लोभस अंधार

Submitted by पल्ली on 4 July, 2016 - 05:57

जसा जसा अंधार
घरांच्या मूळा पासून
उंच उंच होत जातो
गडद...अगदी गडद होउ लागतो...
आभाळातल्या नक्षत्र चांदण्या
हलके हलके कौलावरून
अंगणात पसरू लागतात
चंद्र चांदण्यांची दीपमाळ
अंगणी तेवायला लागते,,,
अन ओवलेली स्वप्ने
भास् आभासाच्या शृंखलात
किणकिण वाजू लागतात,,,
अशीच एक, अश्या अनेक
शुभ रात्री चमकत राहतात
उजळत राहतात,,,,
नव्या दिवसाची वाट पहात
रोजच,,,, अगदी रोजच,,,
मग अंधार सुद्धा लोभस वाटू लागतो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users