धर्मांतर

Submitted by मिरिंडा on 19 June, 2016 - 23:41

एक फादर खेडुतांना म्हणाले
"आपण सर्वच त्याची लेकरे
तुमच्या रंगीबेरंगी धर्मांतून चाचपडताना
हा पाहा मी आणला
पांढरा शूभ्र आशेचा किरण

अगदी पावासारखाच गोरा
स्वच्छ व निर्मळ

आज तुम्हाला पाव देणार
उद्या जवळ घेऊन
नोकरी देणार
आणि परवा हवी त्यांना
छोकरीपण देणार"

जमलेल्या खेडुतांनी
माना डोलवल्या
पांढरा बाबा खाण्याचं बोलतोय
दोन दिवसांच्या उपासानंतर
मिळणाऱ्या पावाचे महत्त्व पटले
अन म्हणाले " जय जीझस "

फादर म्हणाले, " जय नाही
माय म्हणा "

खेडुतांनी "री" ओढली
"माय जीझस " चा जयघोष केला
जो तो वाट चालू लागला

फादर मात्र चुकलेल्या कोकरांमागे
प्रेमळपणे धावू लागले

Group content visibility: 
Public - accessible to all site users