चंदन

Submitted by pulasti on 19 February, 2009 - 09:38

मनासारखे मन नाही
अन दुसरे साधन नाही

व्यर्थ झिजवतो देहाला
विचारात चंदन नाही!

हवे तेच उत्तर आले
पण... आले चटकन नाही

कशी रचू सुंदर कविता?
सुंदर हे जीवन नाही

दिवाळखोरीचे युग हे
रोखठोक चिंतन नाही

गुलमोहर: 

मस्त ग़ज़ल!. आवडली.

<<<व्यर्थ झिजवतो देहाला
विचारात चंदन नाही!

हवे तेच उत्तर आले
पण... आले चटकन नाही

कशी रचू सुंदर कविता?
सुंदर हे जीवन नाही >>>>>

आवडले.

शरद

गजल आवडली!

लहान तोंडी मोठा घास घेतोय तरी...
पण मतल्यात 'अन' शब्द जागा उगाच आडवतोय अस वाटतय. त्याएवजी 'पण' असेल तर अर्थ अधिक गहिरा होईल (अपरीहार्यता अधिक ठळकपणे दर्शविता येईल) आणि दोन मात्रांचाही योग्य वापर होईल.

मनासारखे मन नाही
पण दुसरे साधन नाही >> हा अजून प्रभावी अन प्रवाही वाटतोय.

पुलस्ती.. मी मतल्यात गंडलोय.. निश्चित कळत नाहीये काय म्हणायचय ते.. Sad

माणिक, पण ची सूचना आवडली! धन्यवाद.
देवा, मतल्यात असं म्हणायचंय की - मला जसं हवंय तसं मनच माझ्याकडे नाहिये; पण (जे आहे त्यानेच काम चालवायला लागेल, कारण) काही गोष्टीना मनाशिवाय दुसरं साधनच नसतं.

ऑ़के...
श्या एवढ साधं कसं कळलं नाही मला.. Sad
मी मनासारखे मन नाही म्हंटल्यावर दोन मनातलं comparison या अर्थी घेतलं.. Sad

व्यर्थ झिजवतो देहाला
विचारात चंदन नाही!..
सुरेख

पुलस्ती
चंदन, चटकन आवडले..
पण तुमच्या इतर गझलांइतकी मजा नाही आली Sad

    -------
    स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
    स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले

      हवे तेच उत्तर आले
      पण... आले चटकन नाही >> चांगला शेर!!

      पण गझलेवर अजून रोखठोक चिंतन व्हायला हवे होते असे वाटले. (तुमच्या कडून अपेक्षा फार असतात Happy )

      प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद!
      चिन्नु, मिल्या, नचिकेत; प्रयत्न सुरू ठेवीन. असेच स्पष्ट; मोकळे प्रतिसाद देत रहा Happy

      असेच स्पष्ट; मोकळे प्रतिसाद >> मित्रा ग्रेट! आपण काय यमकही जुळवू शकणार नाही! Wink

      Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!! Wink

      विचारांची दिवाळखोरी आवडली.

      पुलस्ति,
      मिल्याशी सहमत!
      हवे तेच उत्तर आले
      पण... आले चटकन नाही

      ---खास!

      जयन्ता५२

      मस्त गझल! दुसरा शेर सर्वात जास्त आवडला.
      गझल कार्यशाळा रंगवणारे तर खासच असतात ना Happy

      *****************
      सुमेधा पुनकर Happy
      *****************