पारिजात

Submitted by केकावली१९९४ on 27 June, 2016 - 01:24

त्यादिवशी प्रातःवेळी होता सजला पारिजातl
फूल उमलले पाहून गालि लाजला पारिजातl
वाट माझी रेखूनी मी सहजीच होते चाललेl
फुले दोन उधळुन भाली धुन्दला पारिजातl
विस्मयाला झेलताना त्यास तुझे बिलगे हसूl
मन्मनिच्या परिमळात होता गन्धिला पारिजातl
नयनपक्षि तरंगणारे अलगद स्थिरावलेl
भरवशाची फांदी देण्यास होता बांधिला पारिजातl
वेचलेली सांडली ओंजळीतली सारी फुलेl
भरपाईचे कृतक थोडे चिडला पारिजातl
एक फूल वेचताना श्वास काही झेललेl
अबोध हळव्या कंपनानी मोहरला पारिजातl

mahajansiddhi.blogspot.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users