जखम

Submitted by रेनी on 26 June, 2016 - 09:31

भरेल ही पण जखम
थंड होईल रक्त जे आहे थोडे गरम

हळूहळू जखम होईल ओळखीची
व्रणाची रेषा होईल मग सलगीची

थंड हवेची झुळूक मग तिथेच जाणवेल
बहकलेलं मन जखमेवरच स्थिरावेल

मधेच जखम देते भूतकाळाची आरोळी
साथ देते मग वर्तमानातील वेदेनची टोळी

रातराणी आणि जखमा बहरतात होताच रात
मग शरीरच करते शरीराचा घात

आज मात्र शरीराची जखम शांत गंभीर होताना जाणवली
बहुतेक मनाची न भरणारी अदृश्य जखम तिच्या नजरेत आली

Group content visibility: 
Public - accessible to all site users