षटकार

Submitted by तिलोत्तमा on 21 June, 2016 - 07:45

Shatkar
षटकार ,हो . कॉलेज मध्ये आमचा ग्रुप षटकार ह्या नावाने ओळखला जायचा. कारण आम्ही होतोच मुळी सहा जणी . सहापैकी एक गुजराथी . त्यामुळे थोड हिंदी बाकी मराठी बोलत आम्ही पूर्ण दिवस कॉलेजमध्येच असायचो. तस पण सायन्स स्टूडनसंना पूर्ण दिवस कॉलेज असतच म्हणा. पण ह्या ३ वर्षांच्या bsc च्या कॉलेज दरम्यान दुसर्या वर्षी आम्ही खूप मजा केली. काय करायचं बाकी ठेवले नाही. अहो तसलं काही नाही. वाह्यातपणा करणाऱ्या मुली आम्ही नव्हतोच ना. एकदम ideal . अहो final ला दहा मार्क extra मिळवण्यासाठी NSS च्या क्याम्पला जावून खेड्यातल्या मुलांना शिकवणे, कॉलेज ग्यादरिग मध्ये गाण्याच्या स्पर्धेत भाग घेणे, क्यारम turnament मध्ये भाग घेणे, रनिंग रेस मध्ये भाग घेणे, अगदी ग्यादरिंग च्या दिवशी monginis च्या चटर पटर गोष्टींचा स्टोल लावून पूर्ण कॉलेज मध्ये जाम फेमस झालो होतो. ह्या सर्व गोष्टी मुळे आमचा षटकार चर्चेचा विषय झाला होता. शिवाय साडी डे, पिकनिक,excursion असो प्रोफेसर प्रथम आमच्याशी चर्चा करायचे मगच प्रोग्राम ठरवत. असा दबदबाच मुळी आम्ही निर्माण केला होता. खरतर हा दबदबा आम्हाला घाबरून नव्हे तर आम्ही सर्वांच्या लाडक्या झालो होतो ना. शिवाय मुलांशी डेटिंग करणे, बॉयफ्रेंड असणे हा concept तेव्हा नव्हताच. वर्गातल्या मुलांशी अगदी निखळ मैत्री होती आमची. तशी थट्टा मस्करी चालायची. अजित, महेश, कैलाश, शशांक वगैरे मुले नेहमी आमच्या अवती भोवती असत. पण एखादीला अडवून काही बोलायची मात्र कुणी हिम्मत केली नाही. कारण जरी दिसायला आम्ही शामळू असलो तरी एकत्र आल्यावर जाम टेरर वाटत असू. आता जशी monginis चा स्टोल लावला तेव्हा उषा ह्या गुजराथी मैत्रिणीने सर्व जवाबदारी घेतली तशी गाण्याच्या स्पर्धेत वंदना वंदना करताना खूप मजा आली. क्यारम च्या स्पर्धेत तिलोत्तामाच्या नावाचा जप लावून विरीधी गटाला आधीच चारी मुंड्या चित करत असू. बाकी जणी आभ्यासात आमचा झेंडा फडकवत असत. एकदा आमच्या डोक्यात पैसे कमवायचे खूळ आले आणि काय, मे महिन्याच्या सुट्टीत मेडीकलच्या मुलांची वार्षिक परीक्षा आमच्या कॉलेज मध्ये होती. गेलो कि तेथे सुपरविजन करायला. मस्त वाटले. चार पैसे कमवू शकतो एवढे तर कळले. असे सारखे काहीतरी नाविन्यपूर्ण करू वाटायचे आम्हाला. हो आणि ह्या सर्व गोष्टींची प्रत्येकीच्या घरी माहिती असायची. कुठेही लपवालपवी नसायची. तसेच प्रत्येक मैत्रिणीची नावापासून घरापर्यंत माहिती असायची. कारण प्रत्येक सणाला गणपतीला वाढदिवसाला एकमेकींच्या घरी जायची पद्धतच होतीना तेव्हा. त्यावेळी जसा आई आणि मुली मधला संभंध असायचा तसाच तो वडलान बरोबर हि सारखाच असायचा. कारण उशीर झाल्यावर वडीलच तर घ्यायला बस स्टोप वर यायचे. त्या वेळी अश्या पद्धतीने आमची मैत्री जपली गेली. पण ती इतकी मजबूत टिकली कि आज तीस वर्षांनी सुद्धा आम्ही एक सहा महिन्यांनी सुद्धा एकत्र भेटतोच. शिवाय WHATSAPP मुळे तर रोज एक दुसर्याला टपल्या मारत बसतो. आता सर्व जणी पन्नाशी ओलांडल्या मुळे तब्येतीची चवकशी करतोच पण आज कॉलेज मध्ये प्रोफेसर कुणी शाळेत शिक्षिका असल्यामुळे एकमेकींच्या मुलांना एकदम सही मार्गदर्शन हि करतोच. त्या मुळे गेले ते दिवस असे म्हणून रडत बसावेसे वाटतच नाही. अर्थात जरी आमचे नवरे वेळे अभावी खूप चांगले मित्र बनू शकले नाहीत पण त्यामुळे आमच्या मैत्री मध्ये काही फरक पडला नाही. आम्ही वेळ काढून एखादया मॉल मध्ये नाहीतर कुणा एकाच्या घरी भेटतोच. जाम मजा येते असे भेटल्यावर. घरी जाताना गाल हसून हसून दुखू लागतात. हा आनंद सांगा बर कुठे मिळेल ते?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users