखक. आणि आदित्य चोप्रा बरोबर सहपटकथा लेखकही. आणि सांगण्यास समाधान की त्यांनी कुठेही आपल्या कर्तव्यात कसूर केलेली नाही. तसे पाहता सुलतानचा रेसलिंग क्लायमॅक्स हा सलमान ने कितीही मेहनत घेतली असती आणि दिग्दर्शक अननुभवी-कन्फ्युज्ड असता तर त्या मुख्य सीनची वाट लागली असती. पण त्यांनी सगळे व्यवस्थित निभावून नेले.

विशाल-शेखर या जोडगोळीने संगीत सुलतानला आहे. संगीतही अगदी उत्कृष्ट वगैरे नसले तरी अगदीच टाकाऊ कॅटेगोरीतही येत नाही. उलट ज्या शिताफीने सुलतान चा टायटल ट्रॅक आणि सच्ची-मुच्ची या दोन गाण्यांचा पार्श्वसंगीत म्हणून चित्रपटभर वापर आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे. आणि एक महत्वाचे सुरवातीलाच सलमान खानच्या एंट्रीला जे पार्श्वसंगीत आहे, काही सेकंदच, पण त्यासाठी विशेष कौतुक. कारण सलमानच्या एंट्रीलाच जर त्या भूमिकेची छाप पडली नसती तर पुढे जे इम्प्रेशन क्लायमॅक्स मुले क्रिएट होते त्यात फरक पडला असता हे नक्की

सलमान च्या चित्रपटांत तोच असतो डोळ्यांसमोर तीनही तास, दबंग 1-2, रेडी, वॉन्टेड, किक, बजरंगी भाईजान हे काही ठळक उदाहरणे, कहाणी काहीही असो पण पडद्यावर पूर्णवेळ तोच असतो आणि या परंपरेला सुलतान अपेक्षेप्रमाणे पुढे नेतो, अर्थात इथे कहाणीच तशी होती म्हणा पण तरीही ........

सुपरस्टार सलमान खान खरोखरच कदाचित त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी अभिनयाच्या दृष्टीने सुलतान मध्ये करून गेलाय. त्याचा धर्म - पूर्वायुष्यातील त्याच्या चुका - त्याचा प्रेमभंग इत्यादी इत्यादी पूर्वग्रह आधी करून घेतलेला असेल तर हा चित्रपट बघणाऱ्यांसाठी नाही. मान्य की एक व्यक्ती म्हणून त्याच्याबद्दल व्यक्ती-दरव्यक्ती प्रेक्षकांचे मत बदलेल पण तरीही कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता जर हा चित्रपट बघितलात तर आवडण्याचीही दाट शक्यता आहे. बाकी डिटेल्स बाजूला ठेवू पण ज्या तन्मयतेने त्याने वयाच्या पन्नासाव्या वर्षी कुस्तीपटू-रेसलर उभा केलेला आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे आणि म्हणूनच त्याच्या जाणवणाऱ्या प्रचंड मेहनतीसाठी मी माझ्यातर्फे सुलतानाला पाच पैकी चार (4*) स्टार देतो. बाकी निर्णय प्रेक्षकांनी घ्यावा.

-समीर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना,तुम्हि त्याच्या घेतलेल्या प्रचन्ड मेहनतिला दुर्लक्शित करुच शकत नाहि

ज्या काही प्रतिक्रिया इथे दिल्या आहेत त्या वाचून सकाळ पेपर मध्ये बातम्यांच्या खाली ज्या अनाकलनीय प्रतिक्रिया येतात आणि वाचून जो संताप जाणवतो तो जाणवत आहे. बाकी हा सलमानपट छान आहे. अनुष्का आणि सलमान रॉक्स.

ज्या काही प्रतिक्रिया इथे दिल्या आहेत त्या वाचून सकाळ पेपर मध्ये बातम्यांच्या खाली ज्या अनाकलनीय प्रतिक्रिया येतात आणि वाचून जो संताप जाणवतो तो जाणवत आहे.>>>> म्ह़णजे माबोवरच्या प्रतिकिया सुद्दा संताप येण्यासारख्या असतात असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

ज्या काही प्रतिक्रिया इथे दिल्या आहेत त्या वाचून सकाळ पेपर मध्ये बातम्यांच्या खाली ज्या अनाकलनीय प्रतिक्रिया येतात आणि वाचून जो संताप जाणवतो तो जाणवत आहे.>>>> म्ह़णजे माबोवरच्या प्रतिकिया सुद्दा संताप येण्यासारख्या असतात असे म्हणायचे आहे का तुम्हाला?<<<< Biggrin

कुस्तीपटूंमध्ये वजनी गट असतात ना?
सर्वात कमी वजनी गट काय असतो?
अनुष्का शर्मा जर त्या वजनी गटापेक्षा फार हलकी नसेल तर तिच्या कुस्तीपटू असण्यावर हरकत नसावी.
कोणी जाणकार आहे का ईथे?

बिपाशा सुट झाली अस्ती कुस्तीपटू. बघायचा विचार नव्हता पण इथे ईतके पॉझीटिव्ह रेव्ह्युस बघणार.

आवडलाच आहे मला पिक्चर .... पण सलमान चा X फॅक्टर आहे पिक्चर सुपर डुपर हिट होण्यामागे ... दुसरा कोणी ऍक्टर असता तर average सिनेमांच्या यादीत जाऊन बसला असता तो..... हे मा वै म Wink Wink Wink

मराठी चित्रपट असता तर अश्या बोल्ड आणि डॅशिंग भुमिकेसाठी कोण सूट झाले असते याचा अंदाज बांधायला पैसे पडू नयेत Happy

मला वातलं हिरो बद्दल बोलतोय तो..

सई करू शकते पेहलवानाचा रोल. पेहलवानच आहे ती तशी Proud फक्त अधे मधे एक दोन हॉट सिन्स टाकवे लागतील इतकंच Proud