ऐशी वर्षांच्या आज्जीचे मनोगत

Submitted by तिलोत्तमा on 21 June, 2016 - 07:59

ऐशी वर्षांच्या आज्जीचे मनोगत
माझे आपले साधे एकाच म्हणण आहे. म्हातारपणी मुलाने व सुनेने आम्हा म्हातार्यांची नुसती सेवा करावी . मुलाने माझे औषधपाणी करावे व सुनेने जेवणाची टीप ठेवावी . हे खावू नका ते खावू नका हे नियम स्वत पाळावे आम्हाला लावायचे नाहीत. आता राहिलेत किती दिवस आमचे ? तरी बर मला ना diabitis ना blood pressure. असलंच जरी तर ते वयाप्रमाणे असणारच .
पण मी सांगते म्हातारपणाच्या तर्हा मेनोपोज पेक्षा विलक्षण असतात बर. आमचा मूड जो संशयी झाला आहे तो कमीच होत नाही अजिबात . सगळ्यांवर नजर ठेवावीच लागते. कोण फोन वर काय बोलतंय, आपल्या बद्धल तर नाही ना बोलत ? कोण कुठे जाणार आहे हे कान देवून ऐकावे लागते. तसे माझे कान मात्र इतके तीक्ष्ण आहेत कि बाजूच्या खोलीत सुई जरी पडली ना तरी मला नीट ऐकू येते . सर्वांना वाटते, म्हातारी आहे. नीट ऐकू येत नसेल . पण मी कोणाला पत्ता लागूच देत नाही. ते माझ गुपित आहे. जरी कोणी विचारल कि तुम्हाला कस माहित तर लगेच गोर मोर न होता मी लगेच विषय बदलते . वेड्यांना कळतच नाही माझी लाब्बडी . सगळे नुसते भोळेच आहेत नुसते. शिवाय manners एव्हडे भरलेत ना त्यांचात कि उलटून कोणी मला काही बोलतच नाही मुळी. इथेच तर माझे फावते .
एक मात्र नक्की . मी घरातल्या कामवालीशी कधीच पंगा घेत नाही. हो नाही तर माझ्या कपड्यांना नीट साबण लावून धुवून वाळवून तीच तर ठेवते . जेवायला काय काय बनवलंय , कोण कुठे गेलंय , सून दुसर्या खोलीत नेमके काय करतेय ह्या गोष्टीची तीच तर मला हळूच खबरबात देते . नाहीतर मला बिच्चारीला ह्या गुडघ्या मुळे सगळी कडे नजर ठेवणे किती कठीण जाते ते तुम्हाला नाही कळणार . माझ्या वयाचे झालात ना तेव्हा समजेल . ह्या कामवाल्यांना पण अशी हेर गिरी करायला भारी आवडत ह . त्यात त्यांचा हि हेतू असतोच कि. सासू सुनेत भांडणं लावून द्यायची. मग हिची कागाळी तिला करायची आणि तिची हिला . त्यांचा पण time पास होतो . शिवाय एक विकृत समाधानही मिळतच कि त्यांना . मला सर्व माहित आहे. पण माझे काम तर होते.
मला भूक मात्र खूप लागते हो. कारण आम्ही गावी शेतात लहानाचे मोठे झालोय ना . भरपूर खायचे आणि काम करायचे . लिहाय वाचायला यायला कशाला पाहिजे . मुल शिकली बास झाली . तर आता ऐशीव्या वर्षी मुल ,सुना ,नात , नात जावई आल्यावर माझ्या म्हातारी कडे कोण बघणार ? तरी शिस्ती प्रमाणे सून पहिल्या चहा बरोबरच चार बिस्किटे देते . मग नऊ वाजता चहा चपाती किव्वा पोहे खायचे. तेही बिन तिखट . आजकाल पोटाला तिखट सोस्वतच नाही . दुपारी भाजी भाकरी व दुध घेते . नंतर चहा बरोबर चार बिस्कीट खाते कि आठ वाजता भात भाकरी भाजी वरण असतच. शिवाय लेकाला रात्री स्वीट डिश लागतेच . मग त्याच्या सोबत मीही घेते आपली खावून . देतात तेव्हा नाही म्हणू नये , हे मला नीट माहितेय . नाहीतर उद्या म्हातारीला आवडत नाही म्हणतील आणि एकटेच खातील कि. खरतर त्या साठीच तर मला सर्वांवर नजर ठेवावी लागते.
कधी हॉटेलचे जेवण आणतात किवा मला म्हातारीला जेवायला घेवून जातात तेव्हा मात्र माझी चंगळ असते नुसती. असे तेलाचे चमचमीत जेवण ह्यांना करायलाच येत नाही. पण दुसर्या दिवशी माझे पोट बिघडलेच म्हणून समजा . तरी सामोसा , बटाटा वडा खाताना मी आतली भाजी काढूनच खाते. मटन व चिक्कण चे शेलकेच पीस मी मागून खाते. तसे पुढचे दात शाबूत आहेत अजून . मासे खाताना मी अजिबात नाव ठेवत नाही. कारण तळलेले मासे मला खूपच आवडतात . वाढल्या बरोबर मी ते भाकरीत कुस्करून ठेवते. बघणार्याला वाटते म्हातारीला नीट वाढलेच नाही म्हणून पुन्हा वाढतात . अशी मस्ती मला करावीच लागते , पटापट मोठे मोठे गोळे करून मी तोंडात घालते कि कोणाच्या लक्षातच येत नाही , आईस्क्रीम खातानाही तसच . नाही म्हणायचे नाही , भले पातळ झाल्यावर खाईन. आता वयाप्रमाणे घसा थोडा त्रास देतो. काय अडकलंय घशात काय माहित . एव्हढं औषध घेते तरी नीट होत नाही .
त्यात आता लघवीवर नियंत्रण राहिले नाही. म्हणूनच लहान मुलां सारखे diaper च्या चड्ड्या घालते . पण हवेत एव्हडी उष्णता वाढलीय कि विचारू नका . म्हणूनच थोडी चलाखी करावी लागते. काय करणार . हळूच तांब्यात नाहीतर बाहेर पाय पुसण्यावर मी लघवी करून टाकते . कोण काही बोलत नाही मला , कारण हि वेळ तुमच्यावर पण येणार कधी तरी हे त्यांना समजते व गप बसतात . सांगणार कोणाला. बोलाल तर लोक त्यांनाच नाव ठेवतील . पण त्या साठीच मी पण साडीवरून म्याकसिवर आलेच ना . काय करणार देवाने पण मला असे अपंग केले ना.
मी आपली नाश्ता झाल्यावर बसते माळ घेवून थोडा वेळ देवाचे नाव घेत. पण जुन्या आठवणी नेमक्या त्याच वेळेस डोक वर काढतात . मग मी पण भजन पुट पुटल्या सारखे बसते सर्वांना शिव्या देत. आता तुम्हीच सांगा वीस वर्षांची असेन मी लग्न होऊन आले तेव्हा. घरातील दीर व नंदा, त्यांची बारकी मुल सर्वांच करतच मला मुल झाली. त्यात सासूचा सासुरवास . एव्हडं सर्वांचं केल तरी माझ्या नवर्याचीच सर्व आठवण काढतात. मी जिवंत आहे कि मेली कोणी विचारात सुद्धा नाही. आता त्या वेळेस मी थोडे कडक वागले असेन सर्वांशी . पण तुम्हीच सांगा आज काल एक पाहुणा आला तर सर्वांच्या अंगात येते. आणि मी तर एकत्र कुटुंबात वीस वर्षे राहिले. घरातल्या कामापासून सुटका करायला व हातात पैसे असण्यासाठी दुस्यांच्या शेतात पण काम केली . त्याचमुळे तर आता गुढगे दुखीने त्रस्त आहे.
आज माझी मुलगी पण तिच्या घरी घेवून जात नाही. पण मुळात मी का जाव तिच्या घरी? मग मुलगा कशाला आहे मला? माझा सांभाळ करण हे त्याच कर्तव्यच आहे मुळी. ती बिचारी नीट मन लावून शिकली नाही माझ्या मुलांसारखी . का ते मला अजून माहित नाही. त्यामुळे दिली करून गरीबाच्या हाती . बाळंत पणात पण तिची operation झाली. शिवाय हल्लीच गर्भाच्या पिशवीच operation झाल . मग मुलीने मला नाही बघितलं नाही माझी सेवा केली तर काय झाल? उठसुठ लोक मला असला प्रश्न का विचारतात काय माहित?
आता तर मला घरातील काम करायची सवयच नाही. गेली चाळीस वर्षे मी इकडची काडी तिकडे करत नाही. शिवाय आपण काही काम करू शकतो असे सुनेला जर दिसले ना तर परत पडेल ना काम अंगावर . म्हणून मी आपली ह्यांच्या कामा पासून दूरच राहते बाबा . पण मुलगाच कधी कधी बोलतो मजेत कि आई भाकरी फिरवली नाही तर करपते म्हणून थोडी हालचाल कर. पण सुनेला काबूत ठेवायला व माझी सेवा करून घ्यायला गुढगे दुखीच तर उपयोगी पडते ना .
मला संध्याकाळी सून व्हील चेर वर बसवून फिरायला घेवून जाते. पण ह्या मुंबईच्या कसल्या म्हातार्या म्हणायच्या ? कोणी सुनेची कागाळी करेल तर शप्पथ . नाहीतर आमच्या गाव कडच्या बायका . मी कपडे धुवून आल्या बरोबर सासू अनुभवाने विचारायचीच माझ्या तोंडाकडे बघून कि आज काय शिकून आलात बायकांकडून ? कस माझ्या सासूला समजायचं कि घरातलं एव्हड्या लोकांच काम न करण्यासाठी मी बाहेर गप्पा मारत बसते म्हणून?
पण आजकालच्या ह्या सुना कशा इकडे तिकडे करता करता काम उरकतात ? आणि न उरकायला काय? ना निवडणं ना टिपणं . ना भांडी घासा ना कपडे धुवा . दोन मिनिटात ह्यांचा स्वयंपाक कसा होतो कळत नाही. जेवण मोजून बनवतात . ह्यांच्या diet मुळे मात्र मला ताव मारून जेवताच येत नाही. त्यामुळे घरी पाहुणे आले कि कसे बरे वाटते. गोडधोड खायला मिळते . सर्व बोलण्यात मग्न होताच मी मनसोक्त खावून घेते. शिवाय माझ्या सारख्या म्हातार्या बाईला भेटायला आल्यामुळे थोडा खाऊ घेवून येतातच कि. मग काय आठवडा भर मजा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hya mnogatatly ajji jevha gavchya vastavyachi ani mumbaitlya rahanimanachi tulana krtat tevha te tyanchya vichar sarni nusar ghyave.
Kadhi kadhi asahi vichar karnarya ajji astat. Pn dakhvat matra nahi evhdech.

You know what ? I love mayboli. Itkya mishra pratikriya miltat te baghun bare vatte. Thanks to all.