मी, माझा नवा मेकॅनीक व माझी लाडकी इंडिका

Submitted by तिलोत्तमा on 21 June, 2016 - 07:55

त्या दिवशी मी, माझा नवा मेकॅनीक व माझी लाडकी इंडिका तिघेहि काळजीयुक्त नजरेने एकमेकांकडे बघत होतो. काय करावे कसे करावे काहिहि सुचत नव्हते.
त्याला कारणहि तसेच होते. गेल्या दोन महिन्यांपासुन माझ्या लाडक्या इंडिकाच्या वायर उंदिर कूरतडत होते. उंदरांना मारण्यासाठी विवीध उपायहि करून झाले होते. पण काहि उपयोग होत नव्हता. तेव्हा हा नविन मेकँनीक म्हणाला ,“ मॅडम , आपण हि मागची सीट जरा खोलून बघूयात का?“
मी आतापर्यंत खूप प्रयत्न करून झाले होते. मनात म्हंटले हा आता उगाच मोठ काम काढून जास्त पैसे उकळण्यासाठी मला असे सांगत असावा. पण तो म्हणू लागला की ,“मॅडम मला एक शंका आहे म्हणून मी म्हणतोय. “
शेवटी हो नाहि करता करता मी वैतागून त्याला मागची मोठी सीट खोलायची परवानगी दिली.
खूप धडपड करून जेव्हा त्याने सीट उचलली, तेव्हा काय आश्चर्य? पूर्ण सीटखाली खोबर्याचे तूकडेच तूकडे विखूरलेले. त्याच काय झाल होत की मी दोन महिन्यांन पूर्वी माझ्या बागेतील नारळ सूकवून त्या चे तुकडे करून एका मोठ्या पीशवीत भरून ठेवले होते. त्या खोबर्याचे तेल काढायला थोडा उशीरच झाला होता. ती पीशवी काहि दिवस गाडितच होती.
पण त्या सुक्या खोबर्याच्या वासाने दर वेळेस उंदिर गाडित प्रवेश करत व त्या खोबर्या बरोबर गाडितील वायरहि कुरतडून ठेवत.
मला खूप वाईट वाटले. माझ्या खोबरेल तेलाच्या हव्यासापाई माझ्या इंडिकाला खूप त्रास झाला, पण त्याहि परिस्तिथीत तिने मात्र कधीहि भर रस्त्यात बंद पडून माझी फजिती मात्र केली नाहि.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाडीच्या बॉन्नेट मधे तंबाकू च्या पिशव्या ठेवायच्या, ऊंदीर च काय कोण्तचं किडे माकोडे गाडी जवळ पण फिर्कत नाही.

माझ्या इंडीकालाही हा उंदरांचा प्रॉब्लेम आहे. तो तंबाखू उपाय केला एकदा. पण गाडी तापली की तो उग्र वास नको होतो आणी एसीमध्ये पण घुसमटल्यासारखे होते.
विकुनच टाकायची आहे गाडीला आता.

खूप मज्जा येते आहे तुमचे लिखाण वाचून. छोटे छोटे क्षण तुम्ही खूप छान व्यक्त करता आणि विशेष म्हणजे लवकर वाचून होतात. कारण, खूप मोठे लेखन वाचायला वेळ नाही मिळत. लिहित राहा.

ब्रह्मे:- माझ्या लुनाच्या वायरसुद्धा अश्शाच कुरतडल्या जायच्या. मग मी शोध घेतला . पार्किंग मधे गाडी लावून लपून पहात राहिलो. जवळपास २ तासांनी पावसकर मॅडम आल्या आणि त्यांनीच हे कुकर्म केलं.

पावसकर मॅडमः ओ ब्रह्मे.. काहीही काय बोलतांय... !

माने: रोज दोन कप चहा लागतो !

यार्देना सासोनकर, इस्राइलः इकडे इस्राइल मधे तंत्रज्ञान इतकं पुढारलं आहे की उंदरांचा अजिबात प्रॉब्लेम नाही. उंदीर प्रूफ वायरी असतात इकडे गाड्यांना.. धन्यवाद यार्देना, इस्राईल.

Light 1

Tamakhu theun kahi upyog zala nahi.
Naralache tel khup thikani kadhun milate.
Thanks for appreciating my story.

>>डिट्टो मुक्तपीठ!!! Lol
मित - Rofl

तिलोत्तमा बाई लेख देवनागरीत आणि प्रतिसाद इंग्रजी (रोमन लिपित) का लिहितात ?