पुन्हा पाऊस

Submitted by मंदार खरे on 6 July, 2016 - 05:43

पुन्हा पाऊस

पाऊस म्हणून तिची आठवण
आठवण म्हणून पुन्हा पाऊस
आधीच काळे ढग
मनात उठलेले काहूर
हिरव्या गालिच्यावर
अस्ताव्यस्त दवबिंदू
धुक्यातून जाणारी वाट
घरात मिट्ट अंधार
खिडकी वाजवणारा वारा
विजांचा कडकडाट
दूरवरुन येणारा रफीचा आवाज
कुंद हवेचा श्वास
मेणबत्तीचा प्रकाश
पुन्हा पाऊस....

©मंदार खरे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users