अधोगती

Submitted by निरव on 18 June, 2016 - 12:16

अधोगतीच्या खोल दरीत
घसरत गेला खाली खाली
नजर वळाली वर तळाशी
खाली न उरले जेव्हा काही

कधी न दिसली अशी विहंगम
यशशिखरे ती जशी दरीतून
दफन जाहल्या त्याला फुटला
अंकुर गगनभरारीस्तव

Group content visibility: 
Public - accessible to all site users