वेदांत

Submitted by तिलोत्तमा on 21 June, 2016 - 07:38

वेदांत
आता कोण मला आत्या म्हणणार ग ? हा प्रश्न जेव्हा माझ्या मैत्रिणीने मला विचारला तेव्हा मलाही भरून आले . प्रत्येकाच्या जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा आपण कोलमडून पडतो . पण माझ्या मते हीच खरी कसोटीची वेळ असते .
आज सइ चा लहानसा नुकताच बारावी झालेला भाचा वेदांत गेल्यामुळे तिची हि अवस्था झाली होती . पण वेदांत च्या आईचे काय किवा त्या आजीचे काय हाल झाले असतील ज्यांनी उठता बसता त्याला लाडा कोडाने वाढवले होते . त्याच्या वडिलांचे काय झाले असेल जेव्हा त्यांच्या सहलीला गेलेल्या एकुलत्या एक मुला बद्धल असा निरोप येतो कि तुमच्या मुलाचा accident झाला आहे व तुम्ही ताबडतोब घटनास्थळी या. तेथे जावून पाहतात तो त्यांचा चिमुकला जीव निपचित पडलेला . किती कठीण प्रसंगाला ते सामोरे गेले असतील. हि वेळ कुणावर येवू नये असे आपल्याला नेहमीच वाटते .
पण असे प्रसंग खूप जणांच्या आयुष्यात आलेले असतात . अश्या वेळेस नजीकच्या लोकांची मात्र त्रेधा तिरपित उडते . कारण तेच दुक्ख त्यांना हि तितकेच झालेले असते. पण ते दाखवू शकत नाही . आपल्या हृदयावर दगड ठेवून दुखः दाबावे लागते कारण आपल्या शोकामुळे त्या आई वडिलांच्या दुखच्या खपल्या पुन्हा खेचून निघू शकतात असे सर्वांना वाटते.
मी जेव्हा सइ च्या आईला काही दिवसांनी भेटायला गेले होते तेव्हा असे जाणवले कि घरात एक वेगळाच ताण आहे . सर्व जन एकमेकांशी कुजबुजून बोलत होते. एकमेकांच्या भावना खूप जपत होते. आम्ही ठीक आहोत , सगळ व्यवस्थित आहे असे दाखवत होते. पण त्यांच्या ह्या प्रयत्नांना समजून अजिबात धक्का न लावू देता मी बाहेर पडले .
पण पार्ले टिळक चा ९८ टक्के मिळालेला मुलगा वेदांत बारावीला कोणत्याही दिशेला बोट दाखवा तिथे प्रवेश घेवू शकेल इतका हुशार मुलगा अवघ्या सतराव्या वर्षी अचानक अदृश्य व्हावा हे कसे पटणार . आजी समोर सहलीला जाण्यापूर्वी वेदांत दहा मिनिटात जिमला जावून आला . आल्या आल्या आपल्या सायकल वर व्यायाम करून दरवाज्यावर लावलेल्या बार वर लोंब कळून पुन्हा स्वतःची गिटार वाजवून आजी मी आलोच सहलीला जावून असे सांगणारा नातू त्या ऐशी वर्षांच्या आज्जी समोरून कसा जाईल . घरातील त्याचे एकूण एक फोटो गायब करूनही ती आज्जी कसे हे दुखः विसरेल ते देवालाच ठाऊक .
पण माझी मैत्रीण सई मात्र ह्या कसोटीला सामोरे जायचा भरपूर प्रयत्न करत आहे . ह्या दुख्खाची तीव्रता फक्त काळ कमी करू शकेल पण निष्पाप वेदांत मात्र कोणाचाच मनातून जावू शकणार नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad