संक्षिप्त 'सुलतान' (Sultaan - Not a Movie Review)

Submitted by रसप on 8 July, 2016 - 05:31

रिव्ह्यू वगैरे लिहायचा मूडही नाहीय आणि वेळही नाहीय. म्हणून जरासं संक्षिप्त.

आवर्जून सांगावं असं 'सुलतान'बद्दल काही असेल तर हे -

१. सलमान इतका थकेल, निस्तेज, निरुत्साही वगैरे कधी दिसला नाही. त्याच्या अभिनयाला मर्यादा आहेत आणि तो त्याचं लोडही घेत नाही. आपल्या मर्यादेत राहूनच एक्स्प्रेस करत असतो. पण 'एनर्जी' आणि त्या एनर्जीमुळे असणारा जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स हा सलमान, शाहरुख, अक्षय कुमार व अजून काही १-२ लोकांचा प्लस पॉईण्ट आहे. का कुणास ठाऊक 'सुलतान' झालेला सलमान दबंग, वॉण्टेड, टायगर वगैरेसमोर अगदीच पडेल वाटला. फुग्यातली हवा कमी व्हायला लागली की तो जसा वाटतो, तसा वाटला सलमान. दया आली त्याची. तो चक्क आजारी वाटला. बहुतेक आता 'वय' आड यायला लागलं आहे. ह्या फुसकेपणामुळे सलमानपट पाहूनही पाहिल्यासारखं वाटलं नाही.

२. Anushka Sharma certainly has better jobs to do. असला तोकडा रोल तिने का केला आहे कुणास ठाऊक ! अर्थात, जितका आहे तितका तिने केला चांगलाच आहे. पण कशाला ? सोनाक्षी-फिनाक्षी, जॅकलीन-फॅकलीन ठोकळे आहेत की असले किरकोळ सहाय्यक रोल्स करायला ! दीपिका, अनुष्का, प्रियांकाने अश्या कामांत आपला वेळ, कसब वाया घालवू नये असं वाटतं. प्रियांकाने मध्यंतरी पाठोपाठ महारद्दड सिनेमे टाकायला सुरु केलं होतं. जंजीर, लव्ह स्टोरी २०५० वगैरे. बरं झालं, वेळीच सावरली. अनुष्कानेही सावरावं. सुलतान-फिलतान करण्यापेक्षा बरी कामं आहेत नक्कीच तिच्याकडे.

३. सलमान-अनुष्का ही जोडी काही केल्या पचत आणि पटतच नाही ! एक तर कॅमेऱ्याने दोघांची उंची जुळवायचा प्रयत्नही केलेला नाही आणि त्यात त्यांच्यात काही केमिस्ट्री, फिजिक्स काहीही वाटत नाही. पेनाचं टोपण पेन्सिलला लावल्यासारखं विजोड आहे हे. कुणाच्या सुपीक डोक्यातून असं अचाट कास्टिंग आलं असेल काय माहित !

४. बहुतेक गाणी बरी जमून आलेली आहेत. विशाल-शेखरना त्यासाठी धन्यवाद द्यावेत म्हणतो ! कारण आजकाल सिनेमातली गाणी सहन होणं म्हणजे हवामानखात्याने सांगितलेल्या अंदाजाने बरोबर ठरण्यासारखं आहे.

५. I dont know if something is wrong with me. पण आजकाल मला दोन - सव्वा दोन तासाच्या वर सिनेमा जाणं हे आवडेनासंच झालं आहे ! तब्बल पावणे तीन तास ? काहीही गरज नव्हती इतकी. अर्धा तास कमी चालला असता आणि त्यामुळे मजाही आली असती. पण असो !

६. अब्बास अली जफरचा 'गुंडे' एक अशक्य आचरट चित्रपट होता. त्या मानाने 'सुलतान' खूपच चांगला म्हणावा लागेल.

७. रणदीप हुडाला जरा अजून काम हवं होतं. गेल्या काही सिनेमांमुळे मला हा अभिनेता खूपच आवडायला लागला आहे. त्याच्या भूमिकेला खूप कमी जीव, लांबी आहे. ती पुरेशी वाटत नाही. I know हे unreasonable आहे. तरी जरा त्याच्या भूमिकेची लांबी वाढवली असती, तर बरं झालं असतं.

८. शेवटचा अर्धा तास 'ब्रदर्स'ची आठवण येते. खुद्द 'ब्रदर्स'सुद्धा रिमेकच होता, हा भाग वेगळा !

९. सलमानच्या कुस्त्या, फाईट्स चांगल्या केल्या आहेत. पण अनुष्काच्या एक नंबर बोगस. दुसरं म्हणजे ती 'लेडी पैलवान' न वाटता 'काडी पैलवान' वाटते.

१०. सर्वच जणांनी हरयाणवी भाषेचा लहेजा चांगला जपला आहे. सलमानला Flat 50% डिस्काउंट असतो ह्या सगळ्या बाबतीत. त्यामुळे 'सर्वच' मध्ये तो अर्धाच पकडावा !

११. कहाणी अगदी थोडक्यात सांगायची तर, तो तिला पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडतो. ती कुस्तीगीर असते म्हणून हाही कुस्तीगीर बनतो. नंतर काही कौटुंबिक ड्रामा होतो आणि रिंगपासून दूर गेलेला तो पुन्हा रिंगमध्ये येतो 'खोयी हुई इज्जत फिरसे पाने के लिये' असा सगळा मसाला आहे.

१२. आता तर 'दंगल' अजूनच बोअर होणार आहे.

१३. रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2016/07/sultaan-not-movie-review.html

Sultan.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या म्हाता र्‍याची डिजिटली करेक्टेड बॉडी आणि परश्याची नैसर्गिक सुंदर फिझीक ह्यात किती फरक आहे. सलमानचा मुलगा शोभेल तो. सलमानने आता बापाचे रोल्स करावेत असे माझे मत आहे. अनुश्का नाही आवडत.

१२. आता तर 'दंगल' अजूनच बोअर होणार आहे.>>>>> सस्मित, दंगल अमिर खानचा येणारा सिनेमा आहे, बहुतेक सुलतान टाईप असावा, म्हणून रसपने अशी कमेंट केली असावी.

रसप/,, तू रिव्ह्यू टाईप असं काही लिहिण्या पूर्वीच मी फर्स्ट डे फर्स्ट शो ,सक्काळी ९ वाजता पाहून टाकला Happy

मला तर खूप आवडला सिनेमा.. मुख्य म्हंजे सलमान ची कमिटमेंट आवडली.. आणी काही शॉट्स मधे तर त्याचा चक्क performance ही आवडला..

कुस्तींची दृष्यं अतिशय प्रभावकारी रीतीने चित्रीत केलेल्या आहेत .सलमान ने या वयात ही केलेली मेहनत स्पष्टपणे दिसून येत आहे. हॅट्स ऑफ टू हिम!!
अनुश्का ने , छोट्याश्या भूमिकेत ही चांगला अभिनय केलाय . सलमान च्या मित्राने ही जबरदस्त काम केलंय.
त्याचं नांव शोधून दमले.. पण कळलं नाही.. बहुत नाइन्साफी है उसके साथ!!!
ऑल दो, सिनेमा ची लांबी जरा लहान करता आली असती..

सस्मित, दंगल अमिर खानचा येणारा सिनेमा आहे, >>> माहित आहे मला.
पण सुलतान बोर झाला म्हणुन दंगल अजुनच बोर होणार आहे चं लॉजिक कळलं नाही.

सुलतान बद्दल सिमिलर भावना,
भयंकर प्रेडिक्टबल चित्रपट,
सलमान च्या चाहत्यांना न आवाडण्याचे काही कारण नाही,
आणि नॉन चाहत्यांना आवडण्याचे पण खास कारण नाही.

>>> रिव्ह्यू बायस वाटतोय..... ज्यांनी पाहीला त्या सगळ्यांना आवडला <<<<
जौद्याहो, आम्हाला रस्त्यावरच्या पिळदार बाहुंच्या काटकिळ्या डोंबार्‍याचा खेळही आवडतो..... Proud

सलमानला सुरुवतिला ३० चा आणि मग ४०चा असा दखवल् आहे ,आणि त्या बरहुकुम तो चाळिशित, व्यायाम सोडलेला, परिस्थितिने निराश,हताश असा दाखवताना तो तसा दिसने/ दाखवने स्वाभाविक आहे.

तेव्हडिच मेहनत तो तिशिचा दाखवताना घेतलि आहे आणि तो दिसतो लिटरली .. मला तर चित्रपट जाम आवड्ला ..

हा अनुश्का विजोड वाटते,,आणि पेहलवान तर कोण्त्याच *अन्गलने वाट्त नाही.

लेडी पहिलवान म्हणून सोनाक्षि सुट झाली असती नक्की,सलमानच्या पिक्चरमधे सलमानला महत्व ९८ % बाकी सगळ्यानाच उरलेल्या २ % मधे समाधान मानाव लागत पण, आर्थिकरित्या हमखास हिट होणार्‍या चित्रपटात फुटकळ का होईना रोल करणे ही गरज असु शकते.

सुलतान बद्दल माझा आक्षेप आहे. आणि तो वेगळाच आहे.

अनुष्का ओरिजिनली रेसलर असते जिचं ऑलिंपिक्स गोल्ड मेडलिस्ट व्हायचं स्वप्न असतं. ते ध्येय मिळवण्याच्या मधे कोणीही किंवा काहीही न येऊ देण्याची ती काळजी घेत असते. आणि मग काहीतरी इमोशनल ड्रामे घडून ती सल्लूशी लग्न करते. यथावकाश प्रेग्नंट होते. इथे मला वाटलं की कदाचित आता ती मूल नको वगैरे धाडसी निर्णय घेईल आणि ध्येयाकडे वाटचाल कायम ठेवेल. पण ती बापाला सांगते की 'सुलतानचा तो खुश चेहरा पाहा. तेच माझं गोल्ड मेडल आहे'
रिअली?
त्या स्वप्नांचं, जिद्दीचं काय झालं?

चित्रपटाचा शेवटही चुकांवर पांघरूणं घातल्यासारखा. सुरूवातीपासून 'बेटी बचाओ' असा संदेश फडकवणार्‍या या पिक्चरचा शेवट मात्र चाकोरीची वाटच चालतो. सामान्य प्रेक्षकाला कदाचित एंड भारी वाटू शकतो. तेच या सिनेमाचं व्यावसायिक गणित आहे. पण मला तरी वाटतं की याहून एक चांगला शेवट असू शकला असता ज्याने एक चांगला संदेश पोहोचला असता.

Rmd, आरफा चा character बद्दल मला पण हाच मुद्दा खटकला होता.
वरती आपले सल्लू मिया तिशी मध्ये पैल्वानकी करायला लागतात,
2 महिन्यात स्टेट लेवल चॅम्पियनशीप जिंकतात पुढच्या 5 वर्षात ऑलिम्पिक पर्यंत मजल जाते. म्हणजे 35 मध्ये ऑलिम्पिक मेडल,

पुढे वयाच्या चाळीशीत 6 आठवडे ट्रैनिंग घेऊन साहेब मर्शिअल आर्टस् कुस्ती फ्युजन खेळायला हजर,
काय च्या काय टाईम लाईन घेतली आहे.

##########

स्पॉइलेर अलर्ट
###########

ऑलिम्पिक मेडल जिंकून हा परत येतो तेव्हा अनुष्का हॉस्पिटलमध्येच असते, ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट ह्या घरी झालेली ट्रॅजेडी मीडिया मध्ये कुठेही येत नाही, त्याला ऐरपोर्टवर आलेले लोक त्याला काही सांगत नाहीत, even to hospital मध्ये येतो तेव्हा पण कॉरिडॉर मध्ये बसलेले नातेवाईक काही बोलत नाहीत, डायरेक्ट अनुष्का शॉक देते, फारच नाटकी पणा,

ती त्याला जा म्हणते, तो निघून जातो, दोघांच्या घरचे समेटाचा काहीच प्रयत्न करत नाहीत,
सगळ्यात शेवटी जेव्हा अनुष्का परत येते तेव्हा ती सांगते मी पण तुझ्या साठीच दर्ग्यात यायचे वगैरे.... म्हणजे हि 2-3 वर्षे कोणी पहिल्यांदी अँप्रॉच व्हायचे या इगो प्रॉब्लेम मध्ये घालवली का?

एकाच आखाड्यात लंगोटधारी मुले आणि मुली शेजारी शेजारी प्रॅक्टिस करत आहेत, सल्लू भाई जीन्स half पॅन्ट घालून कुस्ती शिकत आहेत, वगैरे अनंत ग्लिचस आहेत.

अनुष्का च्या वावरामध्ये कुठेच हर्याणवी रावडीपणा, दिसत नाही, ती कायम दिल्ली मधली पोलिश्ड मुलगी वाटते.(तन्नु वेड्स मनू मधली कुसुम रावडी स्पोर्ट्स पर्सन वाटायची)

जाऊ दे... i think i am taking it too seriously.
Happy

Typical mindless हिंदी पिक्चर म्हणून पहिला तर आवडेल.

रसप, दंगल गंभीर विषय, त्यामुळे आमीर खान तो चांगल्या परिणामकारक पद्धतीने सादर करेल असे वाटते.

बाकी सलमान चे चित्रपट बघणे बंद करुन बराच काळ झाला.

दंगलही कुस्ती वरच आहे... एकाच वर्षी एव्हढे कुस्त्यांवरचे सिनेमे बघण्यापेक्षा मी ऑलिम्पिक च्या अक्चुअल मॅचेस बघीन.... आधीच नको तिथे तोंड उघडल्यामूळे अमीर खान मनातून उतरलाय.....
अक्षय कुमार चा रूस्तम येतोय म्हणे १२ ऑगस्ट ला...

अनुष्का शर्माला स्पोर्टमन आवडतात त्यामुळे तिला एखाद्या स्पोर्टसवूमनचा रोल करायचा असावा Happy

@ दंगल
सलमानचा चित्रपट आणि आमीरचा चित्रपट यांना एका तागडीत मोजायचे कारण समजले नाही. दोघे भिन्न शैलीचे अदाकार आहेत. दंगल शाहरूखचा असता तर समजू शकलो असतो. कारण या दोघांच्या स्टारडममध्ये समानता आहे.

असो,
परवाच मी विचार करत होतो की सोनाक्षीबद्दल हल्ली बरेच दिवसात कुठे वाचनात आले नाही. आपण ती कसर पुर्ण केलीत. आता अजून चारसहा महिने तिचे नाव नाही ऐकले तरी चालेन मला.

प्रियांका चोप्राचे नाव मात्र अध्येमध्ये असेच लिहित राहा. बरे वाटते. वाचताक्षणी डोळ्यासमोर येते..

शाहरूख आणि आमीर या दोन खानांचे चित्रपट पाडायला काही संघटना पुढाकार घेतात त्या सलमानला मात्र यातून सूट देतात. का ते समजत नाही.

क्रमश:

चिमाजी | 8 July, 2016 - 23:55 नवीन
दंगलही कुस्ती वरच आहे... एकाच वर्षी एव्हढे कुस्त्यांवरचे सिनेमे बघण्यापेक्षा मी ऑलिम्पिक च्या अक्चुअल मॅचेस बघीन....

>> हाच मुद्दा होता. धन्यवाद !

आमीर/ शाहरुख/ सलमान/ इतर कुणी पब्लिकली जे काही बोलतात त्याचा राग मी त्यांच्या चित्रपटावर काढावा, हे मला विशेष पटत नाही. कारण एक चित्रपट बनवण्यात शेकडो लोकांची मेहनत असते. त्या बाकीच्या लोकांवर तो अन्याय वाटतो. पण एकंदरच आमीर कंटाळवाणा वाटायला लागला आहे. मी पीकेसुद्दा पाहिला नव्हता. अजूनही - टीव्हीवर आल्यावरही - पाहिलेला नाही. इच्छाच झाली नाही.
विषयाची हाताळणी नक्कीच वेगळी असेल. अब्बास अली झफर एक फुटकळ दिग्दर्शक आहे, जो गुंडे-फिंडे बनवतो. तर नितेश तिवारी नक्कीच एक चांगला दिग्दर्शक आहे. इथेच फरक पडतो. पण मूळ विषय जर कुस्तीच असेल, तर मला त्या खेळात इतका रस नाही की मी पुन्हा एकदा तो पाहावा आणि बायोपिकचाही आता ओव्हरडोस होतो आहे.

थोडक्यात आमीर विशेष आवडत नाही आणि विषयही विशेष आकर्षक नाही, म्हणून बोअर होईल असं वाटतंय. पण दंगल रिलीज व्हायला अजून बराच अवकाश आहे. तोपर्यंत मत सहज बदलू शकेल. Happy

काल व्हॉट्सअ‍ॅपवरच्या इमेज(फोटो)नुसार दिल्लीत सुलतानचं एक-एक तिकीट १६००-१८०० ला विकलं गेलंय म्हणे!

पाहिला . सलमानच्या इतर चित्रपटाप्रमाणेच ठीक ठाक आहे. रमडच्या मुद्द्याला +1 . ऑलिम्पक मेडलच स्वप्न पाहणारी मुलगी लगेच भावनाकुळ होऊन उसकी चेहरे की ख़ुशी ही मेरा मेडल है वगैरे बोलते ते अगदीच खटकतं . सलमान सुजलेल्या चेहर्याने वावरतो . अनुष्का शर्मा पैलवानी करण्याऱ्या भूमिकेत शोभत नाही . गोविंद या व्यक्तिरेखेच काम सपोर्टिव्ह असलं तरी शेवटपर्यत लक्षात राहत . अमित साध नेही छान काम केलेय
गाणी बऱ्यापैकी जमली आहेत . ऊपर आस्मा, नीचे मिट्टी, बीचमे तेरा जुनून असे काहीसे शब्द असलेल्या ओळी छान जमल्यात
. रसपने लिहिलेल्या 3, 9 , 10 क्रमांकाना अनुमोदन .

काल व्हॉट्सअ‍ॅपवरच्या इमेज(फोटो)नुसार दिल्लीत सुलतानचं एक-एक तिकीट १६००-१८०० ला विकलं गेलंय म्हणे!>>>>> कालच एफ एम वर एका माणसाने आपल्या पत्नीसोबत सुलतान पाहण्यासाठी आख्ख थिएटर बुक केले अशी बातमी ऐकली .

सिंम्बा "+1 हे राहिलेच

Pages