सह्याद्री देवराई....एक अनुभूती

Submitted by समृदधी on 23 June, 2016 - 06:16

सह्याद्री देवराई....एक अनुभूती

“का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कशा धूंद भावना, अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे”

अविनाश - विश्वजीत यांनी शब्दबद्ध केलेले हे गीत प्रत्येकालाच वेड लावते, खरचं आहे आपल मन कोणत्या क्षणी कसं कुठे हरवेल आपण नाही सांगू शकत, असच माझही मन हरवलं कोणत्याही एका क्षणी नव्हे….तर चक्क एक संपूर्ण दिवस ते ही सह्यद्रीच्या कुशीत वसलेल्या दिवडी गावं, माणं तालुका येथे आणि नकळत बंध जुळले ते निसर्गाशी....झाडांशी...

बर्याच वेळा आपण एखाद्या उपक्रमाबद्द्ल ऐकतो आणि काय टईमपास आहे? ईथे फक्त मज्जा करायची, काम काहिच नाही असे गैरसमज डोक्यात ठेवतो, परंतु तो उपक्रम सुरु करण्यामागचे हेतू, त्यातली तळमळ खरच नाही जाणून घेत…. तोपर्यंत ..जोपर्यंत आपणही याचा एक भाग नाही बनत, माझही असचं झालं चला बघु म्ह्णून आले आणि या उपक्रमाचा एक भाग कधी...कसे बनून गेले कळलचं नाही...अगदी माझ्याही नकळत….

हा उपक्रम म्हणजेच श्री. सयाजी शिंदे आयोजित सह्याद्री देवराई प्रकल्प ५० एकर जमिनीमध्ये वृक्षारोपण.....हिरवळ फुलवण्याचा वसा. वृक्षारोपण.....यासारखे अद्वितीय कार्य! हे कार्य अद्वितीय यासाठी कि सयाजी सरांनी नमुद केल्याप्रमाणे "हे सगळं वेगळं आहे....कोण कुणाच्या गावात ओळख पाळख नसताना… असं आपल्या घरचं कार्य असल्याप्रमाणे येतं का?" या शब्दांमध्ये बरच काही आलं...

इथे आलेला प्रत्येक जण निसर्गाशी एकरुप झालेला होता, कुणाच्या हातात घमेलं, कुणाच्या हातात फावडं, कुणाच्या हातात कुदळ आणि प्रत्येकच्या हातात झाडं…..जी आपल्याला आपल्याही नकळत ऑक्सीजन….आपलं जीवन देत असतात..कोणतीही अपे़क्षा न ठेवता हा माझ्यासाठी अतिशय सुंदर अनुभव ....एक वेगळीच अनुभूती होती कारण आता ही माझीही हक्काची देवराई होती!

या उपक्रमामध्ये मला काय सापडले? माझ्या सोबतच माझ्या मुलीचा आनंद… वय वर्ष ४.५ (साडे चार) या चिमुरडीला तर किती उत्साह कि "मला झाडे लावायची आहेत" त्या चिमुकल्या ओंजळीत माती विसावली तो आनंद आई या नात्याने शब्दबद्ध करणं खरच अशक्य आहे, तीच ते निसर्गामध्ये रमणं, वार्याच्या झुळुकेशी गप्पा मारणं ...तीचे इवले इवले बोल्… मला खुप काही देऊन गेलं, तीच्या आणि माझ्या नात्याची वीण अजूनच घट्ट झाली ती या देवराईमुळेच...

१७ जून नवर्याचा वाढदिवस त्याला विचारल काय हव तूला गीफ्ट तो म्हणाला “तू आलीस झाडं लावायला हेच माझं मोठ गीफ्ट” किती हा मनाचा मोठेपणा ! किती जाणिव की आपणही निसर्गाचे काही देणं लागतो, मग मी ही भरुन पावले म्हणाले या सत्यवानासाठी ही आधुनिक सावित्री या वर्षीची वटपोर्णिमा एक झाड लाउन साजरं करेल. ते झाड बहरताना आपल पण नातं प्रगल्भ होत जाईल आणि याचसोबत पुढिल ओळिंची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही

“नि:शब्द भावनाही अर्थात जन्म घेती… जेव्हा जुळून येती नाजुक रेशीमगाठी”

मी कोणी लेखिका नाही परंतु या लेखानिमीत्त निसर्गाचा राजा हे नाव खर्या अर्थाने सार्थ करणार्या रुस्तम रहिवाशी गणेशोत्सव मंडळाचे आभार मानावे तितके कमीच आहे. देवराई या उपक्रमाला हातभार लावल्यामुळे त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. या कर्याला आणि कर्यकर्त्यांना माझे शतशः प्रणाम....

आपल्या आयुष्यात अनेक सुख दु:खांचे क्षण येतात, यातील काही सुंदर क्षण संपूर्ण आयुष्यभरासाठी जगण्याचं बळ देतात आपणही निसर्गासाठी खुप जास्त काही करु नाही शकलो तरी खरीचा जो वाटा उचलतो हे ही नसे थोडके. हि तर इथुन सुरुवात आहे....

सयाजी सर म्हणाल्याप्रमाणे "पुन्हा भेटत राहु सुख नाही दु:ख नाही पण झाडं वाटत राहु हिरव्या मशाली होऊन जागोजागी पेटत राहु एकटं वाटेल माझ कोण आहे या जगात असं वाटेल तेव्हा ह्रदयातून एक आवाज येईल कि या देवराईत माझही एक झाडं आहे...

समृदधी मिराशी

Photo 1.jpgPhoto 3.jpgphoto_2.jpgPhoto_6.jpgPhoto_7.jpgPhoto_8.jpgPhoto_9.jpgPhoto_10.jpghttps://www.youtube.com/watch?v=dkhw37rihjY

http://zeenews.india.com/marathi/news/video/satara-plantation-of-plants/...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१७ जून नवर्याचा वाढदिवस त्याला विचारल काय हव तूला गीफ्ट तो म्हणाला “तू आलीस झाडं लावायला हेच माझं मोठ गीफ्ट” किती हा मनाचा मोठेपणा ! >>>>>> वा, अगदी छान... स्तुत्य ....

फार सुंदर लेख....

सयाजी सर म्हणाल्याप्रमाणे "पुन्हा भेटत राहु सुख नाही दु:ख नाही पण झाडं वाटत राहु हिरव्या मशाली होऊन जागोजागी पेटत राहु एकटं वाटेल माझ कोण आहे या जगात असं वाटेल तेव्हा ह्रदयातून एक आवाज येईल कि या देवराईत माझही एक झाडं आहे...>>>> क्या बात है...

धन्यवाद Hemantj82 , हिमु , शशांकजी.....हा माझा पहिला लेख आहे त्याची दखल घेतल्याबद्द्ल मनापासुन आभार...

Hemantj82 फोटो thumbnail म्ध्ये upload केले होते, पुन्हा बघते काय चुकतय.

समृद्धी, अतिशय इन्स्पायरिंग लेख.. वाचून संपल्यावरही खूप छान हिरवं हिरवं गार गार वाटत राहिलं !!!

तुझ्या सुंदर नावाप्रमाणेच सह्याद्री देवराई अशीच समृद्ध होत राहो!!! Happy

समृद्धी, अतिशय छान उपक्रम.
सयाजी शिंदे असे काही उपक्रम करतात हे माहित नव्हते.
हा एकच उपक्रम होता की अजुनही काही आहेत ?
तुम्ही जर वेळोवेळी मायबोलीवर माहिती दिलीत तर ज्यांना शक्य आहे ते पण भाग घेतील.
किंवा त्यांची काही वेबसाईट आहे का ?

वा समृद्धी. खुप छान वाटल वाचून.

सयाजी सरांच खालच वाक्य तर अतिशय सुंदर, मनाला भिडणार.

असेच उपक्रमात सहभागी होऊन निसर्गाशी एकरूप होत रहा. आणि इथे अवश्य लिहत जा तुमचे उपक्रम. तुमच्यापासून अनेक जण प्रेरणा घेतील.

धन्यवाद महेश आणि जागू

महेश त्यांची काही वेबसाईट आहे का ते माहिती नाही, आम्हाला या उपक्रमाची माहिती चला हवा येऊद्या या कार्यक्रमा द्वारे मिळाली, डॉ. नीलेश साबळे यानी सायाजी शिंदे आले असताना याचे details
आणि नंबर दिले होते ते आम्ही नोट केले व तेथे संपर्क केला.

पुढच्या वेळी असा काही कार्यक्रम असेल तर मायबोली वर अवश्य कळ्वेन.

हा उपक्रम म्हणजेच श्री. सयाजी शिंदे आयोजित सह्याद्री देवराई प्रकल्प ५० एकर जमिनीमध्ये वृक्षारोपण.....हिरवळ फुलवण्याचा वसा.>>> हे नक्की कुठे आहे व ही जी झाडे लावली आहेत त्यांची पुढे काळजी/देखभाल कशी घेणार वगैरे कळले तर बरे होईल... धन्यवाद.... Happy

समृद्धी
खूप छान लेख. आणि उपक्रमही. छोटीलाही इतक्या लवकर या अश्या उपक्रमात सहभागी केलंस....खूप छान!

शशांकजी हा उपक्रम चार गाव शिवार या योजनेअंतर्गत आहे, म्हणजेच सयाजी शिंदे यांनी चार गावे जलसंधारणासाठी दत्तक घेतली आहेत.पांढरवाडी,गोडसेवाडी, कोलेवाडी आणि दिवडी. यापैकी आमचा गृप दिवडी या गावी गेला होता.
ही जी झाडे लावली आहेत त्यांची पुढे काळजी/देखभाल कशी घेनार>>>>तेथे सांगितल्या प्रमाणे गावातील प्रत्येक नागरिक 5 रोपांची जबाबदारी घेणार व त्यांचा भर ठिबक सिंचनावर असेल.

देवकी ,मानुषी धन्यवाद.

समृद्धी खुप छान उपक्रम .
अशा खुप सार्‍या उपक्रमांची गरज आहे आपल्याला , तुमच्या पासुन प्रेरणा घेऊन असे अनेक प्रकल्प होवोत.

सुंदर आणि स्तुत्य उपक्रम! चला हवा येउ द्या या कार्यक्रमात ऐकलं होतं या उपक्रमाबद्दल.... सयाजी सरांचं या कार्यक्रमातलं पत्रही फार सुंदर होतं... हा आपल्या सगळ्यांसाठीच, आपल्या सगळ्यांच्या वतीने राबवला गेलेला उपक्रम आहे... तुम्ही लावलेली झाडं भेदभाव करणार नाहीत... आम्हालाही पाउस पाणी देतीलच ती.... त्यासाठी खूप खूप आभार!