कट्टा ग्यांग

Submitted by तिलोत्तमा on 21 June, 2016 - 07:48

कट्टा ग्यांग
कोणाला खर वाटणार नाही पण अमच्यतील कोणाच्यात कोणता सुप्त गुण आहे हे प्रत्येकीला आम्ही एकत्र आल्यावर कळले . दोन वर्षान पूर्वी श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आम्ही १२ जणींनी लोणावळ्याला जायचे ठरवले . पाऊस अनपेक्षितपणे धो धो पडत होता. आता जायचे तर ठरवले मग काय . निघालो आम्ही.
आमची ओळख मंडळातली. आम्ही सर्व जनी कोलाबा महिला विकास मंडळाच्या २५-३० वर्षान पासूनच्या मेम्बर आहोत . आठवड्यातून २-३ वेळा भेटण्याची सवय झाल्यामुळे एकमेकींच्या बऱ्या पैकी मैत्रिणी झालो होतो. शिवाय whatsapp वर स्वताचा वेगळा ग्रुप तयार केल्यामुळे आता रोज उठता बसता च्या मैत्रिणी झालो आहोत.
आमच्यातील एकजण जी नियोजनात हुशार आहे त्या नीलमने बस बुक केली . बस छान ac असल्यामुळे प्रवास मस्त होणार ह्याची खात्री पटली . गाडीत राधाने जीला सौ रत्नागिरीचा किताब मिळाला आहे तिने गाणी गावून व आम्हाला नाचवून धमाल उडवून दिली . सई ने छोटे छोटे चुटकुले तयार करून स्वतःची एक नवीन जी तिलाही माहित नव्हती अशी ओळख करून दिली. खर सांगू तिच्या ह्या तडक्यामुळे आमच्या सहलीत धमाल उडाली . दीपा गोड आवाजात गावून आम्हाला भेंड्या लावायला भाग पाडत होतीच .
कधी लोणावळा आले ते कळलेच नाही. मग जयश्री जी जैन आहे तिच्या सोयीच्या हॉटेल मद्धे नाश्ता घेतला .नंतर छायाच्या इच्छेखातर व श्रावणी सोमवार असल्यामुळे टेकडी वरच्या शंकर मंदिराला चढत गेलो. मग आमच्यातील वयाने सर्वात मोठी म्हणजे साठी पार केलेली हेमा जी आमच्या सर्वात दिसायला देखणी व मनाने जास्त तरुण आहे तिच्या बंगल्यावर गेलो . तेथे उज्वलाची इच्छा नसताना तीन पट्टी हा गेम बिन पैशाचा खेळलो . मी अर्थातच उठता बसता माझ्यातील गोष्टी सांगण्याची हौस पूर्ण करून घेतली .
आमच्या ग्रुपची लाडकी सीमा जी नृत्यांगना आहे तिने गाणी लावून आमचा दुपारचा शीण पळवून लावला . प्रतिभाने तर एव्हढ्या जोरात पडणाऱ्या पावसात सर्वांना मुद्दाम हाफ प्यांट घालायला लावून बरवी द्यामला जाण्याचा प्लान केला . लगेचच सगळ्या जनी वय ५०-६० सांगितलेल्या वेशात तयार होऊन निघालो कि पावसातली मजा लुटायला . धुक्या मुले समोरचे काहीही दिसत नव्हते. तेव्हा थोडी काळजी वाटली इतकच.
पण पावसात वाजणारी ती थंडी आणि गरम गरम चहा पिउन घरी जाताना पुन्हा पुढल्या वर्षी श्रावणातल्या पहिल्या सोमवारी परत इथे यायचंच हे ठरवूनच आम्ही घरी गेलो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लगेचच सगळ्या जनी वय ५०-६० सांगितलेल्या वेशात तयार होऊन निघालो कि पावसातली मजा लुटायला . >>> व्वा ! ये हुई ना बात ! तुमचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.

खुप छान Happy