परिसस्पर्श : यशोगाथा एका व्यावसायिकाची

Submitted by जयनीत on 12 June, 2016 - 02:17

सेठजींनी पदार्पण केले
एका नव्या कर्यक्षेत्रात
मनोरंजनाच्या उद्योगात
मोठं नव्हतं नाव त्यांच
ह्या नव्या व्यवसायात
तारखा मिळेनात त्यांना
बड्या तारे, तारका, दिग्दर्शकांच्या
पण मागे हटणे नव्हतेच
सेठजींच्या स्वभावात
त्यानी निर्णय घेतला
सिरीयल बनवण्याचा
अनुभव प्राप्त करण्याचा उद्देश तर होताच
ह्या क्षेत्रातही संधी दडल्या होत्या व्यवसायाच्या
अपरिमीत
समस्या आलीच त्यांना इथेही
बड्या दिग्दर्शक, तारे, तारकांच्या तारखांची
पण थांबले ते सेठजी कसले
त्यांनी सुरवात केली
हाती धरून एका नव्या दिग्दर्शकाला
मालिकेची सुरुवात होती
आश्वस्त करणारी
एकसुरी मालिकांच्या गजबजाटात
एक नवा प्रयोग
एक नवा दृष्टीकोन
विषयाची हाताळणी नव्या प्रकारची म्हणून
मालिकेची चांगलीच दखल घेतली गेली
समिक्षक अन प्रेक्षकांकडून
अताबट्ट्य़ाचा व्यवहार नव्हता निश्चितच
तरीही खुपत होता सेठजींच्या डोळ्यात
बेंलेन्स शीट मधील आकडा
मालिकेवरील गुंतवणुकीवरील परतावा
कमीच दिसत होता नफा
त्यांच्या इतर व्यवसायांच्या तुलनेत
परतावा म्हणजे त्यांचा जीव की प्राण
परतावा म्हणजे?
किंमत त्यांच्या वेळेची, श्रमाची, पैश्याची
अल्पसंतुष्टीला थारा नव्हता
सेठजींच्या मनात कधीच!
उपजत उर्मी होती त्यांच्यात
यशाची नवनवी शिखरे गाठण्याची
जी वेगळं करायची त्यांना
सर्वसामान्यनां हून नेहमीच
तेच होते गमक त्यांच्या आजवरच्या यशाचे
निर्णय घेतला सेठजींनी
मोबदला वाढवण्याचा
त्यांच्या श्रम अन वेळेचा
त्यांनी गरज ओळखली
मार्केटिंगची
त्यात तर त्यांचा हातखंडा
धडाका लावला त्यांनी
प्रमोशन, जाहिरात ह्यांचा
लढवल्या निरनिराळ्या कल्पना
तरीही येईना प्रतिसाद
मनासारखा
वाढतच नव्हती प्रेक्षकांची संख्या
एका प्रमाणा बाहेर
मनस्वी चीड होती सेठजींना
अल्पयशाची
हा बट्टा होता
आजवरच्या त्यांच्या कारकीर्दीवर
त्यांनी घेतली सूत्रे स्वत:च्या हाती
दिगदर्शक अजूनही होता नवखा
अनिभिज्ञ
व्यावसायीक क्लुप्र्त्या, बारकावे ह्यापासून
अजूनही बाकी होता त्याच्यात बराचसा
पीळ आदर्श, तत्व इत्यादींचा
दिग्दर्शकाला सहन होईना हस्तक्षेप
अन सेठजींना अल्पयश
मार्ग वेगळे झाले
दोघांचेही
सेठजींनी आणले एका नावाजलेल्या दिग्दर्शकाला
मोठी किम्मत मोजुन
हमखास यशाची हमी दिली दिग्दर्शकाने
हस्तक्षेप न होण्याच्या अटी वर
मालिकेला यशस्वी करण्याच्या ईर्ष्येने
लागला तो कामाला
केले मनाजोगते फेरफार
कठोरतेने
हळूहळू सर्वकाही ठीक होऊ लागले
व्यवस्थित
केला वापर त्याने सर्वच प्रचलीत माल मसाल्याचा
मुक्तहस्ते
दिसु लागली कमाल
बड्या दिग्दर्शकाच्या विख्यात परिसस्पर्शाची
गुणवत्ता जसजशी घटु लागली
टी. आर. पी. तसतशी वाढु लागली.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users