डबलक्लिक!!

Submitted by जव्हेरगंज on 20 June, 2016 - 09:42

आधी हे चॉकलेट खाऊन क्लिक! करा

==========================================================

तुडुंब भरलेली गटारं. रस्त्यावर उसळलेलं पाणी. धो धो पाऊस. फवारा उडवत आलेली कार. अन काच खाली करत बाहेर डोकावलेला फ्रेंच कट.

खरंतर अशा चिकचिकीत करायचं काय हा एक जबरदस्त प्रश्न असतो. भिजत फिरणे हा एकमेव पर्याय मी कायम निवडतो. होऊंदे सर्दी खोकला.

"हेलो बॉस, इथर न्यू सेंट्रल किधर है?" काळा गॉगल शोभत होता फ्रेंच कटवर.
माहितीचा पत्ता असेल तर सांगायला मजा येते. पण इथून न्यू सेंट्रल म्हणजे लय किचकट.

"मै उधरीच जारा हू, क्रॉसींग के उस पार"
हा अस्सा फुल भिजलेला मी. अंगावर एक म्हणून कोरडी जागा नव्हती. नाकावरची माशी उडवावी तसं काच लावून घेत तो म्हणाला
"बैठो"

झ्झूम कार निघाली. मी तर कुडकुडतच होतो. एसी लावला होता साल्याने. वर केक खात मोबाईलशी खेळत बसला होता मागच्या शिटवर. याचा ड्रायव्हर एवढा काळा असेल वाटलं नव्हतं.

"और भाई, जरा गाना बिना चला दो"
मग ड्रायव्हरनंसुद्धा नाकावरची माशी उडवली.

डोळे झाकले तर बाहेर पाऊस पडतोय हे कळलंसुद्धा नसतं. एवढी शांतता. पावसाचं सोडा, गाडीचा आवाजही कान देऊन ऐकवा लागत होता. गुबगुबित गाद्यांची अलिशान गाडी.

तेवढ्यात फ्रेंच कटचा मोबाईल वाजला.

"हा बोल मास्टर"
"..........."
"क्या?"
"..........."
"मै यहा चुदवाने नै आया"
"..........."
"तो मै क्या करु?"
"..........."
"च्युत्या समजा है क्या?'
"..........."
"बेटा, तू टेलरसे बात कर रहा है, इतना याद रख"
"..........."
"किसी का भी भोसडा फाडो, डिल तो आजही होगी"
"..........."
"चलेगा"
"..........."
"आता मै उधर"
"..........."
"१० ठिक रहेगा"
"..........."
"न्यू सेंट्रल?"
"..........."
"डन'

साला फ्रेंच कट कसला खतरनाक बोलतो. डिट्टो बेडकासारखा. खर्ज म्हणतात त्याला.

"गाडी ऑरलँड ले चलो" हा तर हुकूमच.
ड्रायव्हरनं गाडी थांबवली.
"बॉस, आप उतरो, हम उधर नै जारे"
गपचिप खाली उतरलो. खरंतर त्याला "थँक्स फॉर द लिफ्ट" म्हणायचे होते. पण गाडी झ्झूम. फवारेच फवारे.

फुटपाथवर आलो.
किती धो धो पाऊस पडतो आहे. त्याचा हाय डेफिनेशन आवाज मनात घुमतो आहे. आभाळ म्हणजे डॉल्बी डिजीटलच. फुल व्हॉल्यूमच्या राक्षसी गडागडाटात कोणीही टरकेल.
उंच उंच इमारती.
गगनचुंबीच.
खाली एक छोटीशी टपरी.
चहाची.
(ऑफकोर्स उफाळत्या)
द पॉप्युलर डेस्टिनेशन इन मुसळधार पाऊस.

जागोजागी गळणाऱ्या त्या टपरीच्या शेडमध्ये निवांतपणा असा नव्हताच. लाकडी फळकुटावर कुडकुडत बसलो. कटींग मागवला. मग बीडी पेटवली.

टेलर नामक फ्रेंच कट असावा तरी कोण? डोक्यात किडा वळवळला. न्यू सेंट्रलला रात्री दहा वाजता? कसलतरी डिल? बघूयातरी.
आता कुठे सहा वाजत आले होते. चार तास करायचं तरी काय?
मग निघालो चालत, भिजत, पाणी उडवत.

न्यू सेंट्रल आलो तेव्हा रेल्वे आदळाआपट करत जात होत्या. पाऊस असला म्हणून काय झालं. घंट्याची थांबते मुंबई.
एक बाकडं पकडलं. आणि झोपलोच.

स्वप्नात पक्या दिसला. पक्या आमचे जिगरी दोस्त. श्रीहरीकृपेने आमच्याच झोपडीत राहतात. अंडी खातात. बिड्या ओढतात. रेल्वे स्टेशन त्यांना खूप आवडतं. मूळचे खिसेकापू. हाफमर्डर एक्सपर्ट. आतापावतो चार पोलीसतरी धुतलेत त्यांनी. या पावसाळ्यात कुठे ऊलथले होते त्यांचे त्यांना माहीत.

बऱ्याच वेळानं जाग आली. जबरदस्त अंधार पडला होता. आज इथच मुक्काम टाकण्यास हरकत नव्हती.
फलाटावरच्या लांब एका कोपऱ्यात गर्दी दिसली. बक्कळ पोलीसपण दिसले.
चप्पल घालून निघालोच तिकडे. धो धो पावसात चिकचिक गर्दी. रेनकोट घातलेले पोलीस आणि कुत्री. फ्लॅश मारुन फोटोच फोटो.
वाट काढत मध्ये आलो तर काय, फ्रेंच कट आडवा पडलेला. पावसात त्याचं रक्तपण वाहून जात होतं. चार पाच गोळ्या तरी नक्की झाडल्या असणार. छताडावर.
घड्याळात बघितलं १०:३० झाले होते.
विश्वासच बसेना. डोक्यात भुंगा पेटला. आतापर्यंत विसरून गेलेलं ते मशीन बाहेर काढलं. प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवलं होतं भिजू नये म्हणून.
मी नॉब ऍंडजस्ट केला.

क्लिक!

मग निघालो चालत, भिजत, पाणी उडवत.

न्यू सेंट्रल आलो तेव्हा रेल्वे आदळाआपट करत जात होत्या. पाऊस असला म्हणून काय झालं. घंट्याची थांबते मुंबई.
एक बाकडं पकडलं. आणि ???
नको!
ही वेळ झोपायची नाही.

बसून राहिलो तसाच. फलाटाच्या लांब कोपऱ्यावर नजर मारली. फक्त काळोख.
भिकारी येत होते, जात होते. वेळ जात गेला तशी गर्दीही कमी होत गेली.
मी एक कटींग मागवला. बऱ्याच बिड्या फुकल्या. पेपर आणून वाचला. कालीगंगा!

शेवटी घड्याळात दहाचा टोल पडला. मी सावध झालो.
जबरदस्त बॉडी असलेले चौघे जण माझ्यापुढून फलाटावरच्या कोपऱ्यात निघून गेले.
मी नॉब ऍंडजस्ट केला.

क्लिक!

भिकारी येत होते, जात होते. वेळ जात गेला तशी गर्दीही कमी होत गेली.
मी एक कटींग मागवला. बऱ्याच बिड्या फुकल्या. पेपर आणून वाचला. कालीगंगा!

घड्याळात दहाला पाच कमी होते. मी चालत चालत फलाटावरच्या कोपऱ्यात गेलो. दाट काळोखात एका झुडपाआड लपून बसलो. डेंजर पाऊस होता.

जबरदस्त बॉडी असणारे चौघे जण तिथे चालत आले. प्रत्येकाकडं एकेक छत्री. त्यातला एकाकडं तपकिरी सुटकेस. भली मोठ्ठी.
मागून फ्रेंच कट येताना दिसला. एकटाच. त्याच्या हातात एक काळी सुटकेस. छोटीशीच
हातानं क्रॉस करुन तो म्हणाला,
"जीझस"
"जय माता दी" एक छत्रीवाला पुढे होत म्हणाला.

"और मास्टर, साले तेरी गाडी किधर अटक गयी थी ?, चार घंटेका लॉस हुआ मेरा"

"जाणता हू, मजबूरी थी, वैसेभी तेरी फ्लाईट कल सुब्बा है"

"भाड मे जा, फटाफट माल खाली कर, अर्जंसी नै समजेगा तू"

"एक बात बता टेलर, तेरेको इतना अर्जंसी क्यूं है?"

"तुझसे मतलब? अरे तू भाडमे जाना साले, पैले
माल दे मेरेको"

मास्टरनं पिस्तूल काढून सरळ फ्रेंच कटवर रोखलं.अगदी सहजच.

"सॉरी टेलरभाय, उपर से ऑर्डर है इसलिये, नै तो आपुन इस झमेले नै पडता"

"व्हाट द फक?"

"तेरी रशियन डिल पहुंच गयी है बॉसतक, बाय बाय"

धडाम धुड. धाड धाड धूडूक!

डोळ्यासमोर फ्रेंच कट जमीनीवर कोसळला. आणि दोन्ही बॅगा घेऊन चौघेजण फरार. ये डील तो बडा खतरी हुआ!

बसल्या बसल्या विचार केला. तसा आपण काही समाजसेवक नाही. पण एक शक्कल सुचली.
मी नॉब ऍंडजस्ट केला.

क्लिक!

नाकावरची माशी उडवावी तसं काच लावून घेत तो म्हणाला
"बैठो"

झ्झूम कार निघाली. मी तर कुडकुडतच होतो. एसी लावला होता साल्याने. वर केक खात मोबाईलशी खेळत बसला होता मागच्या शिटवर. याचा ड्रायव्हर एवढा काळा असेल वाटलं नव्हतं.

"और भाई, जरा गाना बिना चला दो"
मग ड्रायव्हरनंसुद्धा नाकावरची माशी उडवली.

डोळे झाकले तर बाहेर पाऊस पडतोय हे कळलंसुद्धा नसतं. एवढी शांतता. पावसाचं सोडा, गाडीचा आवाजही कान देऊन ऐकवा लागत होता. गुबगुबित गाद्यांची अलिशान गाडी.

"और टेलरभाय, क्या चल रहा है" मागे वळून बघत मी म्हणालो.
करकचून ब्रेक दाबत गाडीच थांबवली.
"कौन है बे तू?"
"म.. म.. मै मास्टर का आदमी, वो सुटकेस मेरे पास देने को बोला है" जाम घाबरलो होतो खरंतर.

"और माल?"
"वो ऑरलँड मे आपके केबिन मे मिलेगा"
"फक, तेरेको कैसे पता?, मैने तो ऑरलँड अभी बुक भी नै किया"

गोची!

तेवढ्यात फ्रेंच कटचा मोबाईल वाजला.

"हा बोल मास्टर"
"..........."
"क्या?"
"..........."
"तो फिर ये पंटर कौन हे मेरे गाडीमे"
"..........."
"एक मिनीट रुक जा"

सायलेन्सर लावलेली रिवॉलव्हर बाहेर काढत तो म्हणाला.
"सीबीआय से आया तू? अब उपर जाके चोदूगिरी कर"

मी नॉब अगोदरच ऍंडजस्ट केला होता.

क्लिक!

धो धो पावसात मी सुटकेसच्या दुकानात गेलो. सेम टू सेम बॅग विकत घेतली. मास्टरसारखी. साडे तीन हजार रुपये खर्च झाले. साली बॅग हाय का भूत. मग भरले त्यात बिस्कीटाचे पुडे.

तुडुंब भरलेली गटारं. रस्त्यावर उसळलेलं पाणी. धो धो पाऊस. फवारा उडवत आलेली कार. अन काच खाली करत बाहेर डोकावलेला फ्रेंच कट.

खरंतर अशा चिकचिकीत करायचं काय हा एक जबरदस्त प्रश्न असतो. भिजत फिरणे हा एकमेव पर्याय मी कायम निवडतो. होऊंदे सर्दी खोकला.

"हेलो बॉस, इथर न्यू सेंट्रल किधर है?" काळा गॉगल शोभत होता फ्रेंच कटवर.

"डील इधरीच होगी" मी विचारपुर्वक ठोकलं.
हातातल्या तपकिरी बॅगकडं त्यानं क्षणभर बघितलं. अन चमकलाच.

"क्या मतलब?"
"मास्टरने भेजा है मुझे, वो नै आयेगा, गाडी फस गयी है उसकी, गड्डेमे"
"पर... पर.... यहा? "
"जादा सोचो मत टेलरभाय, आपका टाईम कितना किमती मालूम है हमको"
"जीझस"
"जय माता दी"
"ला चल माल दे" त्याची सुटकेस मला देत तो म्हणाला.
माझी बॅग त्याला दिली.
"मास्टर को मेरा सलाम बोलना" गाडी झ्झूम. फवारेच फवारे.

पावसाला आज काय मरण नव्हतं. धो धो कोसळतच होता. झोपड्याकडं झपाझप पावलं टाकत निघालो. हातात काळी बॅग होती. त्यात जबरदस्त माल असणार. डोळेच पांढरे होणार.

झोपड्यात आलो. कडी लावून घेतली. पक्या उताणा पडला होता. साला आयत्या वेळी उगवला. मला बघून जागा झाला.
विदाऊट लॉकची ती बॅग झटक्यात उघडली. माझं सोडा पक्यानेसुद्धा डोळे पांढरे केले. हजार हजाराचे बिंडेल खच्चून भरलेले. उभं आयुष्य मोजण्यात जाईल.

फटाफट घर आवरलं. सॅकमध्ये कापडं भरली. बॅगेतला रोकडा प्लास्टिकमध्ये गुंडाळून कापडात लपवला. सगळं झोपडं पुसून घेतलं. मोकळी बॅग टाकून दिली. गटारात. ह्यातच वेळ गेला.

रात्रीच्या दहा वाजून गेल्या होत्या. पोलीस कधीपण टपकू शकतात. पाठीला सॅक अडकवून मी आणि पक्या जंक्शनवर आलो. समोर दिसेल त्या रेल्वेत चढलो.

धडधडत रेल्वे पळत सुटली. फ्रेंच कट जिंदाबाद म्हणत असतानाच न्यू सेंट्रलला गाडी थांबली.
मी सहज बाहेर बघितले आणि हादरुनच गेलो.
फलाटावरच्या एका कोपऱ्यात बरीच गर्दी जमली होती. रेनकोट घातलेले पोलीस पंचनामा करत होते. फ्लॅश मारुन फोटोच फोटो. मुसळधार पावसात मला दिसत होते अस्ताव्यस्त पडलेले चार मृतदेह.
जबरी फायरींग झाली असणार.
मी खिशावरुन हात फिरवला. आतमध्ये मशीन सुरक्षित होतं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक शंका,
डील जर रस्त्यावरंच डन झाली तर टेलर, न्यू सेंट्रलला कश्यासाठी जाईल आणि तिथे फायरिंग कशी होईल?
गाडीत पुन्हा मास्टरचा फोन येणार (की?) तेव्हा टेलरला आपण गंडलो गेल्याचं कळेल आणि तो परत त्याच जागी आपल्या टाईम ट्रॅवलर हीरो ला शोधत येईल (की?)

डील जर रस्त्यावरंच डन झाली तर टेलर, न्यू सेंट्रलला कश्यासाठी जाईल?>>>>>>

दोन शक्यता आहे.
१. आपल्याला मास्टरनंच गंडवलं, असं त्याला वाटलं असावं. म्हणून बदला घेण्यासाठी. (जो शेवटी घेतलाच आहे)
२. पैशे तर गेले, पण माल काहीही करून मिळवालवाच हवा ना?

गाडीत पुन्हा मास्टरचा फोन येणार (की?) तेव्हा टेलरला आपण गंडलो गेल्याचं कळेल आणि तो परत त्याच जागी आपल्या टाईम ट्रॅवलर हीरो ला शोधत येईल (की?)>>>>>>
हिरो त्यावेळी झोपडीत सुरक्षित पोचलेला असतो. आणि सेफटी म्हणून तो गाशा गुंडाळून पोबाराही करतोय.

Happy

समाधान न झाल्याने दोन्हीं ऊत्तरांसाठी पुन्हा प्रश्नं...

१. आपल्याला मास्टरनंच गंडवलं. म्हणून बदला घेण्यासाठी. (जो शेवटी घेतलाच आहे)
>>>

मास्टर ने आपल्याला डबल क्रॉस केला असे जर टेलरला आधीच वाटत असेल तर भेटण्याच्या जागी मास्टरची माणसं माल घेवून अजूनही असतील असे टेलरला का म्हणून वाटेल ?

२. पैशे तर गेले, पण माल काहीही करून मिळवालवाच हवा ना? >>
मास्टर ला फोन वरून कळणार की टेलर पैसे कुणाला तरी देवून बसला आहे तर तो न्यू सेंट्रलला माल आणि माणसे का तिष्ठत ठेवेल? पैसे नसतांना माल घ्यालला जावून टेलरचे ' आ बैल मुझे मार' नाही का होणार?

माफ करा पण मुद्दाम खोट नाही काढत आहे. तुमच्या सगळ्या कथांप्रमाणे ही पण कथा छानच आहे पण लॉजिक जरा कन्फर्म करावे म्हणून प्रश्न विचारला.

Mast prashn,

yacha agodarch vichar karun thevlay,

nivant uttare deto,
sandhyakali.

खुप छान Happy

खूप धन्यवाद मंडळी!!

@हायझेनबर्ग, तुम्ही तर मलाही विचारात पाडलं. एवढा सखोल विचार केल्याबद्दल खरंतर धन्यवाद.

खरंतर पडद्याआड काय झालं असेल हे कोडं वाचकांवर सोडून दिलं होतं,
तश्या बऱ्याच शक्यता आहेत.

शक्यतेचा एक घटनाक्रम तुमच्यापुढे मांडतो. मग कदाचित तुमचं उत्तर मिळेल.

-टेलरची बॅग घेऊन हिरो फरार
-गाडीत हिरोची बॅग उघडल्यावर टेलरला समजतं की तो गंडलाय (बॅग आधी का उघडली नाही हा प्रश्न गैरलागू, कारण हिरोकडे टाईम मशीन आहे लक्षात ठेवा, क्लिकाच क्लिका होतील राव)
-टेलर परत येऊन हिरोची शोधाशोध करतो. पण कुठेच सापडत नाही.
-टेलरला शंका, यामागे मास्टर की अजून कोणी?
-तेवढ्यात मास्टरचा फोन, गाडी अडकलीय वगैरे.
- टेलर सावध होतो. मास्टरला झाल्या प्रकाराबद्दल काहीच सांगत नाही. (का सांगत नाही? लगेच सगळे पत्ते त्याला खुले करायचे नाहीत, तसाही तो मास्टरगँगशी गद्दारीच करतोय. आणि त्याला काहीही करून मास्टरची भेट हवीय, कारण मालाची अर्जंसी)
-मग ठरल्याप्रमाने राती १० ला न्यू सेंट्रल
-टेलर ऑलरेडी सगळी तयारी करुन गेलाय. (कदाचित तो मास्टरला झाल्या प्रकाराबद्दल सांगेलही. )
-पण शेवटी धाड धाड धूडूक ( कदाचित टेलरने शूटरही नेले असतील)
-शेवटी माल महत्त्वाचा. (अर्जंसीच तेवढी आहे, ती जर पुरी केली नाही, तर रशियन त्याला सोडणार नाहीत असंही असू शकतं.)

तर हा सगळा शक्यतांचा खेळ आहे. मुख्य म्हणजे कथेत काहीही घडू शकतं, प्रत्येक कॅरॅक्टर भविष्यातले धोके ओळखून फुलफ्रूप वागेलंच असं नाही.

आभारी आहे Happy

अजूनही निरसन झालं नसेल तर बिनधास्त विचारा !

व्हंय व्हंय! झ्याक जमलंय की सपष्टीकरण.
पण तुम्ही हिरो वर ध्यान ठिवा जरा.. दोन चार ज्यादाचे क्लिक क्लिक करून त्येला शितलीकडं लावून द्या की. तिकडं बी पाऊस पडू द्या जरा, लई तापलं हुतं रान.

मस्त! पहिल्यापासुन तुमच्या कथा आवडत आहेत...
मधे एक-दोन कथा मला तितक्या आवडल्या नव्हत्या पण चॉकलेट पासुन परत भरात आलय!!