शृंगार १५

Submitted by अनाहुत on 2 June, 2016 - 03:17

हे इतक सोप होत मग मी उगाचच इतका वेळ वाया घालवला . किती सहजपणे ती तयार झाली . पण ती येईल तेव्हा खर . आता ती आली की परत एकदा डॉक्टरांकडे जाऊन येऊ . आताच अपॉंइंटमेंट घेऊन ठेऊ . खरच आहे १+१=११ आणि २-१=० . ओके आज घर जरा आवरून घेऊ फारच पसारा झाला आहे . आणि नविन काहीतरी करूया , काय करूया ? कर्टन्स चेंज करूया का ? हो बरेच दिवस झाले आता चेंज करायला हवे . नको तिला आवडणार नाही उगाच खर्च केला म्हणेल . मग दुसर काय कराव ? फुलं ठीक आहेत आणि आणि ... तेव्हढ्यात फोन वाजला . परांजपे सरांनी बोलावून घेतलं .

" काय सांगायचं , काय माग लागलय आमच्या , अरे कुणी तक्रार केलीय का आणि काही कारण आहे पण आमचा बॉस आमच्या माग लागला आहे सगळ्या गोष्टी पर्सनली एक्सप्लेन करायला लावतो आहे . तुझी मदत हवी मला . जरा हे सगळं शॉर्टमधे एक्सप्लेन कर ना . "

" ठीक आहे पण आमच्या बॉसचं काय ? "

" त्याची तू काळजी नको करू मी करतो मॅनेज . "

" मग ठीक आहे . "

दिवस तिकडेच गेला . संध्याकाळी नेहमीपेक्षा जरा लवकर निघालो त्यामुळे प्रवास आरामशीर झाला . लवकर घरी जाऊन जरा आवरा आवर करण्याचा विचार होता म्हणून जरा भरभर निघालो होतो . शेजारच्या गार्डनपाशी पोहोचलो तर समोरून पूजा येत होती . हाय हॅलो करून पटकन निघायचा विचार होता . इतक्यात तिने विचारले

" काय मग वाईफ कधी येते आहे . "

" तुला कस माहीत ती येणार आहे ते ? "

" हं , काय आहे ना आपल्याला अस वाटत ब-याच गोष्टी आपण कंट्रोल करतो . आपला आपल्या लाईफवर कंट्रोल आहे , पण तस नसतं ना . "

" तू काय म्हणते आहेस मला काहीच समजत नाहीए . "

" सगळच कुठे समजत आपल्याला ? किंवा सगळं समजण्याचा प्रयत्नतरी का करावा ? "

" काय ? कशाबद्दल बोलते आहेस समजेल का मला ? "

" आता तुम्ही गडबडीत आहात . भेटूया परत , तेव्हा बोलू . "

एवढ बोलून ती निघाली . काय चाललय ? मला तर काही समजायलाही मागत नाही . ही एवढ्याशा वेळात किती प्रश्न निर्माण करून गेली . ही दरवेळी भेटते तेव्हा नविनच काहूर माजवते डोक्यात . त्यापेक्षा तिला भेटायलाच नको . पण तसही चालणार नाही . आता जे प्रश्न पडले आहेत त्यांची उत्तरतरी मिळूदे मग बघू . आता ही या प्रश्नांची उत्तर देते का नविन प्रश्न निर्माण करते ते तेव्हाच कळेल .

घरी आलो आणि आवराआवर करायला सुरूवात केली पण डोक्यात तेच प्रश्न घोळत होते . त्या विचारातच कसतरी काम आवरल आणि बाहेर जाऊन जेवण करून आलो . माघारी येत होतो वाटेत पूजा आणि तिच्या मैत्रिणी चालल्या होत्या . त्यांना पुढे जायचे असल्यामुळे पूजा त्यांचा निरोप घेऊन आमच्या बिल्डिंगच्या दिशेने निघाली . मी काही अंतर मागेच होतो पण आता या वेळी तिच्याशी जाऊन बोलावे का नाही या विचारात होतो . शेवटी विचार केला आता नकोच म्हणून चालण्याचा वेग कमी केला आणि तिला पुढे जाऊ दिले . पुढे कॉर्नरवर ती पुढे गेली आहे की नाही हे चेक करण्यासाठी तिथल्या झाडाच्या मागून डोकावून पहाण्याचा प्रयत्न केला , ती काही दिसली नाही . आता मी निर्धास्तपणे पुढे जाऊ शकतो , मी असा विचार करतच होतो तितक्यात समोर पूजा . तिला अस अचानक समोर पाहून मला एकदम दचकायला झालं .

" तुम्ही मला फॉलो करत होता . "

" नाही "

" मग इकडे झाडामागे उभे राहून डोकावून काय बघत होता ? "

" ते.. हे .. काय.. ते ..."

असा अचानक भलताच प्रसंग ओढावल्यामुळे मला बोलायला पटकन काही सुचतही नव्हत . आणि मी ती आहे की नाही हेच पाहत होतो त्यामुळे काय बोलाव याचा फारच गोंधळ होत होता . मला अस गोंधळलेल पाहून तिला हसू आलं व ते वाढतच गेलं आणि ती हसतच राहिली . इकडे मला कळत नव्हत की मी यावर काय प्रतिक्रिया द्यावी .आपणही हसाव का स्वतःच्या या परिस्थितीवर रडाव .थोड्या वेळाने ती हसायची थांबली आणि म्हणाली

" फॉलो करत होता तर सांगायचं ना तस . आणि फॉलो कशाला करायचं माझ्याबरोबर आला असता तर बरोबरच गेलो असतो ना दोघे . इथे या मधल्या सेक्शनमधे लाइटही कमी असते आणि वर्दळही फार नसते . आणि अशात कोणीतरी पाठीमागून चोरपावलांनी येत आहे म्हटल्यावर भिती वाटणारच ना . बरोबर आला असता तर मलाही सोबतच झाली असती ना . असू द्या . आता जाऊया ? "

" हो "

थोडावेळ कोणीच कोणाशी काही बोलल नाही . मग मलाच राहवल नाही आणि मी तिला विचारलं

" तू मघाशी काय म्हणत होतीस ? "

" तुम्ही मला फॉलो का करत होतात ? "

मी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागलो .

" अस मी तुम्हाला म्हटले मघाशी . "

" ते नाही ग , ते तुला कस कळल मंजू येणार आहे ते . "

तिने परत एक स्माईल दिली . आता मात्र ती स्माईल जीवघेणी झाली होती . परत तेच , प्रश्नाच उत्तर नाहीच . याचसाठी मी हिला टाळत होतो . चेह-यावर तेच गूढ हसू ठेवून ती म्हणाली

" एव्हढ काय आहे त्यात न समजण्यासारखं ? "

आता पुढे काही सांगणार आहे का तिथेच फिरत राहणार आहे ही ?

" काही गोष्टी न सांगताच समजतात . तुम्हीही समजून घ्या ना न सांगताच . "

मला आता कशाच काही समजायला मागत नव्हत . आणि आपण हिला इतक टाळूनही एका फारच विचित्र परिस्थितीला सामोर जाव लागल . आपल्या प्रश्नांची उत्तर मिळाली नाही ती नाहीतच उलट अजूनच प्रश्न निर्माण झाले ते वेगळेच . आता या प्रश्नांची उत्तर कशी आणि कधी मिळवायची याच विचारात होतो . या विचारात झोपही येत नव्हती . किती वेळा स्वतःलाच समजावण्याचा प्रयत्न केला की याने आपल्याला काही फरक पडत नाही . पण सगळं व्यर्थ रात्रभर झोप आली नाही ती नाहीच .

क्रमशः
आधीचे भाग : https://anahut10.blogspot.in
भाग १६ www.maayboli.com/node/58991

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच छोटूसा भाग Sad
पुढील ठोस* भागाच्या प्रतिक्षेत..

ठोस अश्यासाठी लिहिले की या श्रुंगाराचे नुसते भाग वाढत चालले आहेत.. पण कथा जराही पुढे सरकतच नाहीये (हेमावैम)

झी टीव्हीचे एपिसोड बघितल्यासारखा. त्यांचेही कथानक आठवडे ढवडव दळलं तरी पुढे सरकत नाहीत ☺

कथा भरकटतेय. आपण कुठल्या कथेत आहोत याचा नायकाला विसर पडलाय आणि तो कथेत अद्यापि नीट इंट्रोडूस न झालेल्या पात्रांच्या कमेंटी ऐकून स्वतःची झोप घालवतोय.

सुरु झाली तेव्हा सुरेख वाटलेली.

साधनाताईंशी सहमत.
कथा मंजू आणि हिरो सोडून ज्या साईड ट्रॅक ला सुसाट आणी लांबवर गेलीय त्यामुळे आता ओरिजिनल खुणेचा दगड सापडत नाहीये.

झी टीव्हीचे एपिसोड बघितल्यासारख>>> आधी मला डेली सोप सारखी रोज किंवा दोन एक दिवसांत येणारी अशी कथा लिहायची होती , सुरूवातही तशीच होती पण पुढे तो वेग नाही राखता आला हे मान्य . पण माझी अपेक्षाही एका भागात फार काही घडावे अशी नसून ती हळूहळू पुढे जावी अशीच आहे . तेव्हाच हवा तो इफेक्ट साधता येईल . त्यासाठी पुढील भाग लवकर टाकण्याचा प्रयत्न असेल त्यामुळे कथेचा वेग वाढेल .

सुरु झाली तेव्हा सुरेख वाटलेली.>>> धन्स . आताही ती तशीच आहे पण सध्या थोड्या वेगळ्या वळणावर आहे इतकच . ती पुर्वीच्या मार्गाने नक्कीच जाणार आहे .

खूणेचा दगड न दिसता अचानक इच्छित स्थळी पोहोचायच होत कधीकधी , ते जास्त सुखद होत .

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आभार . पुढील भाग लवकरच

वरील लिंक click करताच "तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही." असा response येतोय

वरील लिंक click करताच "तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही." असा response येतोय
नवीन Submitted by anamika६७ on 30 August, 2017 - 17:56

सेम माल पन असेच दिसते आहे.